कोट्यवधींची उड्डाणे घेणाऱ्या साहित्य संमेलनाचा हिशेब द्या; नाशिकमध्ये निमंत्रकांना घरचा आहेर

नाशिकच्या साहित्य संमेलनासाठी आमदारांनी प्रत्येक दहा-दहा लाख रुपये दिले. महापालिकेने 25 लाख रुपये दिले. सरकारने 50 लाखांचे अनुदान दिले. उद्योजक, व्यापारी, संस्थाकडून कोट्यवधींचा निधी उभारला गेला. मात्र, दुसरीकडे विद्रोही साहित्य संमेलन हे मूठभर धान्य आणि एक रुपया विद्रोहीसाठी या मोहिमेतून निधी उभारून झाले आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनही असे साधे व्हावे. या संमेलनाला शासनाने 50 लाख रुपयांचे अनुदान देणे बंद करावे, अशी मागणी होत आहे.

कोट्यवधींची उड्डाणे घेणाऱ्या साहित्य संमेलनाचा हिशेब द्या; नाशिकमध्ये निमंत्रकांना घरचा आहेर
नाशिकमध्ये झालेल्या साहित्य संमेलनाचा लोगो.
Follow us
| Updated on: Mar 02, 2022 | 12:35 PM

नाशिकः डिसेंबर महिन्यात झालेल्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा हिशेब सादर करा, असा घरचा आहेर स्वागत समितीच्या सदस्यांनी निमंत्रकांना दिला आहे. नाशिकमधील (Nashik) कविवर्य कुसुमाग्रज नगरी, मेट भुजबळ नॉलेज सिटी कॅम्पस्, आडगाव येथे 3 ते 5 डिसेंबर दरम्यान हे साहित्य संमेलन झाले. या संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ व विज्ञान लेखक डॉ. जयंत नारळीकर होते (Jayant Narlikar), तर स्वागताध्यक्ष म्हणून नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) होते. संमेलनाचे उद्घाटन कादंबरीकार विश्वास पाटील, गीतकार जावेद अख्तर यांच्या उपस्थितीमध्ये झाले. संमेलनासाठी अक्षरशः कोट्यवधी रुपयांचा निधी जमवण्यात आला. मात्र, त्याचा हिशेब अजून देण्यात आलेला नाही. त्यामुळे स्वागत समितीतील सदस्यच आक्रमक झालेत.

निमंत्रकांना झाडले

साहित्य संमेलन होऊन तीन महिने उलटले आहेत. त्यामुळे या संमेलनाचा हिशेब नाशिककर आणि देणगीदारांपुढे मांडावा, अशी मागणी संमलेनाचे स्वागत समिती सदस्य श्रीकांत बेणी यांनी केली आहे. बेणी यांनी एक पत्रक काढले आहे. त्यात ते म्हणतात की, साहित्य संमेलनाला शासनाने 50 लाखांचा निधी दिला. भुजबळ स्वतः स्वागताध्यक्ष होते. त्यामुळे जागेचा प्रश्न नव्हता. या संमेलनासाठी आमदारांकडून प्रत्येक दहा लाख, नाशिक महापालिका, मुक्त विद्यापीठ, सहकारी बँका, उद्योजक, बांधकाम व्यावसायिक, पुस्तक प्रदर्शन, स्टॉल्स आदींमधून कोट्यवधी रुपयांचा निधी उभारला. याचा हिशेब द्यावा, अशी मागणी बेणी यांनी साहित्य संमेलनाचे निमंत्रक आणि लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर यांच्याकडे केली आहे. मात्र, जातेगावकर यांनी येत्या पंधरा दिवसांत हा हिशेब देऊ असे म्हटले आहे. जानेवारी 2022 पर्यंतचे ऑडिट झाले आहे. उर्वरित काम लवकरच होईल आणि हिशेब जाहीर करू, असे म्हटले आहे.

विद्रोही संमेलन फक्त साडेपाच लाखांत

नाशिकमध्ये अखिल भारतीय साहित्य संमेलन झाले, त्याच काळ मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या के. टी. एच. एम. महाविद्यालयाच्या आवारात 15 वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन झाले. या संमेलनाचा हिशेब समन्वयक राजू देसले यांनी जाहीर केला आहे. अवघे 5 लाख 63 हजार 937 रुपयांत हे संमेलन पार पडले. या संमेलनासाठी उपस्थित कोणत्याही पाहुण्यांना मानधन देण्यात आले नव्हते, असेही त्यांनी सांगितले.

संमेलनाचे अनुदान बंद करा

नाशिकच्या साहित्य संमेलनासाठी आमदारांनी प्रत्येक दहा-दहा लाख रुपये दिले. महापालिकेने 25 लाख रुपये दिले. सरकारने 50 लाखांचे अनुदान दिले. उद्योजक, व्यापारी, संस्थाकडून कोट्यवधींचा निधी उभारला गेला. मात्र, दुसरीकडे विद्रोही साहित्य संमेलन हे मूठभर धान्य आणि एक रुपया विद्रोहीसाठी या मोहिमेतून 73 हजार रुपये जमा करून झाले. छोट्या देणग्यातून उर्वरित निधी उभारला. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनही असे साधे व्हावे. या संमेलनाला 50 लाख रुपयांचे अनुदान देणे बंद करावे, अशी मागणी करणारा ठराव विद्रोही साहित्य संमेलनात करण्यात आला आहे.

इतर बातम्याः

चर्चा तर होणारच: केंद्रीय मंत्री भागवत कराडांच्या दौऱ्याचे नाशिकमध्ये ‘कुर्रर्रर’ राजकीय नाट्य…!

कापडणीस पिता-पुत्राचा 4 जणांनी केला मर्डर; नाशिकमधील शेअर्स कंपनीच्या मॅनेजरचा सहभाग

चिन्मय, पूजा, सिद्धार्थला सुविचार गौरव पुरस्कार; जयंत पाटलांच्या हस्ते 10 मान्यवरांचा नाशिकमध्ये होणार सन्मान

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.