Nashik | आरोग्य विद्यापीठाने देशात आदर्श निर्माण केला; राज्यपालांकडून कौतुक, 98 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक!

अध्यक्षीय भाषणात कुलपती तथा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी म्हणाले की, कोविड - 19 च्या काळात आरोग्य विद्यापीठाने उल्लेखनीय काम केले याबद्दल मला अभिमान आहे. या परिस्थितीत ऑफलाइन पध्दतीने प्रत्यक्ष परीक्षा घेऊन विद्यापीठाने राष्ट्रीय स्तरावर आदर्श निर्माण केला आहे.

Nashik | आरोग्य विद्यापीठाने देशात आदर्श निर्माण केला; राज्यपालांकडून कौतुक, 98 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक!
राज्यपालांच्या उपस्थितीत आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ झाला.
Follow us
| Updated on: Mar 02, 2022 | 4:53 PM

नाशिकः नाशिक (Nashik) येथील महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाने देशात आदर्श निर्माण केला आहे, असे मत व्यक्त करत विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी बुधवारी आयोजित दीक्षांत समारंभात कौतुकाचा वर्षाव केला. विद्यापीठाचा 21 वा दीक्षांत समारंभ ऑनलाइन पद्धतीने कोश्यारी यांच्या अध्यक्षेतखाली झाला. या कार्यक्रमास प्रति-कुलपती तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh), प्रमुख पाहुणे म्हणून नवी दिल्ली येथील भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे महासंचालक तथा केंद्र सरकारच्या आरोग्य संशोधन विभागाचे सचिव प्रा. डॉ. बलराम भार्गव. कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर, प्रति-कुलगुरू डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता डॉ. सचिन मुंब्रे, डॉ. जयंत पळसकर, डॉ. श्रीकांत देशमुख, डॉ. धनाजी बागल, डॉ. राजश्री नाईक, परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक, वित्त व लेखाधिकारी एन.व्ही. कळसकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

राष्ट्रीय स्तरावर आदर्श…

अध्यक्षीय भाषणात कुलपती तथा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी म्हणाले की, कोविड – 19 च्या काळात आरोग्य विद्यापीठाने उल्लेखनीय काम केले याबद्दल मला अभिमान आहे. या परिस्थितीत ऑफलाइन पध्दतीने प्रत्यक्ष परीक्षा घेऊन विद्यापीठाने राष्ट्रीय स्तरावर आदर्श निर्माण केला आहे. आरोग्य आणि शिक्षण या मुलभूत गोष्टींने समाजाचा विकास होतो. विद्यापीठ हे संशोधनाचे केंद्र असावे. आरोग्य क्षेत्रात नवनवीन संकल्पना पुढे असून, याबाबत समतोल राखण्याकरिता समाजाच्या आवश्यकतेनुसार विद्यापीठाने अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून प्रगती साध्य करावी. समाजाच्या आरोग्य हिताच्या दृष्टीने सर्व विद्याशाखांनी एकत्र येऊन भरीव कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

नवे कीर्तीमान घडवा…

कोश्यारी पुढे म्हणाले की, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात विद्यापीठाने विविध सामाजिक व संशोधानात्मक उपक्रमांना प्राधान्य द्यावे. नवीन कीर्तीमान भारत घडविण्यासाठी प्रत्येकाचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रातील कला आत्मसात कराव्यात. जेणेकरुन भावी डॉक्टरांचे व्यक्तिमत्व अधिक चांगले होईल. विद्यार्थ्यांनी ‘राष्ट्र देवो भव’ उक्तीप्रमाणे कार्य करावे. प्रत्येक रुग्णांची सेवा ही राष्ट्राची सेवा आहे, अशा भावनेने काम केल्यास खरी समाजसेवा होईल असे, आवाहन त्यांनी केले.

कुलगुरूंकडून अहवाल सादर…

विद्यापीठाचा अहवाल सादर करताना कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर म्हणाल्या की, कोविड-19 साथीच्या काळात विद्यापीठाकडून सर्व उन्हाळी आणि हिवाळी परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात आल्या. ऑफलाइन परीक्षा यशस्वीपणे घेणारे आरोग्य विज्ञान हे एकमेव विद्यापीठ आहे. प्रत्येक परीक्षा केंद्राला कोविड खबरदारी वाढवण्यासाठी विद्यापीठाकडून आर्थिक सहाय्य देण्यात आले आणि कोविड सुरक्षा कवच ही आर्थिक योजना संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यापीठ अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी लागू करण्यात आल्याचे सांगितले.

10,068 विद्यार्थ्यांना पदवी…

एकविसाव्या दीक्षांत समारंभात विविध विद्याशाखांच्या पदविका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या व आंतरवासियता पूर्ण केलेल्या आरोग्य शाखांच्या 10,068 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आल्या. विविध विद्याशाखांमधील गुणवत्ता प्राप्त केलेल्यांना 98 सुवर्णपदक, एक विद्यार्थ्यास रोख रक्कम पारितोषिक, संशोधन अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या 39 विद्यार्थ्यांना पीएच.डी. प्रदान करण्यात आली. दीक्षांत समारंभात आधुनिक वैद्यक विद्याशाखा पदवीचे 513, दंत विद्याशाखा पदवीचे 2041, आयुर्वेद विद्याशाखेचे 1021, युनानी विद्याशाखेचे 70, होमिओपॅथी विद्याशाखेचे 936, बेसिक बी.एस्सी. नर्सिंग 1744, पीबी बी. एस्सी. नर्सिंग विद्याशाखेचे 336, बी.पी.टी.एच. विद्याशाखेचे 150, बी.ओ.टी.एच. विद्याशाखेचे 14, बी.ए.एस.एल.पी. विद्याशाखेचे 31, बी.पी.ओ. विद्याशाखेचे 03, डिप्लोमा इन ऑप्टोमेट्री विद्याशाखेचे 06 विद्यार्थ्यांना तसेच पदव्युत्तर विद्याशाखेतील एम. डी. मेडिकल विद्याशाखेचे 2141, पी. जी. दंत 461, पी.जी. आयुर्वेद 93, पी.जी. होमिओपॅथी 53, पी.जी. युनानी 04, पी.जी. डी.एम.एल.टी. 78, पॅरामेडिकल 104, पी.जी. अलाईड (तत्सम) 272 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली आहे. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले.

इतर बातम्याः

Nashik | गाडगेबाबांच्या धर्मशाळेत 85 वर्षांपासून अविरत अन्नछत्र; वंचिताचा अनोखा आधारवड!

कोट्यवधींची उड्डाणे घेणाऱ्या साहित्य संमेलनाचा हिशेब द्या; नाशिकमध्ये निमंत्रकांना घरचा आहेर

Nashik Corona | कोरोना संपलाय म्हणता ना, पण नाशिकमध्ये पुन्हा 10 मृत्यू!

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.