पहाटेच्या शपथविधीवेळी फोन आला होता.. सध्या ते फोनच्या प्रतीक्षेत? आमदार दिलीप बनकर काय म्हणाले?

शरद पवार आणि अजित पवार यांचे निकटवर्तीय असलेले निफाड चे आमदार दिलीप बनकर यांनी अजित पवार हे भाजप सोबत जाणार कि पक्ष जाणार याबाबत महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

पहाटेच्या शपथविधीवेळी फोन आला होता.. सध्या ते फोनच्या प्रतीक्षेत? आमदार दिलीप बनकर काय म्हणाले?
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Apr 18, 2023 | 4:02 PM

नाशिक : अजित पवार हे भाजप सोबत जाणार की नाही या बाबत मला कसलीही माहिती नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पूर्ण एकत्रच आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कधीही फूट पडण्याचे काही कारण नाही. आमचे 54 आमदार होते, एक आमदार कमी झाला. दोन सहयोगी आमदारांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे ५५ आमदार आहेत. पक्षाचे नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील आणि विरोधी पक्ष नेते म्हणून अजित पवार यांच्यावर जबाबदारी दिली आहे. ज्या महाविकास आघाडी सरकारमध्ये अडीच वर्षाच्या काळामध्ये अजित पवार यांनी चांगल्या पद्धतीने काम केले आहे. आमदारांची कामे आणि अडीअडचणी अजित पवार यांनी सोडवण्याचे काम केले आहे. इतर सहयोगी पक्षाच्या आमदारांचेही कामे अजित पवार यांनी केले आहे. त्यामुळे पक्ष एक संघ असून त्यामुळे कुठेही फुट पडणार नाही असे निफाडचे आमदार दिलीप बनकर यांनी म्हंटलं आहे.

मी तेव्हाही पक्षाबरोबरच होतो आणि ती पक्षाची भूमिका होती. ती काय बाहेर बोलता येत नाही. पक्षाचा हा निर्णय असतो. आम्हाला निरोप आला आणि आम्ही तिथे गेलो. आम्हाला काहीच माहिती नव्हतं. तिथे गेल्यावर सगळं कळलं काय झालं ते. पण आता आम्हाला कुठलाही फोन नाही, टीव्हीच्या माध्यामातूनच ही माहिती समजते आहे.

शरद पवार आणि अजित पवार यांच्यात यापूर्वी चर्चा व्हायला पाहिजे. आमदारांसोबत चर्चा व्हायला पाहिजे. तसं काहीही झाले नाही. उलट आम्ही संपूर्ण नाशिक जिल्ह्यात बाजार समितीच्या निवडणुका आहेत. त्यामुळे गाठीभेटी सुरू आहेत.

हे सुद्धा वाचा

चार दिवसांपूर्वी पाऊस पडला आहे. त्यात मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे दुःख कमी करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून जेवढे पंचनामे करून घेता येईल तेवढे पंचनामे करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत असेही दिलीप बनकर यांनी म्हंटलं आहे.

अजित पवार भाजप सोबत जाणार नाही. याबाबत पक्ष निर्णय घेतील आणि पक्षासोबत आहोत. पक्ष भाजप सोबत जाईल की नाही हे माहिती नाही. पक्षाच्या नेतृत्वाने ठरवायचे आहे कुणाबरोबर जायचे आणि कुणाबरोबर नाही. कुणाबरोबर सरकार करायचा हा निर्णय पक्ष घेईल असे आमदार दिलीप बनकर यांनी म्हंटलं आहे.

दरम्यान अजित पवार यांनी 2019 मध्ये ज्यावेळी भाजप सोबत सरकार स्थापन केले होते. त्यावेळी आमदार दिलीप बनकर त्यावेळी अजित पवार यांच्या सोबत उपस्थित होते. दिलीप बनकर हे पवार कुटुंबियांच्या जवळचे मानले जातात.

'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.