Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik | नाशिक शहरात तब्बल 27 किलो चांदीवर दरोडा पडल्याची घटना, कुरिअर बॉयलाही मारहाण

हा चोरीचा सर्व प्रकार सीबीएस परिसरातील बाल सुधारालय समोर घडलायं. दोन वाहनांवरून आलेल्या पाच दरोडेखोरांनी अमित सिंहला मारहाण देखील केलीयं. एकाने डोक्याला पिस्टल लावताच अमित सिंह यांचे साथीदार घटना स्थळीवरून पळून गेले.

Nashik | नाशिक शहरात तब्बल 27 किलो चांदीवर दरोडा पडल्याची घटना, कुरिअर बॉयलाही मारहाण
Follow us
| Updated on: Aug 23, 2022 | 8:47 AM

नाशिक : नाशिक (Nashik) शहरात मध्यरात्री एक धक्कादायक घटना घडलीयं. तब्बल 27 किलो चांदीवर दरोडा पडल्याने एकच खळबळ निर्माण झालीयं. चांदीचे पार्सल पुणे आणि औरंगाबादला (Aurangabad) पोहचवण्यासाठी कुरिअर बॉय बस स्थानककडे जात असताना ही घटना घडली आहे. कुरिअर बॉयला चोरट्यांकडून मारहाण देखील करण्यात आलीयं. 27 किलो चांदीसोबतच चोरट्यांनी कुरिअर बॉयची (Courier boy) गाडी देखील लंपास केलीयं. रात्री पावणे बाराच्या दरम्यान ही घटना घडल्याची माहिती मिळतंय. सीबीएस परिसरातील बाल सुधारालय समोर हा सर्व प्रकार घडल्याने आर्श्चय व्यक्त केले जातंय.

कुरिअर बॉय पुणे आणि औरंगाबादला पार्सल पोहचवण्यासाठी जात असताना पडला दरोडा

नाशिक शहरात रात्री पावणे बारादरम्यान 27 किलो किलो चांदीवर दरोडा पडलायं. तसेच यावेळी कुरिअर बॉयला देखील मारहाण करण्यात आलीयं. कुरिअर बॉय पुणे आणि औरंगाबादला पार्सल पोहचवण्यासाठी बस स्थानककडे जात असताना पाच जणांनी मिळून पार्सल कंपनीचा कर्मचारी अमित सिंहला अडवत मारहाण करून 27 किलो चांदी लंपास केलीयं. हे पाच चोरटे दुचाकीवरून आले होते.

हे सुद्धा वाचा

डोक्याला पिस्टल लावत केली मारहाण, 12 लाख 75 हजारांचा मुद्देमाल चोरीला

हा चोरीचा सर्व प्रकार सीबीएस परिसरातील बाल सुधारालय समोर घडलायं. दोन वाहनांवरून आलेल्या पाच दरोडेखोरांनी अमित सिंहला मारहाण देखील केलीयं. एकाने डोक्याला पिस्टल लावताच अमित सिंह यांचे साथीदार घटना स्थळीवरून पळून गेले. 27 किलो चांदीसह ॲक्टिवा गाडी घेऊन दरेडोखोर पसार झाले. एकूण 12 लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेण्यात आलायं. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलायं.

रोहिणी खडसे आणि रूपाली चाकणकर यांच्यात मेकअपवरून जुंपली
रोहिणी खडसे आणि रूपाली चाकणकर यांच्यात मेकअपवरून जुंपली.
विधानसभेत अजित पवारांना मिळाली जयंत पाटलांची साथ
विधानसभेत अजित पवारांना मिळाली जयंत पाटलांची साथ.
खोक्या भाईसह धसांनाही सहआरोपी करा, अजय मुंडेंची मागणी
खोक्या भाईसह धसांनाही सहआरोपी करा, अजय मुंडेंची मागणी.
धमकीच्या ऑडिओ क्लिपमधला आवाज माझाच - संदीप क्षीरसागर
धमकीच्या ऑडिओ क्लिपमधला आवाज माझाच - संदीप क्षीरसागर.
रात्री 10 ते पहाटे 6 पर्यंत सर्व धार्मिक स्थळांवरील भोंगे बंद ठेवा..
रात्री 10 ते पहाटे 6 पर्यंत सर्व धार्मिक स्थळांवरील भोंगे बंद ठेवा...
शिंदेंच्या काळातल्या योजनांना कात्री? अर्थसंकल्पात निधीची तरतूद नाही
शिंदेंच्या काळातल्या योजनांना कात्री? अर्थसंकल्पात निधीची तरतूद नाही.
न्यायदान कक्षातच रंगतात ओल्या पार्ट्या, Video व्हायरल
न्यायदान कक्षातच रंगतात ओल्या पार्ट्या, Video व्हायरल.
बीड प्रकरणात सरकारला काय रस आहे माहीत नाही - भास्कर जाधव
बीड प्रकरणात सरकारला काय रस आहे माहीत नाही - भास्कर जाधव.
धंगेकरांच्या पक्षप्रवेशावर संजय राऊत यांचा खळबळजनक दावा
धंगेकरांच्या पक्षप्रवेशावर संजय राऊत यांचा खळबळजनक दावा.
निधी वाटपात भेदभाव? शिंदेंच्या मंत्र्यांना मिळाला सर्वात कमी निधी
निधी वाटपात भेदभाव? शिंदेंच्या मंत्र्यांना मिळाला सर्वात कमी निधी.