नाशिक : लहान मुलं असताना त्यांची खूप काळजी घ्यावी लागते. रांगायला, चालायला लागले की, विशेष लक्ष द्यावे लागते. रांगत समोर जाऊन काहीही पडलेलं तो तोंडात भरू शकतो. शिवाय चालायला लागल्यावर घरात कुठंही पडू शकतो म्हणून लहान बालकांवर लक्ष द्यावं लागते. सहा वर्षांचा अर्णव छान चालायला आणि धावायला लागला होता. तो शाळेतही जात होता. पण, रस्ता ओलांडताना थोडा गोंधळायचा. अर्णव रस्ता ओलांडत होता. तेवढ्यात समोरून वेगाने दुचाकी आली. अर्णव असल्याचे दुचाकी चालकाच्या लक्षात आले नाही. अर्णवलाही काही कळले नाही. दुचाकीने त्याला जोरदार धडक दिली. यात अर्णवच्या डोक्याला आणि पोटाला लागले.
घटनेनंतर वातावरण बिघडले. संतप्त नागरिकांनी रुग्णालयात गोंधळ घातला. त्यामुळे पोलिसांना अर्णवच्या नातेवाईकांची समजूत काढावी लागली. शेवटी झालेली घटना दुःखत आहे. गेलेला जीव परत येणार नाही. अर्णवच्या अकाली जाण्याने त्याच्या पालकांवर तसेच नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
नाशिकच्या म्हसरूळ परिसरात रस्ता ओलांडत असताना एका भरधाव दुचाकीने धडक दिली. या अपघातात 6 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी अंत झाला. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात संशयित दुचाकी चालकाच्या विरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
अर्णव रोशन भाबड असे मृतक मुलाचे नाव आहे. अर्णव रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने आलेल्या दुचाकी चालकाने मुलाला धडक दिली. या घटनेत अर्णवच्या डोक्याला आणि पोटाला गंभीर मार लागला. त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अपघात स्थळाजवळून अर्णवला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी अर्णवला मृत घोषित केले. यावेळी रुग्णालयात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी समजूत काढल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. या घटनेत चिमुकल्याचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.