Nashik | दिव्यांगांना नोंदणी करताच मिळणार मोफत सुविधा अन् मदत; कसा घ्याल लाभ?

महाशरद संकेतस्थळावर नाशिक जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्ती त्याचप्रमाणे देणगीदार, अशासकीय सामाजिक संघटना व समाजसेवक हे निःशुल्क नोंदणी करू शकतात. आवश्यक साहित्य मिळणेबाबत नोदंणी केल्यानंतर दिव्यांग व्यक्तींना अनेक साहित्यांची सुविधा मोफत उपलब्ध होणार आहे.

Nashik | दिव्यांगांना नोंदणी करताच मिळणार मोफत सुविधा अन् मदत; कसा घ्याल लाभ?
महाशरद पोर्टलवर नोंदणी करताच दिव्यांना मदत मिळणार आहे.
Follow us
| Updated on: Feb 20, 2022 | 7:06 AM

नाशिकः नाशिकसह (Nashik) राज्यातील दिव्यांगांना एक अतिशय आनंदाची बातमी. त्यांनी आता आपल्या नावाची नोंदणी सरकार दरबारी करताच त्यांना अनेक सुविधा या मोफत मिळणार आहेत. होय, त्यासाठीच महाराष्ट्र (Maharashtra) शासनाने महाशरद पोर्टल (Portal) प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीच्या https//mahasharad.in या संकेतस्थळावर नोंदणी केल्यास दिव्यांग व्यक्तींना आवश्यक असणारे साहित्य उपलब्ध होणार आहे. त्यासाठी दिव्यांगांनी महाशरद पोर्टल प्रणालीचा लाभ घ्यावा, असे जिल्हा परिषदेचे जिल्हा समाजकल्याण अधिकारी योगेश पाटील यांनी केले आहे. महाशरद https//mahasharad.in या संकेतस्थळावर जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्ती त्याचप्रमाणे देणगीदार, अशासकीय सामाजिक संघटना व समाजसेवक हे निःशुल्क नोंदणी करू शकतात. आवश्यक साहित्य मिळणेबाबत नोदंणी केल्यानंतर दिव्यांग व्यक्तींना अनेक साहित्यांची सुविधा मोफत उपलब्ध होणार आहे.

संस्थांना जोडणारा दुवा कसा?

महाशरद पोर्टलच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्ती व विद्यार्थ्यांना कृत्रिम अवयव व साहित्य उपलब्ध होणार आहे. हे पोर्टल दिव्यांग व्यक्तींना मदत मिळण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था, कंपन्या यांना जोडणारा महत्वाचा दुवा असून, एकाच छताखाली या सुविधा उपलब्ध होणार आहेत. जिल्ह्यातील जास्तीत जास्त दिव्यांग लाभार्थ्यांनी त्यांना आवश्यक असलेले साहित्य उपलब्ध होण्यासाठी व समाजातील दानशूर व्यक्ती, संस्थांनी आर्थिक मदत करण्यासाठी महाशरद पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहनही जिल्हा परिषदेचे जिल्हा समाजकल्याण अधिकारी योगेश पाटील यांनी केले आहे.

पोर्टलचे ध्येय काय?

महाशरद पोर्टलरुपी हे अभियान म्हणजे राज्यातील दिव्यांगांसाठी सहाय्य उपलब्ध होण्याची नामी संधी असनू, ज्यामध्ये ते थेट शासनाच्या मंचाद्वारे मागणी करू शकतात. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियमातील विशेषत्वाने नमदू केलेल्या दिव्यांग व्यक्ती शासनाच्या मंचावर विस्तृतपणे नोंदणी करून त्यांना आवश्यक ती मदत तथा सहकार्य मिळवू शकतात.

1) संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग आणि त्यांना देणगी देऊ इच्छिणाऱ्या देणगीदारांना एकाच पोर्टलखाली नोंदणी करणे आणि त्यांचे समर्थन करणे. 2) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांच्या महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळांच्या योजनांची माहिती देणे. 3) विविध प्रकारच्या माहितीच्या आधारे दिव्यांगाची परीस्थिती आणि गरजा समजून घेणे. 4) दिव्यांग, अशासकीय संघटना, समाजसेवक आणि देणगीदार या सर्वांना एकाच छताखाली आणणे.

काय मिळणार मोफत?

– श्रवणयंत्र

– व्हिलचेअर

– कृत्रिम अवयव

– जयपूर फुट

– तीनचाकी सायकल

– अंध काठी

– कुबड्या

– ब्रेल किट

इतर बातम्याः

Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!

महाराष्ट्राचा महापिता कर्नाटकाच्या मातीत एकाकी, समाधीवर साधे छप्परही नाही; पानिपतकारांच्या डोळ्यांत पाणी, पोटात गोळा!

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.