बाजार समितीत कांदा घेऊन चालला होता, मात्र वाटेतच काळाने घाला घातला !

कांदा विक्रीसाठी ट्रॅक्टर घेऊन बाजार समितीत शेतकरी चालला होता. मात्र बाजार समितीत पोहचण्याआधीच शेतकऱ्यावर काळाने घाला घातला.

बाजार समितीत कांदा घेऊन चालला होता, मात्र वाटेतच काळाने घाला घातला !
मालेगावमध्ये पिकअप वाहनाची ट्रॅक्टरला धडकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 29, 2023 | 12:35 PM

मालेगाव / मनोहर शेवाळे : कांदा विक्रीसाठी बाजार समितीत घेऊन जाणाऱ्या एका शेतकऱ्याच्या ट्रॅक्टरला पिक-अप वाहनाने धडक दिल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील चाळीसगाव-नांदगाव रस्त्यावरील जळगाव खुर्द गावाजवळ मध्यरात्री ही घटना घडली. एकनाथ सोनावणे असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी अज्ञात पीकअप चालकाविरोधात नांदगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतकऱ्याच्या दुर्दैवी मृत्यूमुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

कांदा घेऊन बाजारात समितीत चालले होते

सोनावणे हे हिंगणे-देहरे येथून नांदगाव बाजार समितीत कांदा विक्रीसाठी घेऊन चालले होते. कांदा विकला जावा यासाठी शेतकरी रात्रीच बाजार समितीत नंबर लावण्यासाठी जात असतात. कांदा विकून पैसे मिळावे यासाठी शेतकऱ्यांची सध्या धडपड सुरू असते. बाजार समितीत जात असतानाच चाळीसगाव-नांदगाव रस्त्यावर अज्ञात पिकअप वाहनाने ट्रॅक्टरला धडक दिली.

अज्ञात पिकअप चालकाविरोधात गुन्हा दाखल

या धडकेत सोनावणे हे जागीच ठार झाले. जळगाव खुर्द येथे चाळीसगावकडून येणाऱ्या मालवाहू पिकअपने ट्रॅक्टरला पाठीमागून जोरदार धडक दिली. याप्रकरणी अज्ञात पिकअप चालकाविरोधात नांदगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा

शेतमजूर असलेल्या क्रुझर गाडीचा लासलगावजवळ अपघात

पुणे जिल्ह्यातील चाकण, नारायणगाव परिसरामध्ये सध्या उन्हाळी कांदा काढण्याचे काम सुरु झाले आहे. कांदा काढणीच्या कामासाठी मध्यप्रदेश राज्यातील सेंधवा येथून चार क्रुझर गाड्यांमध्ये शेत मजूर हे लासलगाव मार्गे नारायणगाव येथे चालले होते. एका क्रूजर गाडी समोर अचानक सायकलस्वार आल्याने सायकलस्वारला वाचवायच्या नादात क्रुझर गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यांमध्ये पलटी झाली. या अपघातात 10 जण जखमी झाले. यापैकी पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. गंभीर जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.