नाशिक – पुणे हायस्पीड रेल्वेवर दिल्लीत मंथन; पवार, दानवे, कोल्हे यांची काय झाली बैठक?

नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी एकूण 235 किलोमीटर लांबीचा लोहमार्ग टाकण्यात येणार आहे. नाशिक, नगर, पुणे जिल्ह्यात हा मार्ग जाणार आहे. या मार्गावर एकूण 24 स्थानके असणार आहेत.

नाशिक - पुणे हायस्पीड रेल्वेवर दिल्लीत मंथन; पवार, दानवे, कोल्हे यांची काय झाली बैठक?
नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेबाबत दिल्लीत शरद पवार, रावसाहेब दानवे, अमोल कोल्हे, रोहित पवार यांची बैठक झाली.
Follow us
| Updated on: Feb 09, 2022 | 1:06 PM

नाशिकः अवघ्या पावणेदोन तासांत नाशिकहून थेट पुण्याला (Nashik) पोहचते करणाऱ्या नाशिक-पुणे (Pune) सेमी हायस्पीड रेल्वे (railway) प्रकल्पाच्या संदर्भात आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि खासदार अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीमध्ये नवी दिल्ली येथे एक बैठक झाली. सध्या या प्रकल्पाचे काम अतिशय सुसाट सुरू आहे. नाशिक-पुणे सेमी हायस्पीड हा राज्य सरकारच्या महत्त्वांक्षी प्रकल्पांपैकी एक असल्याने त्याला गती देण्यात आली आहे. हा प्रकल्प पूर्णत्वास गेल्यानंतर नाशिक, पुणे, नगर या जिल्ह्यांतून सेमी हायस्पीड रेल्वे जाणार आहे. त्यासाठी नाशिक, नगर आणि पुणे जिल्ह्यातील 1 हजार 470 हेक्टर जमीन संपादित केली जात आहे.

खा. कोल्हेंचे ट्विट काय?

नाशिक – पुणे सेमी हायस्पीड रेल्वेबाबत नवी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, शरद पवार, खासदार अमोल कोल्हे, आमदार रोहीत पवार यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली. या प्रकल्पाला अधिक गती देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. दरम्यान, ही बैठक झाल्याची माहिती स्वतः खासदार अमोल कोल्हे यांनी ट्विट करून दिली आहे. अमोल कोल्हे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, ‘पुणे – नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या संदर्भात आज आदरणीय खा. श्री. शरदचंद्रजी पवार साहेब आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री श्री. रावसाहेब दानवे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये बैठक दिल्ली येथे संपन्न झाली.’ मात्र, या बैठकीत काही महत्त्वाचा निर्णय झाला का, याची माहिती त्यांनी दिली नाही.

कसा आहे प्रकल्प?

नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी एकूण 235 किलोमीटर लांबीचा लोहमार्ग टाकण्यात येणार आहे. नाशिक, नगर, पुणे जिल्ह्यात हा मार्ग जाणार आहे. या मार्गावर एकूण 24 स्थानके असणार आहेत. या मार्गामुळे नाशिक-पुणे अंतर फक्त पावणेदोन तासांत काटले जाणार असून, ही रेल्वे प्रतितास 200 किलोमीटर वेगाने धावणार आहे. या कामासाठी जवळपास 1500 कोटींच्या निधींची गरज आहे. दरम्यान, दुसरीकडे या रेल्वेच्या कामासाठी जमीन देण्यास काही शेतकऱ्यांनी विरोध केला आहे.

काय आहेत वैशिष्ट्ये?

– 235 किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग

– रेल्वे मार्ग पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातून जाणार

– रेल्वेचा 200 किलोमीटर प्रति तास वेग

– पुढे हा वेग 250 कि. मी. पर्यंत वाढविणार

– पुणे-नाशिक अंतर अवघ्या पाऊणे दोन तासात कापणार

– वेळेसह इंधनाची बचत त्यामुळे पर्यावरण पूरक प्रकल्प

– पुणे-नाशिक दरम्यान 24 स्थानकांची आखणी

– 18 बोगदे, 41 उड्डाण पूल, 128 भूयारी मार्ग प्रस्तावित

कसा होणार खर्च?

– प्रवासी आणि मालवाहतूक चालणार

– रेल्वे स्थानकात प्रकल्पबाधितांसह

– स्थानिकांना व्यवसायासाठी प्राधान्य

– प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रोजगारांच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार

– प्रकल्पाच्या खर्चात 60 टक्के वित्तीय संस्था

– 20 टक्के राज्य सरकार, 20 टक्के रेल्वेचा वाटा

– कमी खर्चात प्रकल्प मार्गी लागणार

– विद्युतीकरणासह एकाचवेळी दोन्ही रेल्वे लाईनचे बांधकाम होणार

इतर बातम्याः

भोगी विषयांचा सोहळा; घोरपडीचे गुप्तांग, साळिंदराच्या काट्याची पूजा भांडारात विक्री, राज्यव्यापी कनेक्शन

Nashik | महापालिकेच्या कोषागार विभागात घोटाळा, नियमित भरण्यावरच डल्ला, नेमके प्रकरण काय?

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.