Nashik | प्रभाग रचनेचा अहवाल आज निवडणूक आयोगाकडे सादर; ओबीसी आरक्षण निकालाचा काय होणार परिणाम?

नाशिक महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना यापूर्वी एकदा बदलण्यात आलीय. सुरुवातीला 122 नगरेसवक गृहीत धरून ही रचना करण्यात आली. मात्र, राज्य सरकारने लोकसंख्या वाढल्याचे कारण पुढे करत नगरसेवकांची संख्या 133 पर्यंत नेली. त्यामुळे तयार झालेला आराखडा बदलावा लागला. नव्याने आराखडा तयार करण्यात आला. यात बराच वेळ लागला. आता ओबीस आरक्षणाच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यावर काही वेगळा निर्णय आला, तर...

Nashik | प्रभाग रचनेचा अहवाल आज निवडणूक आयोगाकडे सादर; ओबीसी आरक्षण निकालाचा काय होणार परिणाम?
Nashik Municipal Corporation
Follow us
| Updated on: Jun 17, 2022 | 5:52 PM

नाशिकः नाशिक (Nashik) महापालिकेच्या (municipal corporation) प्रभाग रचनेच्या हरकती आणि आक्षेपावर सुनावणी पूर्ण झाली असून, याबाबतचा अहवाल सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक अश्वीनकुमार मुदगुल हे आज बुधवारी राज्य निवडणूक (election) आयोगाकडे सादर करणार आहेत. प्रारूप प्रभाग रचेनवरच्या हरकती आणि आक्षेप ऐकूण घेण्यासाठी आयोगाने मुदगल यांना प्रतिनिधी म्हणून नेमले होते. त्यांच्यासह उपायुक्त अविनाश सणस, महापालिका आयुक्त कैलास जाधव, विभागीय महसूल आयुक्तांचे प्रतिनिधी संजय दुसाने, जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून हजर असलेले उपजिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांच्यापुढे याबाबत सुनावणी झाली. प्रत्येक हरकत स्क्रीनवर दाखवली गेली. याच्या नोंदी केल्या गेल्या. या सुनावणीचे व्हिडिओ चित्रीकरणही करण्यात आले आहे. यावरचा अहवाल आज निवडणूक आयोगाकडे सादर केला जाणार आहे.

अंतिम रचना कधी होणार जाहीर?

नाशिक महापालिकेच्या प्रभाग रचनेबाबत एकूण 211 हरकती नोंदवण्यात आल्या आहेत. त्यापैकी 201 हरकती या प्रभागाच्या हद्दीबाबत आहेत. बहुतांश इच्छुकांनी काही मातब्बर मंडळींनी स्वतःच्या सोयीसाठी प्रभागांची मोडतोड केल्याचा आरोप केलाय. यापूर्वीही एका नगरसेवकाच्या घरात बसून प्रभाग रचना तयार केल्याची चर्चा महापालिकेतच रंगली होती. आता येत्या 10 मार्चपर्यंत अंतिम प्रभाग रचना आराखडा जाहीर करण्यात येणार आहे.

आरक्षणावर वेगळा निर्णय आला तर…

नाशिक महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना यापूर्वी एकदा बदलण्यात आलीय. सुरुवातीला 122 नगरेसवक गृहीत धरून ही रचना करण्यात आली. मात्र, राज्य सरकारने लोकसंख्या वाढल्याचे कारण पुढे करत नगरसेवकांची संख्या 133 पर्यंत नेली. त्यामुळे तयार झालेला आराखडा बदलावा लागला. नव्याने आराखडा तयार करण्यात आला. यात बराच वेळ लागला. आता ओबीस आरक्षणाच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यावर काही वेगळा निर्णय आला, तर पुन्हा एकदा रचना बदलावी लागू शकते. पुन्हा प्रवर्ग निहाय आरक्षण, स्त्री-पुरुष वर्गवारी प्रसिद्ध केली जाईल. त्यावरही हरकती मागवण्यात येतील. त्यावर पुन्हा सुनावणी होईल.मात्र, तसे झाले तरी निवडणूक लांबणीवर पडणार नाही, याची दक्षता घेण्यात आल्याचे समजते.

अशी होणार निवडणूक…

– त्रिसदस्यीय पद्धतीने प्रभाग

– आता 133 नगरसेवक

– एकूण प्रभाग 44

– 43 प्रभाग 3 सदस्यीय

– 1 प्रभाग 4 सदस्यीय

पक्षीय बलाबल

– भाजप – 66 (एका नगरसेवकाचे निधन. सध्या 64)

– शिवसेना – 35 (सध्या 33)

– राष्ट्रवादी – 6

– काँग्रेस – 6

– मनसे – 5

– अपक्ष – 4

इतर बातम्याः

चर्चा तर होणारच: केंद्रीय मंत्री भागवत कराडांच्या दौऱ्याचे नाशिकमध्ये ‘कुर्रर्रर’ राजकीय नाट्य…!

कापडणीस पिता-पुत्राचा 4 जणांनी केला मर्डर; नाशिकमधील शेअर्स कंपनीच्या मॅनेजरचा सहभाग

चिन्मय, पूजा, सिद्धार्थला सुविचार गौरव पुरस्कार; जयंत पाटलांच्या हस्ते 10 मान्यवरांचा नाशिकमध्ये होणार सन्मान

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.