Nashik weather | नाशकासह उत्तर महाराष्ट्रावरही ‘पाक’ संकट; द्राक्ष, आंबा, कांदा पीक संकटात? थंडी, धूळ कायम राहणार?
अतिशय झपाट्याने बदलेले हवामान आणि सात दिवसांपासून सुरू असलेल्या गारठ्यामुळे जिल्ह्यातील रब्बी हंगामातील पिके धोक्यात आली आहेत. गहू, हरभरा, भाजीपाला, कांदा, द्राक्ष यांच्यावर हवामानाचा गंभीर परिणाम होताना दिसून येत आहे.
नाशिकः पाकिस्तानच्या (Pakistan) कराचीत उठलेल्या धुळीच्या वादळाने आता थेट नाशिककरांच्या (Nashik) उंबऱ्यावर धडक दिल्याने चिंता वाढली आहे. मध्यरात्री ते भल्या पहाटे काही काळ पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. त्यामुळे वाहनांवर पांढरे डाग पडले. दृश्यमानतही कमी आहे. त्यात वाढलेल्या गारठ्याने नागरिक काकडले आहेत. विशेषतः अतिवृष्टीचे दणक्यावर दणके सहन करणारा शेतकरी पुन्हा एकदा धास्तावलाय. या विचित्र हवामानाच द्राक्ष, आंबा आणि कांदा पिकावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होतेय.
नेमकी कशीय स्थिती?
पाकिस्तानच्या कराचीमध्ये शनिवारी धुळीचे वादळ उठले. रविवारी त्याने गुजरातच्या दिशेने कूच केली. त्याचा तडाखा मुंबई, नाशिकला बसला. त्यात अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे नाशिकमध्ये पहाटेच हलक्या पावसाने हजेरी लावली. शहरातील हवेचा वेग वाढला असून, ताशी 16 ते 20 किमी वेगाने वारे वाहतायत. हवेत बाष्प आणि धुलिकन असल्यामुळे दृश्यमानता कमी झालीय. आगामी तीन दिवसांत महाराष्ट्र आणि गुजरातमधले किमान तापमान 2 ते 4 अंशाने घटून थंडी वाढण्याची शक्यता निर्माण झालीय. शिवाय येणाऱ्या 29 जानेवारीपासून उत्तर भारतातील हिमाचल, उत्तराखंड भागातील वातावरण बदलाचा फटका महाराष्ट्राला बसण्याची भीती व्यक्त होत आहे.
निफाड 5.5 अंश सेल्सिअसवर
नाशिकमधील निफाड पुन्हा एकदा या वातावरण बदलामुळे गारठले आहे. कुंदेवाडी येथील हवामान विभागात नीचांकी तापमानाची नोंद होत ते 5.5 अंश सेल्सिअल इतके नोंदवले आहे. त्यामुळे या गारठ्यातून ऊब मिळवण्यासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटवल्या जात आहेत. विशेषत वाफाळलेला चहा आणि गरमागरजम दूध प्यायला नागरिक हॉटेलमध्ये गर्दी करत आहेत. मात्र, अचानक बदलेल्या या वातावरणामुळे शेतकरी वर्ग पुन्हा एकदा धास्तावलेला दिसत आहे.
बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव
अतिशय झपाट्याने बदलेले हवामान आणि सात दिवसांपासून सुरू असलेल्या गारठ्यामुळे जिल्ह्यातील रब्बी हंगामातील पिके धोक्यात आली आहेत. गहू, हरभरा, भाजीपाला, कांदा, द्राक्ष यांच्यावर या हवामानाचा गंभीर परिणाम होताना दिसून येत आहे. शेतकरी पिकांवर वेगवेगळी औषध फवारत आहेत. त्यामुळे एकीकडे खर्च वाढलाय. तर दुसरीकडे धुक्यामुळे बुरशी, तांबेरा, करपा, भुरी, टिक्का, मावा, तुडतुडे या रोगाची भीती वाढली आहे. सध्या कांद्यावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिस आहेत. या हवामानामुळे लाखो रुपये खर्चून लावलेले कांदा पीक आणि द्राक्ष धोक्यात आल्याने शेतकऱ्यांच्या काळजाचा पुन्हा एकदा ठोका चुकला आहे.
इतर बातम्याः
Balasaheb Thackeray | उभ्या महाराष्ट्रावर गारूड करणारा बाळासाहेब नावाचा झंझावात…!