Nashik | महापालिकेच्या बजेटमध्ये दडलंय काय, आज होणार सादर, नाशिकरांना उत्सुकता!

नाशिक महापालिकेचे गेल्या वर्षीचे अंदाजपत्रक हे 2361 कोटींचे होते. हे अंदाजपत्रकही साधारणतः तितकेच राहण्याची शक्यता आहे.

Nashik | महापालिकेच्या बजेटमध्ये दडलंय काय, आज होणार सादर, नाशिकरांना उत्सुकता!
Nashik Municipal Corporation
Follow us
| Updated on: Feb 08, 2022 | 7:02 AM

नाशिकः नाशिक (Nashik) महापालिकेचे (Municipal Corporation) अंदाजपत्रक आज मंगळवारी आयुक्त कैलास जाधव सादर करणार आहेत. हे सहाव्या पंचवार्षिकमधील अखेरच्या वर्षाचे अंदाजपत्रक आहे. त्यात येणाऱ्या निवडणुका पाहता स्थायीकडून शहरवासीयांसाठी विविध आकर्षण घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खरे तर काल सोमवारीच अंदाजपत्रकीय सभा होणार होती. मात्र, भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनामुळे राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला. त्यामुळे विविध कार्यक्रमही आपसुकच रद्द करण्यात आले. त्यात नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा होणारा दीक्षांत समारंभही रद्द करण्यात आला. दीक्षांत समारंभ कधी होणार याची माहिती अजून नाही. मात्र, दुसरीकडे महापालिकेचे बजेट आज मंगळवारीच सादर होणार आहे.

घोषणांचा पाऊस असेल का?

नाशिक महापालिकेचे गेल्या वर्षीचे अंदाजपत्रक हे 2361 कोटींचे होते. हे अंदाजपत्रकही साधारणतः तितकेच राहण्याची शक्यता आहे. मात्र, महापालिकेचे उत्पन्न कमी आणि खर्च जास्त, अशी सध्याची परिस्थिती आहे. हे पाहता महापालिका आयुक्त कैलास जाधव हे करवाढ सुचवतात का, हे पाहावे लागेल. मात्र, त्यांनी करवाढ सुचवली तरीही ती मान्य होणे तूर्तास अवघड दिसते. कारण सध्या महापालिकेची निवडणूक तोंडावर आली आहे. ते पाहता नगरसेवकांचा त्याला विरोध होऊ शकतो. मात्र, या अंदाजपत्रकात स्थायी समितीकडून शहरवासीयांवर घोषणांची खैरात होऊ शकते. त्या कितीपत पूर्ण होतील, ही गोष्ट वेगळी.

निवडणूक कधी?

महापालिकेची निवडणूक मार्च अथवा एप्रिल महिन्यात होण्याची शक्यता वर्तवली जातेय. विद्यमान महापौर आणि उपमहापौरांची मुदत येत्या 15 मार्चला संपतेय. त्यापूर्वी एक मार्चला त्यांना नगरविकास विभागाकडून पत्र येईल आणि 20 एप्रिलनंतर कधीही निवडणूक जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. दरम्यान त्यापूर्वी नाशिक महापालिकेची प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. यावर 14 फेब्रुवारीपर्यंत आक्षेप नोंदवता येतील. महापालिकेच्या वतीने या हरकती 16 फेब्रुवारी रोजी निवडणूक आयोगाकडे सादर केल्या जातील. त्यानंतर 26 फेब्रुवारी रोजी राज्य निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांमार्फत या हरकती आणि सूचनांवर सुनावणी होईल. त्यानंतर 2 मार्च रोजी प्राधिकृत अधिकाऱ्यांनी केलेल्या शिफारशी या विहित नमुन्यात विवरण पत्रासह राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केल्या जातील आणि निवडणूक जाहीर होईल, अशी आहे.

इतर बातम्याः

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!

Lata Mangeshkar | अवघ्या 13व्या वर्षी पहिलं रेकॉर्डिंग! असा होता 80 वर्षांचा म्युझिकल प्रवास

Lata Mangeshkar | निर्विवाद तजेलदार! आईसाठी तर आवाज दिलाच, पण लेकीसाठीही लतादीदींनी गाणी गायली

(Nashik | What is hidden in NMC budget, will be presented today, curiosity to Nashik residents!)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.