वेठबिगारी कधी रोखणार ? ती बालिका दररोज म्हणायची मला घरी नेवून सोडा, तरीही…

संबंधित बालिका ही नुकतीच पाहिलीला शाळेत जात होती. संशयित ढेपले नामक मेंढपाळ तिथे आला आणि त्याने मुलीला काम देतो म्हणत थेट मुलीचा सौदाच केला.

वेठबिगारी कधी रोखणार ? ती बालिका दररोज म्हणायची मला घरी नेवून सोडा, तरीही...
Image Credit source: FACEBOOK
Follow us
| Updated on: Oct 02, 2022 | 5:17 PM

नाशिक : सहा वर्षाच्या मुलीला (child) सहा हजार रुपयांमध्ये विकत घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून तब्बल पाच वर्षांनी त्या मुलीची सुटका करण्यात आली आहे. याबाबत नाशिक (Nashik) जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. त्र्यंबकेश्वर पोलिसांत वेठबिगार उच्चाटन कायद्याबरोबरच बालन्याय हक्क कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही महिन्यांपूर्वी अशीच एक घटना इगतपुरी तालुक्यात घडली होती. त्यामुळे संपूर्ण राज्यात या वेठबिगारीच्याबाबत संताप व्यक्त केला जात होता. त्यावरून कठोर कारवाईची मागणी देखील करण्यात आली होती. त्यावरून आदिवासी विकास मंत्र्यांनी याबाबत दखल घेतली होती.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शिरसगाव येथे राहणारे आई-वडील आणि त्यांची पाच मुलं राहत होती. त्यात एका बालिकेचा समावेश होता.

संबंधित बालिका ही नुकतीच पाहिलीला शाळेत जात होती. संशयित ढेपले नामक मेंढपाळ तिथे आला आणि त्याने मुलीला काम देतो म्हणत थेट मुलीचा सौदाच केला.

आई-वडिलांच्या अशिक्षित असल्याचा ढेपले याने फायदा घेत सहा हजार रुपयांना सहा वर्षीच्या मुलीचा काम देतो या नावाखाली घेऊन गेला.

मुलीला मेंढया वळण्याचे काम देतो म्हणून घेऊन गेलेला ढेपले आणि त्याचे कुटुंब मुलीला हीन वागणूक देत होते.

सहा हजार रुपये रोख देऊन आणलेल्या मुलीला दररोज सकाळी चहा दिल्यानंतर मेंढया बसलेला शेतातील वाडा झाडण्याचे काम करावे लागत होते.

वाडा झाडून झाल्यावर जेवण दिले जायचे त्यांनंतर दिवसभर मेंढया चारण्यासाठी काम तब्बल पाच वर्षे करावे लागले आहे.

दररोज ती ढेपले आणि त्यांच्या कुटुंबाकडे मला माझ्या घरी नेवून सोडा असे म्हणायची तरीही ढेपले ही तिच्याकडून कामे करूनच घेत राहिले.

याच काळात श्रमजीवी संघटनेने बाल वेठबिगारीची काही प्रकरणे उघडकीस आणली होती. हीच बाब ढेपले यांच्या निदर्शनास आली होती आणि त्याचीच धास्ती ढेपले यांनी घेतली.

मुलीला तब्बल पाच वर्षांनी तिच्या आई आणि वडीलांकडे शिरसगाव येथे सोडले आहे. त्यांनंतर मुलीने आपल्याबरोबर घडलेली सर्व हकिगत सांगितली.

श्रमजीवी संघटनेच्या पदाढीकऱ्यांनी पुढाकार घेऊन त्र्यंबकचे तहसीलदार असलेले दीपक गिरासे यांच्याकडे याबाबत सर्व माहिती दिली.

त्यानंतर मुलीने स्वत:ही सर्व प्रकार सांगितला आणि त्यानंतर त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'.
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?.
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप.
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.