Nashik | नाशिक जिल्हातील कळवण येथे पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने एकाचा मृत्यू, प्रशासनाच्या दिरंगाईचा फटका
कळवणच्या आदिवासी बहुल भागात घडलेल्या या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक केली जातंय. दळवट - कुसोसडी रस्त्यांवरील पुलांचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू होते. यामुळे कांतिलाल बर्डे आणि त्यांच्या पत्नीला बंधाऱ्यावरील पुराच्या पाण्यातून जावे लागले.
मालेगाव : नाशिक (Nashik) जिल्हातील कळवणच्या आदिवासी बहुल पश्चिम पट्ट्यात एक धक्कादायक घटना घडलीयं. प्रशासन व ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे कोसोसडीच्या रहिवाशाच्या जीव गेलायं. कांतिलाल बर्डे असे पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या व्यक्तीचे नाव असून दवाखान्यात (Hospital) जात असताना पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झालायं. दळवट – कुसोसडी रस्त्यांवरील पुलांचे काम धीम्या गतीने सुरू आहे आणि पर्यायी रस्ता (Road)नसल्याने बंधाऱ्यावरील पुराच्या पाण्यात जात असताना ते पडले आणि वाहून गेले.
कळवणच्या आदिवासी बहुल भागातील घटना
कळवणच्या आदिवासी बहुल भागात घडलेल्या या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक केली जातंय. दळवट – कुसोसडी रस्त्यांवरील पुलांचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू होते. यामुळे कांतिलाल बर्डे आणि त्यांच्या पत्नीला बंधाऱ्यावरील पुराच्या पाण्यातून जावे लागले. कांतिलाल बर्डे पत्नीसह दळवट प्रथमिक आरोग्य केंद्रात जात होते. केटिअर वेअर बंधाऱ्यावरील पुराच्या पाण्यात जात असताना अचानक त्यांचा पाय घसरल्याने पुरामध्ये वाहून गेल्याने मृत्यू झाला.
कांतिलाल बर्डे यांचा पुराच्या पाण्यात पडल्याने झाला मृत्यू
कांतिलाल बर्डे पुराच्या पाण्यात पडल्यानंतर त्यांच्या पत्नीने आरडाओरड केली. मात्र तोपर्यंत पुराच्या पाण्यात ते गायब झाले. स्थानिक नागरिक आणि प्रशासनाने शोधाशोध केली मात्र त्यांना वाचवण्यात यश आले नाही. अखेर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व एनडीआरएफच्या पथकाने अथक परिश्रम करून दुसऱ्या दिवशी बर्डे यांचा मृतदेह शोधून काढला. विशेष म्हणजे केंद्रीय राज्य मंत्री डॉ. भारती पवार व आमदार नितीन पवार यांचे गाव असलेल्या दळवट गावाला प्रशासनाच्या दिरंगाईचा फटका बसल्याने एका निष्पाप व्यक्तीला आपला जीव गमवावा लागल्याने संताप व्यक्त होत आह.