बिबट्याचा बछडा सापडला खरा…, पण त्याला सोडताना मात्र अख्खं कुटुंब गहिवरलं…
बिबट्याचे एक बच्छडे आपल्या आई पासून विभक्त होऊन आणि वाट चुकून आठवडाभरापूर्वी एका शेतकरी कुटुंबाला सापडले होते. त्यानंतर त्याचा सांभाळही त्या कुटुबीयांनी केला होता. मात्र ते पुन्हा वन विभागाकडे स्वाधीन करताना मात्र त्यांना गहिवरुन आले होते.
मालेगावः प्रचंड मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड, आणि जंगलांना आगी लागत असल्याने वन्य प्राण्यांचा (wild animals) आदिवास बदलत आहे. त्यामुळे आता वन्यप्राण्यांचा वावर मनुष्यवस्तीत वाढत आहे. अशा समस्या प्राण्यांना सतावत असल्याने वन्यप्राणी मानवी वस्तीत घुसू लागले आहेत. असाच प्रकार मालेगाव तालुक्यात घडला आहे. बिबट्याचे (Leopard) एक बछडे आपल्या आई पासून विभक्त होऊन आणि वाट चुकून आठवडाभरापूर्वी एका शेतकरी कुटुंबाला (farming family) सापडले होते. आई पासून विभक्त झाल्यामुळे त्या बछड्याला आईच्या मायेची ऊब मिळणे गरजेचे होते, त्याच्या पोटाला दूध मिळणे, त्याला मायेचा आसरा मिळणे हे गरजेचे असल्यानेच, ज्या कुटुंबीयांना हे बछडे सापडले होते. त्यांनी त्या बिबट्याच्या बछड्याची एक आठवडा काळजी घेतली.
एका वन्यप्राण्याचे पिल्लू एका आठवडाभर आपल्या घरात राहणे, त्याची सवय त्या कुटुंबाला होणे, मानवी वस्तीत राहूनही वन्यप्राण्यांच्या पिल्लांची काळजी घेणे आणि त्या पिल्लाची आई वन विभागाला सापडली नसल्याने त्या बिबट्याच्या पिल्लाला पुन्हा वन विभागाच्या स्वाधीन करणे हा प्रवास मुक्या प्राण्यांबरोबर तयार झालेल्या नात्यामुळे हळवा झाला होता.
शेतकरी कुटुंबीय गहिवरले
हळवे नाते या बिबट्याच्या बछड्यावर मालेगावातील त्या कुटुंबीयांचे निर्माण झाल्याने बिबट्याला वन विभागाच्या स्वाधीन करताना हे कुटुंबीय गहिवरले होते.
बिबट्याचे पिल्लू आईपासून विभक्त
जंगलातून आपल्या आईपासून विभक्त झालेले बिबट्याचे पिल्लू पुन्हा त्याच्या आईकडे सोडण्यासाठी वन विभागाने भरपूर प्रयत्न केले मात्र आठवडा होऊन गेला तरी वन विभागाचे प्रयत्न निष्पळ ठरले. त्यामुळे बिबट्याच्या त्या बछड्याला पुन्हा वन विभागाच्या स्वाधीन करण्यात आले. यावेळी हे कुटुंबीय भावूक झाले होते.
शेतकऱ्याच्या घरात बिबट्याच्या बछड्याचा सांभाळ
बिबट्या हा प्राणी हल्ला करण्यात तरबेज असला तरी त्याची बछडेही त्याच्यासारखीच हुशार आणि चपळ असतात. मात्र आईपासून विभक्त झालेले पिल्लू शेतकऱ्याच्या घरात एक आठवडाभर विसावले होते. त्यामुळे आठवडाभर ज्यांनी सांभाळ केला त्यांचेही वन विभागातर्फे कौतुक करण्यात आले.
वन विभागाच्या स्वाधीन
बिबट्याचे बछडे वन विभागाच्या स्वाधीन केले गेले असले तरी याबाबत बच्छड्याच्या आईचे म्हणजेच बिबट्याची वाट पाहणार असल्याचे सांगण्यात आले. या बछड्यासाठी सरकारतर्फे त्यांची योग्य ती काळजी घेऊन बिबट्याच्या बछड्याला डोंगराळ भागात सोडले जाणार असल्याचे ही त्यानी संगितले.