Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सीताराम कुंटे अ‍ॅक्शन मोडमध्ये, महापालिका आयुक्तांसह पोलीस आयुक्तांची कानउघडणी

नागरिक नियम पाळत नसतील, तर कठोर कारवाई करा, असे आदेश सीताराम कुंटे यांनी प्रशासनाला दिले आहेत. (Nashik Corona Update)

सीताराम कुंटे अ‍ॅक्शन मोडमध्ये, महापालिका आयुक्तांसह पोलीस आयुक्तांची कानउघडणी
Follow us
| Updated on: Mar 13, 2021 | 12:25 PM

नाशिक : नाशिक जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी नाशिककरांना ‘लास्ट वॉर्निंग’ दिली आहे. जर नाशिककरांनी नियम पाळले नाहीत, तर लॉकडाऊन अटळ आहे. त्यामुळे निर्बंध पाळण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. नाशिकमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर आणि जिल्ह्यात कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. नाशिक शहरातील सर्व शाळा 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत. (Nashik Corona Update Strict restrictions)

नाशिकमध्ये कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे. यानुसार नाशिकमधील दुकानं, बाजारपेठा, धार्मिक स्थळं, आस्थापना बंद राहणार आहेत. तसेच नाशिकमधील हॉटेल आणि बार 50 टक्के क्षमतेने सुरु राहणार आहेत. सर्व नागरिकांनी निर्बंध पाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी केले आहे.

जर हे नियम पाळले नाहीत, तर लॉकडाऊन अटळ आहे. त्यामुळे नाशिककरांनी ही लास्ट वॉर्निंग समजावी. दरम्यान या नियमांचं उल्लंघन केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असे सुरज मांढरे यांनी सांगितले.

“…तर कठोर कारवाई करा”

तर दुसरीकडे नाशिकचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांची कानउघडणी केली आहे. कंटेन्मेंट झोन हे फक्त कागदावर नको, याचे निर्बंध काटेकोर हवेत. नाशिक, धुळे, नंदुरबार यासंह अनेक ठिकाणी परिस्थिती बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर नागरिक नियम पाळत नसतील, तर कठोर कारवाई करा, असे आदेश सीताराम कुंटे यांनी प्रशासनाला दिले आहेत.

नाशिकची कोरोना स्थिती काय? 

नाशिक शहरात 263 कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नाशिक शहरातील कोरोना रुग्णांची संख्या ही 40 हजार 899 इतकी झाली आहे. तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याशिवाय नाशिक महापालिका परिसरात 715 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे नाशिकमध्ये 88 हजार 989 कोरोना रुग्णा आहे. दरम्यान नाशिकमध्ये आतापर्यंत 2087 रुग्णांचा मृत्यू आहे. तर सद्यस्थितीत 5272 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. (Nashik Corona Update Strict restrictions)

नाशिकमध्ये कोरोना लसीचा तुटवडा 

नाशिकमध्ये  कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा आहे. त्यामुळे महापालिकेकडून आणखी दीड लाख डोसची मागणी करण्यात आली आहे. महापालिका केंद्रासह शहरात खाजगी ठिकाणी देखील तुटवडा जाणवत आहे. नाशिक महापालिकेने आतापर्यंत 50,700 लस दिल्या आहेत. मात्र नागरिकांचा प्रतिसाद असताना लसीचा पुरवठा तात्काळ व्हावा अशी मागणी केली जात आहे.

कोणकोणत्या जिल्ह्यात लॉकडाऊन? 

राज्यातील अनेक जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात येत आहे. तर काही ठिकाणी नाईट कर्फ्यू किंवा कडक निर्बंध लावले जात आहेत. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यात हे निर्बंध लागू करण्यात आले आहे. नागपूर, पुणे, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिक, औरंगाबाद याशिवाय अनेक ठिकाणी कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर कोरोनाची साखळी तोडण्यासाठी स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून कठोर निर्बंध लादण्यात येत आहेत.

  • परभणी जिल्ह्यात 2 दिवसांचा लॉकडाऊन
  • नागपूरमध्ये येत्या 15 मार्चपासून ते 21 मार्चपर्यंत कडक लॉकडाऊन
  • जळगाव जिल्हा प्रशासनाने 12 ते 14 मार्च दरम्यान जनता कर्फ्यू
  • मीरा भाईंदरमध्ये कोरोना हॉटस्पॉट क्षेत्रात 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन जाहीर

राज्यातील कोरोना स्थिती काय? 

राज्यात काल (12 मार्च) 15 हजार 817 नव्या कोरोनाबाधित रुग्णांचे नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 22 लाख 82 हजार 191 इतकी झाली आहे. तर राज्यात आज 56 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.31 % एवढा आहे.

राज्यात काल 11,344 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, तर राज्यात आजपर्यंत एकूण 21,17,744 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 92.79% एवढे झाले आहे. (Nashik Corona Update Strict restrictions)

संबंधित बातम्या : 

7th Pay Commission : नागपूर एम्समध्ये थेट भरती! 2 लाखांची वेतनश्रेणी आणि भत्त्याचा लाभ

लॉकडाऊनपेक्षा मृत्यूदर कसा कमी करता येईल याचे नियोजन करा, बाळा नांदगावकरांचा सल्ला

कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार
कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार.
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण...
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण....
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही..
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही...
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?.
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे...
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे....
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?.
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?.
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी.
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात.
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती.