Nitesh Rane : अयोध्येत लहान मुलांना परवानगी आहे? नितेश राणेंनी उडवली आदित्य ठाकरेंची खिल्ली, तर ज्ञानवापीवर भूमिका स्पष्ट करण्याचं आव्हान
आता दौऱ्यावरून भाजपने आदित्य ठाकरे यांची खिल्ली उडवायला सुरू केली आहे. आज भाजप आमदार नितेश राणे हे नाशिकमध्ये बोलत होते. त्यांनी हिंदुत्वावरून शिवसेनेवर सडकडून टीका केली आहे.
नाशिक : गेल्या अनेक दिवासांपासून आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचा अयोध्या दौरा (Ayodhya Visit) गाजतोय. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या अयोध्या दौऱ्याच्या घोषणेनेही बराच काळ राजकारण तापवलं, मात्र भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्या प्रखर विरोधानंतर राज ठाकरे यांनी हा दौरा स्थगित करण्याचा निर्णय घेतला. तर राज्यसभेच्या निवडणुकीमुळे आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याच्या तारखेतही बदल करण्यात आला. आता येत्या 15 जूनला हा दौरा पार पडत आहे. या दौऱ्याआधी शिवसेनेकडूनही जोरदार तयारी करण्यात आली आहे. मात्र आता दौऱ्यावरून भाजपने आदित्य ठाकरे यांची खिल्ली उडवायला सुरू केली आहे. आज भाजप आमदार नितेश राणे हे नाशिकमध्ये बोलत होते. त्यांनी हिंदुत्वावरून शिवसेनेवर सडकडून टीका केली आहे. तर लहान मुलांना अयोध्यात परवानगी आहे का? असा सवाल करत आदित्य ठाकरे यांना खोचक टोला लगावला आहे.
ज्ञानवापीबाबत भूमिका स्पष्ट करा
गेल्या अनेक दिवसांपासून देशाच्या राजकारणात ज्ञानवापी मशीदीचा मुद्दाही चांगलाच गाजत आहे. ज्ञानव्यापी वर शिवसेनेनं आजवर भूमिका स्पष्ट केली नाही. त्यामुळे ज्ञानव्यापीवर भूमिका अयोध्येत भूमिका स्पष्ट करावी, असे आव्हानही राणे यांनी दिलं आहे. तर या दौऱ्यासाठी शिवसेनेने जोरदार तयारी केली आहे.
शिवसेना नेत्यांकडून अयोध्येत पाहणी
दोन दिवसांपूर्वीच शिवसेना नेत्यांनी अयोध्येत जाऊन पाहणी केली आहे. आदित्य ठाकरे अयोध्येत दर्शन घेऊन शरयू नदीवर महाआरती करणार असल्याचेही शिवसेनेकडून सांगण्यात आले आहे. तसेच आमचा हा दौरा राजकीय नाही हा आमचा धार्मिक दौरा आहे, असेही शिवसेना नेते सध्या सांगत आहेत. तर भाजपकडून पुन्हा पुन्हा शिवसेनेच्या हिंदुत्वावरून सवाल उपस्थित केले जात आहेत, आता राणे यांना शिवसेना काय उत्तर देणार, तसेच ज्ञानवापीबाबत काय भूमिका घेणार, हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
संजय राऊत पुन्हा राणेंच्या टार्गेटवर
तसेच कडवट शिवसैनिक संजय पवार आहेत संजय राऊत नाही, संजय राऊत बाहेरून आले आहेत, त्यांचा काय संबध, संजय राऊत निर्लज्ज आहेक, त्यांनी मा साहेब आणि बाळासाहेब यांच्यावर लेख लिहिला होता त्यांच्यात वाद आहे असा, त्याला शिवसेनेचे आमदार मतं देतीला का? असा सवालही राणे यांनी यावेळी केला आहे. तर सेफ मत संजय पवार यांना द्यावी संजय राऊतांना उर्वरित मत द्यावी, तसेच संजय राऊतांना लीलावतीला पाठविण्याची वेळ आली आहे, असे म्हणत राणे यांनी यावेळी पुन्हा राऊतांनही टार्गेट केलं आहे.