Nashik | नाशिकमध्ये काळारामांच्या चरणी शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर

नाशिकमध्ये मंदिरे खूप आहेत. त्यातही रामाच्या मंदिरांचे प्रमाण जास्त आहे. काळाराम, गोरा राम, मुठ्यांचा राम, बायकांचा राम. मात्र, या मंदिराला मोठा सामाजिक वारसाही लाभला आहे.

Nashik | नाशिकमध्ये काळारामांच्या चरणी शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर
नाशिकमध्ये शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांनी काळाराम मंदिराचे दर्शन घेतले.
Follow us
| Updated on: Feb 10, 2022 | 1:44 PM

नाशिकः नाशिक (Nashik) येथील सुप्रसिद्ध अशा काळाराम मंदिरात (Kalaram Temple) गुरुवारी शिवसेना (Shiv Sena) नेते मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांनी दर्शन घेतले. संस्थानच्या वतीने नार्वेकर यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार सुहास कांदे यांची उपस्थिती होती. काळाराम मंदिर सरदार रंगराव ओढेकर यांनी सन 1782 मध्ये जुन्या लाकडी मंदिराच्या जागेवर बांधले आहे. प्रभू रामचंद्र आपल्या वनवासादरम्यान ज्या जागी राहिले, त्या ठिकाणी हे मंदिर आहे, असे मानले जाते. या मंदिराच्या उभारणीसाठी 2000 कारागीर 12 वर्ष राबले. पश्चिम भारतातील प्रभू रामचंद्राच्या सुंदर मंदिरांपैकी हे मंदिर आहे. 245 फूट लांब व 145 फूट रुंद मंदिर परिसराला 17 फूट उच दगडाची भिंत आहे. मंदिरासाठी सर्व बाजुंनी मोकळा असलेला स्वतंत्र सभामंडप आहे. मंदिरात प्रभू रामचंद्र, सीता, लक्ष्मण यांच्या काळ्या पाषाणातील 2 फूट उंचीच्या मूर्ती आहेत. चैत्र महिन्यात येथे रामनवमीचा उत्सव आयोजित करण्यात येतो.

अन् मंदिराकडे वळले…

शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर हे गुरुवारी गानसम्राज्ञी आणि भारतरत्न लता मंगेशकर यांच्या अस्थी विसर्जन करण्यासाठी नाशिकमध्ये आले होते. लतादीदींच्या अस्थी गोदातीरावरील रामकुंडात विसर्जित करण्यात आल्या. यावेळी रसिकांनी मोठी गर्दी केली होती. अतिशय भावपूर्ण वातावरण लतादीदींच्या अस्थींचे आदिनाथ मंगेशकर यांनी विसर्जन केले. अस्थी विसर्जनानंतर नार्वेकर यांनी काळाराम मंदिराला भेट दिली. मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी शिवसेना आमदार सुहास कांदे यांची उपस्थिती होती. यावेळी संस्थानच्या वतीने नार्वेकर यांचे एक कॅलेंडर देऊन स्वागत करण्यात आले.

सामाजिक वारसा

नाशिकमध्ये मंदिरे खूप आहेत. त्यातही रामाच्या मंदिरांचे प्रमाण जास्त आहे. काळाराम, गोरा राम, मुठ्यांचा राम, बायकांचा राम. मात्र, या मंदिराला मोठा सामाजिक वारसाही लाभला आहे. दलितांना मंदिरात प्रवेश नव्हता. त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली मोठा लढा उभारण्यात आला. मात्र, या लढ्याला यश मिळाले नाही. त्यामुळे डॉ. आंबेडकरांनी नाशिक जिल्ह्यातल्या येवला येथे हिंदू धर्मात जन्माला आलो, तरी हिंदू धर्मात मरणार नाही, अशी घोषणा केली. पुढे या मंदिरात दलितानांही प्रवेश मिळाला.

इतर बातम्याः

Kumar Vishvas Birth Day Special | सृजन का बीज हूँ, जाया हो नही सकता, 10 वर्ष राजकारण, हजारो वर्ष कविता!!

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!

Nashik | महापालिकेच्या कोषागार विभागात घोटाळा, नियमित भरण्यावरच डल्ला, नेमके प्रकरण काय?

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.