Nashik Police: नाशिक पोलिस आयुक्तांचा आणखी एक दणका! धार्मिक स्थळांबाबत आता नेमका काय निर्णय घेतला?

नाशिकच्या पोलीस आयुक्त दीपक पांडये यांचा आणखी एक दणका दिलाय. धार्मिक स्थळांवर लावलेल्या भोंगयांचे डेसीबील मोजण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.

Nashik Police: नाशिक पोलिस आयुक्तांचा आणखी एक दणका! धार्मिक स्थळांबाबत आता नेमका काय निर्णय घेतला?
दीपक पांडेय Image Credit source: ANI
Follow us
| Updated on: Apr 19, 2022 | 8:25 AM

नाशिक : राज ठाकरेंनी दिलेल्या भोंग्याबाबतच्या अल्टिमेटननंतर महत्त्वपूर्ण बातमी नाशिकमधून समोर येते आहे. नाशिकचे पोलीस आयुक्त (Nashik Police Commissioner) दीपक पांडेय (Deepak Pandey) यांचा आणखी एक दणका दिलाय. धार्मिक स्थळांवर लावलेल्या भोंगयांचे डेसीबील (Loud speaker DB) मोजण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पोलीस अधिकाऱ्यांची संयुक्त टीम आवाज मोजण्याचं काम करणार आहेत. पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना डेसीबल मोजण्यासाठी विशेष ट्रेनिंग देण्यात येणार आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पोलीस अधिकारी एकत्रितपणे धार्मिक स्थळांवरच्या भोंग्यांचे डेसीबल मोजणार आहे. नादुरुस्त असलेल्या डेसीबल मोजण्याच्या मशीन तात्काळ दुरुस्त करून घेण्याचे प्रदूषण मंडळाला आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.

तर कारवाई अटक!

सर्व मशिदींवरील भोंगे 3 मे पर्यंत काढावेत, असं आवाहन नाशिक पोलिस आयुक्तांनी सोमवारी (18 एप्रिल) रोजी केलं होतं. टीव्ही 9 मराठीसोबत बोलताना नाशिक पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांनी म्हटलं होतं की तीन मे पर्यंत मशिदींवरील भोंगे काढले नाहीत तर त्यावर थेट कारवाईते आदेश देण्यात आले आहे. नियमाचं उल्लंघन केल्यास चार महिने ते एक वर्ष तुरूंगवासाची शिक्षा असेल. सर्व मशिदींवर भोंग्यांसाठी परवाणगी घेणे बंधनकारक आहे.

…म्हणून निर्णय

अजानपूर्वी 15 मिनिटं, 100 मीटरवर हनुमान चालीसा लावता येईल. परवानगी न घेतल्यास पोलिसांकडून कारवाई करण्यात येईल, असंही त्यांनी म्हटलंय. सामाजिक सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचं पांडेय यांनी म्हटलंय. दरम्यान, मनसे आणि मुस्लीम समाजाचे पत्र आलं असल्याचंही त्यांनी म्हटलंय. या सर्वांसोबतच मी आयुक्त या नात्यानं भोंग्यांबाबत निर्णय घेतल्याचं आयुक्त दीपक पाण्डेय यांनी म्हटलंय.

पाहा दीपक पांडेय यांच्यासोबत केलेली EXCLUSIVE बातचीत

नाशिकचे नियम राज्यालाही लागू होणार? : पाहा Video

भोंगे चर्चेत का आले?

राज ठाकरे यांनी 3 मे पर्यंतचा अल्टिमेटम सरकारला दिला आहे. मशिदींवरील भोंग्यांचा अनेकांना त्रास होत असल्याचा दावा करत हे भोंगे बंद करण्याचा इशारा राज ठाकरेंनी दिला होता. अन्यथा भोंग्यांवरली अजानला हनुमान चालीसेनं प्रत्युत्तर देऊ, असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर महाविकास आघाडी सरकारही सतर्क झालंय. तर दुसरीकडे राज ठाकरेंच्या या भूमिकेचं भाजपच्या काही आमदारांकडूनही समर्थन केलं जातंय.

या सगळ्या घडामोडींमध्ये मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांची सोमवारी दुपारी बैठकही पार पडली होती. त्यानंतर आता धार्मिक स्थळांवर असलेल्या लाऊड स्पीकर किंवा भोंग्यांबाबत काय निर्णय घेतला जातो, याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय.

पाहा Video: राज ठाकरेंनी पुण्यातील पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हटलं?

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.