नाशिकवरुन बांगलादेशला कांदा पाठवला, रेल्वेला 22 कोटीचं उत्पन्न, व्यापारीही मालामाल, शेतकऱ्याला मिळाले…

कोरोना संकटातही नाशिकमधील कांदा रेल्वेने बांगलादेशला पाठवण्यात आला. रेल्वेला या भाड्यापोटी तब्बल 22 कोटी उत्पन्न मिळालं. Nashik Onion Exports to Bangladesh

नाशिकवरुन बांगलादेशला कांदा पाठवला, रेल्वेला 22 कोटीचं उत्पन्न, व्यापारीही मालामाल, शेतकऱ्याला मिळाले...
Follow us
| Updated on: Jul 17, 2020 | 12:06 PM

नाशिक : कोरोना संकटातही नाशिकमधील कांदा रेल्वेने बांगलादेशला पाठवण्यात आला. रेल्वेला या भाड्यापोटी तब्बल 22 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालं, व्यापारीही मालामाल झाले. मात्र ज्यांनी हा कांदा पिकवला त्या शेतकऱ्याला तुटपुंजा भाव मिळाला. कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही बांगलादेशातून मोठ्या प्रमाणात कांद्याची मागणी वाढली. एक लाख मेट्रिक टनाहून अधिक कादा रेल्वेच्या माध्यमातून बांगलादेशात निर्यात झाला. यातून रेल्वेला 22 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. मात्र कांदा उत्पादक आजही आपला कांदा तोट्यात विक्री करत असल्याने अनुदानाची मागणी करतो आहे. (Nashik Onion Exports to Bangladesh)

यंदा उन्हाळ कांद्याचे उत्पादन 130 टक्के झाले. त्यातच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे देशासह जागतिक बाजारपेठेत कांद्याची मागणी घसरली. कांद्याचे बाजार भाव एक हजार रुपयांच्या आत येत सरासरी 500 ते 600 रुपये इतका प्रतिक्विंटलला बाजार भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आणि कांदा उत्पादकाला आपला कांदा हा तोट्यात विक्री करण्याची वेळ आली. त्यातच बांगलादेशातून वाढलेल्या मागणीमुळे नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, मनमाड, निफाड, खेरवाडी आणि नाशिक रोड या रेल्वे स्थानकाच्या मालधक्क्यावर 55 मालगाड्यांमधून कांदा आत्तापर्यंत बांगलादेशाला पाठवण्यात आला. (Nashik Onion Exports to Bangladesh)

 TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

यातून रेल्वेला एका मालगाडी मागे 40 लाख रुपये इतके भाडे मिळाले यातून 55 मालगाड्यांच्या मागे 22 कोटींचे उत्पन्न मिळाले. तर कांदा व्यापाऱ्याला नफा मिळाला. मात्र चार महिने शेतकऱ्यांने कांदा पोटाच्या मुलासारखा जगविला आणि तो बाजारात विक्री केला, तर त्याला चारशे ते पाचशे रुपये प्रति क्विंटल मागे तोटा झाला. याकडे केंद्र सरकार लक्ष देणार का हा सवाल कांदा उत्पादकांनी उपस्थित केला आहे. विक्री झालेल्या आणि विक्री होणाऱ्या कांद्याला पाचशे रुपये अनुदान देण्याची मागणी शेतकरी करत आहेत.

(Nashik Onion Exports to Bangladesh)

संबंधित बातम्या 

नाशिकचा कांदा बांगलादेशला, एक लाख मेट्रिक टन कांद्याची निर्यात 

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.