Nashik Sports Awards | नाशिक जिल्हा क्रीडा पुरस्कारांची घोषणा; कोणत्या गुणवंत खेळाडूंचा होणार गौरव?

जिल्हा क्रीडा पुरस्काराचे वितरण दरवर्षी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी करण्यात येते. मात्र, यंदा कोरोनाच्या वाढत्या प्रार्दूभावामुळे कोरोना निर्बंध शिथिल झाल्यानंतर या करण्यात येणार आहे.

Nashik Sports Awards | नाशिक जिल्हा क्रीडा पुरस्कारांची घोषणा; कोणत्या गुणवंत खेळाडूंचा होणार गौरव?
डावीकडून अनुक्रमे ऐश्वर्या शिंदे, रवींद्र कडाळे, गौरी गर्जे, शरद पाटील.
Follow us
| Updated on: Jan 25, 2022 | 10:49 AM

नाशिकः नाशिक जिल्ह्यात 2021 च्या जिल्हा क्रीडा पुरस्कारांची (Sports Awards) घोषणा करण्यात आली असून, यात 4 गुणवंत खेळाडूंचा गौरव केला जाणार आहे. या पुरस्काराचे वितरण दरवर्षी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी करण्यात येते. मात्र, यंदा कोरोनाच्या वाढत्या प्रार्दूभावामुळे कोरोना निर्बंध शिथिल झाल्यानंतर खेळाडूंचा गौरव करण्यात येणार असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक यांनी कळवले आहे.

चार प्रकारांत गौरव

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नाशिकव्दारा दरवर्षी हे पुरस्कार देण्यात येतात. जिल्ह्यातील खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक यांनी क्रीडा क्षेत्रात केलेल्या कार्याचे तसेच योगदानाचे मूल्यमापन होवून त्यांचा गौरव व्हावा व त्यांना क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, या करिता हा जिल्हा क्रीडा पुरस्कार देण्यात येतो. जिल्हा क्रीडा पुरस्काराचे स्वरुप प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह, रोख रुपये 10 हजार असे आहे. 24 जानेवारी 2020 रोजीच्या शासन निर्णयानुसार सुधारित तरतुदीनुसार जिल्हा क्रीडा पुरस्काराचे गुणवंत खेळाडू-पुरुष व महिला व दिव्यांग खेळाडू, गुणवंत क्रीडा मार्गदर्शक या चार प्रकारामध्ये वितरण करण्यात येते.

एकूण 18 अर्ज प्राप्त

जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी गुणवंत खेळाडू पुरुष, महिला आणि दिव्यांग खेळाडू, गुणवंत क्रीडा मार्गदर्शक यासाठी जिल्हाभरातून अर्ज मागविण्यात आले होते. यात गुणवंत खेळाडू पुरस्कारासाठी 15, गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कारासाठी 01 व दिव्यांग खेळाडू पुरस्कारासाठी 02 असे एकूण 18 अर्ज प्राप्त झालेले आहेत. या अर्जांची जिल्हा क्रीडा पुरस्कार छाननी समिती मार्फत छाननी करण्यात आली असून, यात एक पुरूष खेळाडू एक महिला खेळाडू एक क्रीडा मार्गदर्शक व एक दिव्यांग खेळाडू असे एकूण चार पुरस्कार जाहीर करण्यात आले असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक यांनी सांगितले आहे.

या खेळाडूंचा होणार गौरव

1) गुणवंत खेळाडू पुरस्कार महिला – ऐश्वर्या सुधाकर शिंदे – दौलत नगर, सोयगाव ता. मालेगाव – बेसबॉल

2) गुणवंत खेळाडू पुरस्कार पुरुष – रवींद्र ज्ञानेश्वर कडाळे – मु. पो. पाचोरे वणी, ता. निफाड – कॅनोईंग व कयाकिंग

3) गुणवंत खेळाडू पुरस्कार – दिव्यांग खेळाडू – गौरी सुनील गर्जे – सातपूर, नाशिक – पॅरा जलतरण

4) गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार – शरद भास्करराव पाटील – पंचवटी, नाशिक – कबड्डी

इतर बातम्याः

Balasaheb Thackeray | उभ्या महाराष्ट्रावर गारूड करणारा बाळासाहेब नावाचा झंझावात…!

Nashik Trees | पर्यावरण मंत्र्यांच्या एका सूचनेमुळे 200 वर्षे पुरातन वटवृक्षासह 450 झाडे वाचणार, प्रकरण काय?

Jitendra Awhad | नाशिक महापालिकेने म्हाडाचे 700 कोटींचे नुकसान केले; आव्हाडांचा हल्लाबोल, चौकशी

Non Stop LIVE Update
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार.
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात.
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?.
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी.
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?.
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?.
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'.
महायुतीला बहुमत, आता मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?
महायुतीला बहुमत, आता मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?.
'सुपडासाफ, रात्री 3 पर्यत सभा घेतल्या पण...', भुजबळांची जरांगेंवर टीका
'सुपडासाफ, रात्री 3 पर्यत सभा घेतल्या पण...', भुजबळांची जरांगेंवर टीका.
Result 2024: तुफान मुसंडी, 2014 हून मोठी लाट, पहिल्यांदाच असं काय घडल?
Result 2024: तुफान मुसंडी, 2014 हून मोठी लाट, पहिल्यांदाच असं काय घडल?.