Nashik Water | नाशिकमध्ये आज पाणी नाही, कोणत्या भागात पुरवठा बंद, घ्या जाणून!

नाशिकमध्ये आज गुरुवारी पुन्हा एकदा पाण्याने दांडी मारली आहे. त्यामुळे नागरिकांना निर्जळीचा सामना करावा लागणार आहे.

Nashik Water | नाशिकमध्ये आज पाणी नाही, कोणत्या भागात पुरवठा बंद, घ्या जाणून!
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Jan 27, 2022 | 6:05 AM

नाशिकः नाशिकमध्ये (Nsahik) आज गुरुवारी पुन्हा एकदा पाण्याने दांडी मारली आहे. त्यामुळे नागरिकांना निर्जळीचा सामना करावा लागणार आहे. उपनगर नाका ते आम्रपाली झोपडपट्टी कालवा भागात जलवाहिनीची मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाली आहे. येथे दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या (Municipal Corporation) पाणीपुरवठा विभागाने कळवल्यानुसार नाशिकरोड परिसरातील अनेक भागात आज गुरुवारी पाणीपुरवठा (water supply) होणार नाही.

या भागात पाणी येणार नाही…

– प्रभाग क्रमांक 17 मध्ये… कालवा रस्ता परिसर, नारायण बापूनगर, गोदावरी सोसायटी, चंपानगरी, दसकगाव, शिवाजीनगर, एमएससीबी कॉलनी, टाकळीरोड, भीमनगर, तिरुपतीनगर या भागात पाणी येणार नाही.

– प्रभाग क्रमांक 18 मध्ये…शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी, अयोध्या कॉलनी, पवारवाडी, इंगळे चौक, पंचक गाव, सायाखेडा रस्ता, भगवा चौक, शिवशक्तीनगर या भागात पाणी येणार नाही.

– प्रभाग 19 मध्ये…गोरेवाडी, चेहडी, नाशिक-पुणे महामार्ग परिसर, एकलहरा रस्ता, सामनगाव, चाडेगाव पंपिंग परिसर या भागात आज गुरुवारी पाणी येणार नाही.

– प्रभाग 20 मध्ये…पुणे रस्ता, रामनगर, विजयनगर, शाहूनगर, लोकमान्यनगर, मोटवाणी रोड, कलानगर, आशानगर, जिजामातनगर या भागात आज पाणी येणार नाही.

– प्रभाग 21 मध्ये…जयभवानी रस्ता, सहाणे मळा, लवटेनगर एक आणि दोन, तोफखाना केंद्र रस्ता, दत्तमंदिर रस्ता, धोंडेनगर, जगताप मळा, तरण तलाव परिसर, चव्हाण मळा, फर्नांडिसवाडी, भालेराव मळा, जाचकनगर, नंदनवन कॉलनी, आवटेनगर, गोसावी वाडी, राजेंद्र कॉलनी, आनंदनगर, आडकेनगर या भागात पाणी येणार नाही.

– प्रभाग क्रमांक 22 मध्ये…रोकडोबावाडी, डोबी मळा, सुंदरनगर, डावखरवाडी, जयभवानी रस्ता, अश्विनी कॉलनी, जेतवननगर, बिटको महाविद्यालय तरण तलाव, सौभाग्यनगर, बागुलनगर, देवळाली गाव, मालधक्का रोड, गाडेकर मळा, एम.जी.रोड, गिते मळा, खर्जुल मळा, विहित गाव या भागात पाणी येणार नाही.

येथे 24 तास होणार पुरवठा

दुसरीकडे नाशिक-पंचवटीच्या गावठाण भागामध्ये म्हणजेच जुन्या नाशिकमध्ये नेहमी पाणी टंचाई जाणवते. त्याचे कारण म्हणजे इथे चोवीस तास पाणीपुरवठा होत नाही. हे पाहता महापालिका आयुक्त कैलास जाधव सक्रिय झाले आहेत. त्यांनी या भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी स्काडाचा प्रयोग राबविण्याची निर्णय घेतल्याचे समजते. या प्रयोगाने गावठाणात पाणी मोजणीचा मार्गही मोकळा होणार आहे.

इतर बातम्याः

Nashik MHADA | म्हाडा भूखंडात कोट्यवधींचा घोटाळा; मंत्री आव्हाडांचा सलग 2 ट्वीटमधून बॉम्बगोळा!

Nashik | ऑनलाईन शिक्षणाने मारले, 11 वीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या; 2 महिन्यांतली तिसरी घटना

National Children’s Award | 14 किलोमीटर खाडी 4 तास 9 मिनिटांत पोहून पार; ‘स्वयंम’च्या यशाने पंतप्रधानही भारावले…!

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.