“ज्या शेतकरी बांधवांच्या जीवावर राजकारण करतो त्यांच्याशी…; नुकसान पाहणीनंतर मंत्र्यांकडून शेतकऱ्यांना अश्वासन

सरकारविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, खात्रीने सांगतो की सरकारने गेल्या सहा महिन्यात भरपूर पैसे दिलेले आहेत. वेगवेगळा दिवशी गारपीठ आणि पाऊस झाल्याने पूर्ण पंचनामे करून पैसे कसे देता येतील त्याचे नियोजन सरकार करणार आहे.

ज्या शेतकरी बांधवांच्या जीवावर राजकारण करतो त्यांच्याशी...; नुकसान पाहणीनंतर मंत्र्यांकडून शेतकऱ्यांना अश्वासन
Follow us
| Updated on: Mar 21, 2023 | 11:34 PM

नाशिक : अवकाळी पावसामुळे राज्यातील विविध भागात प्रचंड नुकसान झाले आहे.त्यातच नाशिक जिल्ह्यालाही जोरदार फटका बसला आहे. त्यामुळे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी नाशिक जिल्ह्यातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी करून निफाड तालुक्यातील शेतीचे सर्वात मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यांना भरीव मदत मिळण्याची मागणी करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. नुकसान झाल्यामुळे मंत्री अब्दुल सत्तार यांनी रात्री उशिरापर्यंत शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत.

17 तारखेला गारपीट झाल्यानंतर बियाणे खराब झाले होते.त्यामुळे बियाणे पुरवण्याची मागणीही करण्यात आली आहे. तसेच जिल्हा बँका ठेवी देत नसल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे विविध गोष्टींबरोबरच अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत.

यावेळी त्यांनी ई-पीक पाहणी करून घ्यावी असाही आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. यावेळी शेतकऱ्यांनी पीक विमा आणि अतिवृष्टीचे मागील पैसे मिळाले नाहीत अशी तक्रारही त्यांनी कृषी मंत्र्यांकडे केली आहे.

यावेळी अब्दुल सत्तार यांनी सांगितले की, अस्मानी संकट आणि शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सांगितले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. द्राक्ष, कांदे, टरबूज आणि भाजीपाला पिकांची पाहणीही यावेळी करण्यात आली आहे.

अब्दुल सत्तार यांच्यावर पाहणी दौऱ्यावरून टीका करण्यात आल्यानंतर त्यांनी सांगितले की, ज्या शेतकरी बांधवांच्या जीवावर राजकारण करतो त्यांच्याशी बेइमानी करणार नाही असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

यावेळी त्यांनी सांगितले की, 2800 कोटी रुपये परतीच्या पावसाचे पैसे देणे आहेत. त्यामुळे वस्तुनिष्ठ पंचनामे करून नुकसान भरपाईची घोषणा मुख्यमंत्री करतील असं अश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

पंचनाम्यात एका गावाला मदत देता येत नसून राज्याच्या धोरणांचा विचार करावा लागतो असंही त्यांनी यावेळी सांगितले.

गारपीठ झालेल्या भागातील शेतकऱ्यांना बँकेच्या काय सवलती देण्यात येतील त्याची घोषणा विधान सभेत होणार असल्याचे अश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

सरकारविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, खात्रीने सांगतो की सरकारने गेल्या सहा महिन्यात भरपूर पैसे दिलेले आहेत. वेगवेगळा दिवशी गारपीठ आणि पाऊस झाल्याने पूर्ण पंचनामे करून पैसे कसे देता येतील त्याचे नियोजन सरकार करणार आहे.

त्यामुळे संकटात सरकार मदत देण्यात कमी पडणार नाही असा शब्दही त्यांनी यावेळी दिला. सरकारकडून आता कर्जमाफी होणार नसून त्या पेक्षा वेगळा काय निर्णय घेता येतील तो विचार करायचा आहे अशा शब्दात त्यांनी कर्जमाफीवर बोलताना सांगितले.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.