सप्तशृंगीच्या मंदिराचे रूप पालटणार, मंदिराचा होणार जीर्णोद्धार, किती खर्च येणार आणि कसं असेल मंदिर? जाणून घ्या
नाशिकच्या विविध भागात राज्यसह देशातील पर्यटक येत असतात. धार्मिक शहर असल्याने नागरिकांचा मोठा ओढा असतो. त्याच पार्श्वभूमीवर वणीच्या गडावरील संख्याही हळूहळू वाढत चालली आहे.
नाशिक : खरंतर भारतात 51 शक्तीपीठं आहेत. त्यापैकी साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धेपीठ आणि स्वयंभू आद्यशक्तीपीठ म्हणून वणीच्या देवीची देशभरात ओळख आहे. हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. मागील वर्षी वणीच्या देवीच्या मूर्तीवरील शेंदूर काढण्यात आल्यानंतर देवीचं मुळं रूप पाहायला मिळालं आहे. हजारो वर्षानंतर हे रूप बघायला मिळालं होतं. त्यानंतर गडावरील भक्तांची गर्दीही मोठ्या प्रमाणात वाढली होती. त्यातच आता देवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला जाणार आहे. मूर्ती संवर्धन करण्याची प्रक्रिया यशस्वी पार पाडल्यानंतर आता सभामंडप आणि मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामदुले मंदिराचे रूप पळतले जाणार असून गडावर वेगळं दृश्य बघायला मिळणार आहे. यामध्ये सुशोभीकरणही केले जाणार आहे.
खरंतर विद्यमान विश्वस्त मंडळाने हा निर्णय घेतला असून भाविकांच्या योगदानातून पहिल्या टप्प्यात जवळपास सात कोटी खर्च करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार अक्षय तृतीयेला या कामाचा श्रीगणेशा होणार असल्याची माहिती विश्वस्त मंडळाकडून देण्यात आली आहे.
साधारणपणे एका वर्षात चाळीस ते पन्नास भाविक सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी येत असतात. यामध्ये काही दिवसांपूर्वीच अल्पदरात निवास व्यवस्था आणि अत्यंत कमी दरात महाप्रसादाची व्यवस्था यापूर्वी सुरू करण्यात आली होती. त्यात नंतर आता जीर्णोद्धार केला जाणार आहे.
खरंतर नव्या कामात सुशोभिकरण केले जाणार आहे. त्यामध्ये मंदिराच्या गाभाऱ्याबरोबरच चांदीत नक्षीकाम केले जाणार आहे. त्यासाठी भाविकांनी मदत करावी असेही आवाहन विश्वस्त मंडळाकडून करनेत आले आहे. तब्बल 42 वर्षानंतर येथे काम केले जाणार आहे.
1981 मध्ये यापूर्वी सभामंडपाचे काम झाले होते. त्यानंतर आता होणार आहे. तर नवीन तंत्रज्ञान आणि संगणक प्रणालीवर अवलंबून असणारे यंत्रणा कार्यान्वित केले जाणार आहे. काही दिवसांपासून भाविकांची संख्या वाढत चालली असल्याने नव्या सुविधा देण्यावर भर आहे.
अक्षय तृतीयेला केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, पालकमंत्री दादा भुसे, स्थानिक आमदार नितीन पवार आणि जिल्हाधिकारी गंगाथरण डी यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती असणार आहे. याशिवाय स्थानिक नागरिक यांचीही मोठ्या प्रमाणात उपस्थिती असणार आहे.
नाशिक शहर हे पर्यटन नगरी म्हणून ओळखले जात आहे. रामकुंड, त्र्यंबकेश्वर, वाईनरी जवळच असलेले शिर्डी आणि वणीचा गड असल्याने भविकांचा मोठा कल असतो. सुट्टीच्या दिवसांत मोठी गर्दी नाशिकच्या विविध भागात पाहायला मिळते.