Malegaon | वृद्ध मच्छीमाराला पुरातून वाचविण्यात मालेगाव महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांना यश…
मासे पकडण्याच्या नादात पाण्याचा प्रवाह वाढला हे त्यांच्या लक्षातच आले नाही. चोहोबाजूने ते पुरात वेढले गेल्याने रात्रीपासून पुरातील लहान खडकावर अडकले होते. पहाटे अग्निशमन दलाच्या जवानांना याबाबत माहिती मिळाली.
मालेगाव : नाशिक (Nashik) जिल्हामध्ये धरण क्षेत्रात चांगला पाऊस सुरू असल्याने धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळेच अनेक नद्यांना पूर आलायं. या पुराच्या पाण्यात जाणून स्वत: चा जीव धोक्यात घालून नका असे आवाहन प्रशासनाकडून (Administration) नागरिकांना सातत्याने केले जात आहे. मात्र, असे असताना देखील मालेगावमध्ये एक वृद्ध मच्छीमार मासे पकडण्यासाठी गिरणा- मोसम संगमावर गेले होते. परंतू अचानकच पाण्याचा प्रवाह वाढल्याने ते पुराच्या पाण्यात अडकून बसल्याची धक्कादायक (Shocking) घटना घडलीयं.
जवानांनी पाण्यात जीव धोक्यात घालून वृद्ध मच्छिमाराला वाचवले
मालेगाव महानगरपालिका अग्निशामक दलाच्या जवानांनी गिरणा- मोसम संगमावरील पुराच्या पाण्यात जीव धोक्यात घालून वृद्ध मच्छिमाराला वाचविले. जवानांच्या प्रयत्नांनी प्राण वाचल्याने वृद्ध मच्छिमाराच्या चेहऱ्यावर हास्य दिसून आले. मध्यरात्रीपासून दादाजी बुधा मोरे हे 60 वर्षीय मच्छिमार रात्री मासे पकडण्यासाठी गिरणा नदीत गेले असता होते.
अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने मच्छिमार अडकला
मासे पकडण्याच्या नादात पाण्याचा प्रवाह वाढला हे त्यांच्या लक्षातच आले नाही. चोहोबाजूने ते पुरात वेढले गेल्याने रात्रीपासून पुरातील लहान खडकावर अडकले होते. पहाटे अग्निशमन दलाच्या जवानांना याबाबत माहिती मिळाली. मुख्य अग्निशमन अधिक्षक संजय पवार यांना ही माहिती मिळताच ते संपूर्ण पथकासह घटना स्थळी दाखल झाले.
संजय पवार आणि त्यांच्या टिमने या वृद्धाला काठावर सुखरुप आणले
पाण्याचा जोरदार प्रवाह असताना पोहून जात लाईफ जॅकेटच्या मदतीने संजय पवार आणि त्यांच्या टिमने या वृद्धाला काठावर सुखरुप आणले. वृद्धाला सुखरुप आणल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला. अग्निशामक दलाच्या या कामगिरीचे अनेकांनी कौतूक केले. मात्र, पुराच्या पाण्यात उतरून स्वत: चा जीव धोक्यात घालू नका, असे आवाहन प्रशासनाने नागरिकांना केले आहे.