बारसू रिफायनरीवरुन संजय राऊत आणि उदय सामंत यांच्यात जुंपली, उद्धव ठाकरे यांचं पत्रच काढलं…

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बारसू येथील रिफायनरी प्रकल्पावरून उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या पत्राचा आधार घेत संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

बारसू रिफायनरीवरुन संजय राऊत आणि उदय सामंत यांच्यात जुंपली, उद्धव ठाकरे यांचं पत्रच काढलं...
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Apr 25, 2023 | 2:31 PM

नाशिक : रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथील रिफायनरी प्रकल्पावरुन सध्या राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. यामध्ये यामध्ये शिवसेना शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू असल्याचे दिसून येत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर दडपशाहीचा आरोप करत जालियनवाला बाग हत्याकांड होईल अशी शंका व्यक्त करत संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले होते. त्यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी संजय राऊत यांच्यावर पलटवर करत असतांना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतांना यांनीच केंद्र सरकारला दिलेल्या पत्राचा हवाला देत बारसू प्रकल्पाला विरोध हे राजकीय षड्यंत्र असल्याचा आरोपही उदय सामंत यांनी केला आहे.

उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, खासदार संजय राऊत जालियन वाला बाग हत्याकांड होईल असं म्हणतात त्याबद्दल मला असं वाटतं की आंदोलनाला ज्या पद्धतीने प्रतिसाद मिळाला नाही जे मनसुबे यांचे होते ते धुळीला मिळाले म्हणून त्यांचा जळफळाट होतो आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बारसू प्रकल्प व्हावा म्हणून पंतप्रधानांना पत्र दिलं त्याच्याबद्दलची साडेनऊच्या इव्हेंटची भूमिका काय ? तिथल्या स्थानिक आमदार रिफायदारीचे समर्थन करत आहे त्यांची त्याच्यावर भूमिका काय? त्यांचा काय राजीनामा घेणार आहेत का? असे सवाल उपस्थित केले आहे,

हे सुद्धा वाचा

ज्यांनी पत्र दिलं बारसू ला रिफायनरी व्हावं म्हणून त्यांच्यावर काय कारवाई करणार आहेत? स्वतः या सगळ्या गोष्टी सुरु करायच्या आणि जनतेला दाखवायचं का मी तुमच्यासोबत आहे असा तो प्रकार सुरू आहे असेही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हंटलं आहे.

उदय सामंत यांनी काही लोक समर्थन करत आहे. त्याबद्दलही बोलले पाहिजे. ज्या ठिकाणी शंभर बोर मारायचे होते. त्यातले 50 बोरची लोकांनी परवानगी दिलेली आहे. त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की शंभर टक्के विरोध आहे. जो विरोध आहे तो गैरसमाजातून आहे.

ज्यांचा गैरसमज झाला आहे. त्यांचा गैरसमज काढला जाईल. आजच प्रकल्प होणार नाही. कंपनीला वाटेल की आम्ही या ठिकाणी आता प्रकल्प करू शकतो. त्यावेळेस प्रकल्पाची सुरुवात होणार आहे. राजकीय वातावरण कुठेतरी तयार करायचा प्रयत्न केला जातो आहे.

एकीकडे पत्र द्यायचे त्यामध्ये प्रकल्प करावा अशी विनंती करायची आणि दुसरीकडे बारसू मध्ये रिफायनरीला विरोध करायचा ही दुटप्पी भूमिका आहे. प्रकल्प गेला म्हणून एकीकडे भाषणे करायची आणि जो येत आहे त्याला विरोध करायचा असा टोला उदय सामंत यांनी लगावला आहे.

महाराष्ट्रातल्या दीड ते दोन लाख नागरिकांना रोजगार देण्याचा मी प्रयत्न करतोय. त्यांना कुठेतरी पाठिंबा द्यायचे सोडून विरोध करणे हे खरोखरच महाराष्ट्राच्या दृष्टीने नुकसान होणारे आहे आहे. मी व्हिडिओ कॉलवर सर्व परिस्थिती दाखवतो म्हणत परिस्थिती निवळल्याचा दावा उदय सामंत यांनी केला आहे.

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.