Nashik ZP Election | झेडपीच्या गण-गटांचा प्रारूप आराखडा मागवला; तपासणी अन् निवडणूक होणार कधी?

नाशिकमध्ये महापालिका निवडणुकीसोबतच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे वारे जोरात वाहताना दिसत आहे. या निवडणुकीसाठी गट आणि गणांच्या प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा तपासणीसाठी आणावा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

Nashik ZP Election | झेडपीच्या गण-गटांचा प्रारूप आराखडा मागवला; तपासणी अन् निवडणूक होणार कधी?
Nashik ZP
Follow us
| Updated on: Feb 07, 2022 | 7:07 AM

नाशिकः नाशिकमध्ये (Nashik) महापालिका निवडणुकीसोबतच जिल्हा परिषद (ZP) आणि पंचायत समिती निवडणुकीचे वारे जोरात वाहताना दिसत आहे. या निवडणुकीसाठी गट आणि गणांच्या प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा तपासणीसाठी आणावा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. येत्या 9 फेब्रुवारी रोजी प्रारूप आराखडा घेऊन निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जावे लागणार आहेत. दरम्यान, विद्यमान जिल्हा परिषदेचा कार्यकाळ 21 मार्च रोजी संपणारय. गेल्या पाच वर्षांपूर्वी जानेवारी महिन्यातच निवडणूक आचारसंहिता लागली आणि 21 फेब्रुवारी रोजी मतदान झाले. मात्र, अजून प्रारूप रचनाही पूर्ण नाही. मग हरकती, त्यावरच्या सुनावणी आणि अंतिम रचना हे पाहता ही निवडणूक लांबणीवर पडणार की वेळेत होणार याची चर्चा सुरूय.

जागाही वाढल्या

नाशिक जिल्हा परिषदेचा परीघ आता विस्तारणार असून, गट चक्क 11 आणि गण 22 ने वाढणार आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी राजकारणात पाय ठेवायला संधीही जास्त राहणार आहे. नाशिकमध्ये 2012 साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 2011 च्या जनगणनेचा आधार घेण्यात आला. त्यानंतर यावर्षी होणारी जनगणना कोरोनामुळे झाली नाही. मात्र, या काळात शहराच्या लोकसंख्येत साधारणतः साडेतीन चार लाखांची वाढ झाली. सध्या अंदाजे 30 ते 40 लाखांच्या घरात लोकसंख्या आहे. हे पाहता राज्य सरकारने महापालिकेच्या जागा वाढवल्या. महापालिकेत सध्या 122 नगरसेवक होते. आता त्यांची संख्या 133 अशी करण्यात आली. याच धर्तीवर जिल्हा परिषदेच्या जागाही वाढवण्यात येत आहेत.

कसा होणार बदल?

नाशिक शहरी भागासाठी 2 महापालिका, 8 नगरपालिका, 7 नगरपंचायती आहेत. मात्र, ग्रामीण भागाचा गावगाडा एकट्या जिल्हा परिषदेवर सुरू असतो. ग्रामीण भागात 2011 मधील जनगणनेनुसार 34 लाख 99 हजार 792 लोकसंख्या होती. त्यात साधरणतः पाच टक्के वाढ झाल्याचा अंदाज आहे. त्यामुळे आरोग्य, शिक्षण, मुलभूत सुविधा विकास कामे साऱ्यांची जबाबदारी ही वाढली. हे पाहता जिल्हा परिषदेतील सदस्य संख्या वाढवण्यात आली आहे. नव्या प्रभागरचनेनुसार यंदा जिल्ह्यात 73 गटांमध्ये 11 गटांची वाढ झाली आहे. त्यामुळे सध्या एकूण 84 गट आहेत. तर प्रत्येक गटात 2 गणांची वाढ झाली आहे. त्यामुळे 146 वरून गणांची संख्या आता 168 झाली आहे. सध्या निवडणूक विभागाच्या आदेशानुसार प्रभाग रचनेच्या प्रारूप आराखड्याचे काम जोरात सुरू असून अधिकाऱ्यांची ते पूर्ण करता-करता धावपळ उडाली आहे.

कुठे वाढणार गट?

नाशिक जिल्ह्यात मालेगाव, नांदगाव, येवला, बागलाण तालुक्यांमध्ये गटांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जिल्हा परिषद निवडणुकीसोबतच पंचायत समित्यांची निवडणूक होते. एका गटात दोन गण असतात. या दोन्ही निवडणुकांना वेगवेगळे मतदान करावे लागते. जिल्ह्यात ओझरची ग्रामपंचायत आता नगरपंचायत झाली आहे. त्यामुळे आपसुकच हा गट येणाऱ्या काळात रद्द होईल.

इतर बातम्याः

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!

Lata Mangeshkar | अवघ्या 13व्या वर्षी पहिलं रेकॉर्डिंग! असा होता 80 वर्षांचा म्युझिकल प्रवास

Lata Mangeshkar | निर्विवाद तजेलदार! आईसाठी तर आवाज दिलाच, पण लेकीसाठीही लतादीदींनी गाणी गायली

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.