OBC Reservation | ओबीसी आरक्षण विधेयकावर राज्यपालांनी का केली नाही सही, भुजबळ म्हणतात…!

छगन भुजबळ म्हणाले की, मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार साहेबांशी बोललो आहे. देवेंद्र फडणवीसांसोबत बोलणार आहे. शेवटी हा राज्यातील 7 ते 8 कोटी ओबीसींचा प्रश्न आहे.

OBC Reservation | ओबीसी आरक्षण विधेयकावर राज्यपालांनी का केली नाही सही, भुजबळ म्हणतात...!
chhagan bhujbal
Follow us
| Updated on: Feb 01, 2022 | 3:08 PM

नाशिकः राज्यपाल (Governor) भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी ओबीसी आरक्षण ( OBC Reservation) विधेयकावर का सही केली नाही, याचे उत्तर स्वतः मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिले आहे. राज्यपालांचा गैरसमज झाला असून, त्यामुळेच त्यांनी सही करायला नकार दिलाय. त्यामुळे आता दोन-तीन मंत्र्यांना घेऊन त्यांना भेटणार आहे, असे संकेतही त्यांनी दिले. भुजबळ म्हणाले की, आपण अगोदर ओबीसी अध्यादेश तयार केला होता. आयोग नेमून कामाला तयार झालो. त्या अध्यादेशावर राज्यपाल यांची सही झाली होती. तो एकमताने मंजूर ही करण्यात आला होता. त्याला सुप्रिम कोर्टाने विरोध केला नाही. तर तेव्हा इम्पिरिकल डाटा मागितला होता. त्यामुळे आम्हाला दिलासा मिळाला होता. तेव्हा भाजपनेही सपोर्ट केला होता, असा दावा भुजबळांनी केला. आता या प्रकरणात राज्यपालांचा गैरसमज झाला आहे. त्यामुळे त्यांनी सही करायला नकार दिल्याचे ते म्हणाले.

मुख्यमंत्री, पवारांशी चर्चा

छगन भुजबळ पुढे म्हणाले की, मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार साहेबांशी बोललो आहे. देवेंद्र फडणवीसांसोबत बोलणार आहे. शेवटी हा राज्यातील 7 ते 8 कोटी ओबीसींचा प्रश्न आहे. मुंबईला गेल्यानंतर दोन – तीन मंत्र्यांना घेऊन राज्यपालांना भेटणार आहे. राजकारणाचा विषय वेगळा असतो. 12 आमदार इकडे – तिकडे तो भाग वेगळा आहे. मात्र, हा सार्वत्रिक विषय आहे. त्यामुळे ओबीसींचे नुकसान होईल, असे अडथळे निर्माण करता काम नये, असे आवाहनही त्यांनी केले.

राजकारण नको

भुजबळ म्हणाले की, तेव्हा भाजपनेही सपोर्ट केला होता. मात्र, आता ओबीसीवर अन्याय होईल असं करू नका. या विषयात राजकारण करू नये. मला आशा आहे की, राज्यपाल महोदय हा विषय समजून घेतील. निवडणुका डोक्यावर आहेत. ओबीसी आरक्षण मिळावं असे वाटते. मी भेट घेतली तेव्हा हे प्रकरण माहिती नव्हतं. त्यामुळे चर्चा झाली नसल्याचेही त्यांनी सांगितलं.

राज्यपालांचा गैरसमज झाला असून, त्यामुळेच त्यांनी सही करायला नकार दिलाय. त्यामुळे आता दोन-तीन मंत्र्यांना घेऊन त्यांना भेटणार आहे.

-छगन भुजबळ, मंत्री

इतर बातम्याः

Nivruttinath | 800 वर्षांपूर्वी संजीवन समाधी, यशापासून निवृत्ती, ज्ञानेश्वर माऊलींचे गुरू; संत निवृत्तीनाथांची यात्रोत्सवानिमित्त अनोखी ओळख!

Wine Capital Nashik | नाशिक वाईन कॅपिटल कसे झाले; ऐतिहासिक ‘पिंपेन’ची कशी झाली सुरुवात?

Nashik | नाशिक क्लायमेट ॲक्शन प्लॅन सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या, काय होणार लाभ?

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.