“गद्दारांच्या मनात 32 वर्षाच्या युवकानं धडकी भरवली”; ठाकरे गटाने एल्गार पुकारला…
ज्या आदित्य ठाकरे यांनी पायाला भिंगरी लावून महाराष्ट्राचा दौरा केला आहे. अशा तरुण नेतृत्वाच्या मागे उभं राहण्याची सध्या गरज आहे.
नाशिकः राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या आणि पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवडची पोटनिवडणूक लागल्यापासून राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. त्यातच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांपासून विविध भागात राजकीय दौऱ्यावर आहेत. त्याच दौऱ्याबद्दल विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आदित्य ठाकरे यांचे कौतूक करत आदित्य ठाकरे जर 50 गावांचा विकास दौरा करत असतील तर आपण 5 जागी तर गेलं पाहिजे असं आवाहन अंबादास दानवे यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.
ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी बोलताना सांगितले की, ज्या दिवसांपासून राज्यात बंडखोरी करून ज्यांनी सत्तांतर घडवले आहे. त्यांच्याच छातीत आता 32 वर्षाच्या युवकानं धडकी भरवली आहे.
कारण मागच्या चार महिन्यापासून आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र पालथा घातला आहे. त्यामुळे शिवसेनेबरोबर ज्या गद्दार आमदारांनी गद्दारी केली आहे, त्यांच्या मनात आता भीती भरली असल्याचेही त्यांनी सांगितले.
ज्या आदित्य ठाकरे यांनी पायाला भिंगरी लावून महाराष्ट्राचा दौरा केला आहे. अशा तरुण नेतृत्वाच्या मागे उभं राहण्याची सध्या गरज आहे.
कारण येणाऱ्या काळातच आदित्य ठाकरे यांच्यासारख्या तरुण नेतृत्वाकडे आपण संधी पाहिजे. कारण आदित्य ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांपासून 50 गावी जात असतील तर आपण 5 जागी तर गेलं पाहिजे, गावा गावातील लोकांना भेटले पाहिजे, तरच आगामी निवडणुकीतून भगवा फडकवला जाईल असंही त्यांनी यावेळी सांगितले.
सध्या राज्यातील राजकारण प्रचंड बदलले आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी ज्या प्रकारे दौरे सुरु केले आहेत. त्याच प्रमाणे राजकीय कार्यकर्त्यांनीही आपल्या भागाचे दौरे काढले पाहिजेत.
आपापल्या परिसरातील लोकांना भेटले पाहिजे. कारण सध्या राज्यात खोके सरकार आल्याने राजकीय परिस्थिती बदलली आहे.
त्यामुळे आपण गनिमी काव्यानं लढण्याची गरज आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले. गावा गावातून दौरे काढून, लोकांना भेटून आणि प्रत्येक कार्यकर्त्यांनी वॉर्ड, बुथवर काम करायला पाहिजे असंही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी अंबादास दानवे यांनी सांगितले की, मी संभाजीनगरचा आहे तर 1988 पासून पालिका ताब्यात आहे, जर महानगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात असती तर आपणदेखील परिवर्तन केलं असतं असा विश्वासही अंबादास दानवे यांनी व्यक्त केला.