राज्यपाल न्यायालयात जाऊ देण्याची वेळ येऊ देणार नाहीत, विधानपरिषेदच्या नियुक्त्यांवर अजित पवारांचा सूचक इशारा

अजित पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी विधानपरिषेदच्या 12 जागांसाठी न्यायालयात जाऊ देण्याची वेळ येऊ देणार नाहीत, असं म्हटलंय. Ajit Pawar Bhagatsingh Koshyari

राज्यपाल न्यायालयात जाऊ देण्याची वेळ येऊ देणार नाहीत, विधानपरिषेदच्या नियुक्त्यांवर अजित पवारांचा सूचक इशारा
अजित पवार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
Follow us
| Updated on: Feb 10, 2021 | 1:13 PM

नाशिक: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी विधानपरिषेदच्या 12 जागांसाठी न्यायालयात जाऊ देण्याची वेळ येऊ देणार नाहीत, असं म्हटलंय. ते नाशिक येथे बोलत होते. बहुमत असणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी सर्व निकष पाळत योग्य त्या नावांची शिफारस केली आहे. राज्यपालांना रीतसर सगळं कळवलेलं आहे, असं अजित पवार म्हणाले. त्यांनी यावेळी कोरोना महामारीमुळं राज्याच्या अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम, शेतकरी आंदोलन, नाशिक नियो मेट्रोयाविषयांवर भाष्य केलं. त्याशिवाय महाविकास आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत, असंही ते म्हणाले. (Ajit Pawar said Governor Bhagatsingh Koshyari will not forced us to go court on MLC twelve members appointment)

विधानसभेत बहुमत असणाऱ्या सरकारने कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊन नियमात बसणारे 12 लोक ठरवले आहेत. राज्यपाल त्यांची भूमिका जाहीर करतील अशी अपेक्षा करतील, अशी अपेक्षा असल्याचं अजित पवार म्हणाले.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपालांनी विधानपरिषेदच्या 12 जागांबाबत आता अंत पाहू नये, असं पुण्यातही म्हटलं होते.

प्रत्येक जिल्ह्याच समाधान करण्याचा प्रयत्न

अजित पवार यावेळी बोलताना म्हणाले, पुढच्या वर्षी जिल्हा अंतर्गत चॅलेंज फंड अंतर्गत 50 कोटी फंड देणार आहे. यावेळेस आर्थिक ओढाताण असली तरी कोणत्याही वार्षिक योजनेला कट लावलेला नाही. कोव्हिड उपाययोजने करता नाशिकला 70 कोटी मंजूर करण्यात आले आहेत. जिल्ह्याचा निधी नियोजन समितीच्या माध्यमातून दिला जातो. शेतकऱ्यांना 3 लाखा पर्यंत बिनव्याजी कर्ज देण्यात येईल.

नाशिक नियो मेट्रो

नाशिक नियो मेट्रो साठी राज्य सरकार देखील तरतूद करणार आहे. नागपूर आणि नाशिक मेट्रो बाबतचा राज्य सरकार आपला भाग उचलणार असल्याचं अजित पवारांनी सांगितले. येत्या काळात पोलीस भरती, सार्वजनिक आरोग्य विभागातील भरतीला प्राधान्य दिलं जाईल. 1 लाख 50 हजार कोटी फक्त पगार आणि पेन्शन वर खर्च होतोय. मुंबई मेट्रो आणि लोकल च्या वेळेनमध्ये बदल करतो आहोत. केंद्राने देखील तसेच आदेश दिले आहेत.

शेतकरी आंदोलनाबाबत सरकारने दोन पावलं मागे यावं

अजित पवार यांनी शेतकरी आंदोलनाबद्दल बोलताना केंद्र सरकारनं दोन पावलं मागं यावं, असं म्हटलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्वीच्या आठवणींना उजाळा देताना भावुक झाले. तोच भावूकपणा शेतकऱ्यांच्या बाबतीत दाखवला तर बरं होईल, असं अजित पवार म्हणाले. महाविकास आघाडीत कोणतेही वाद नाहीत कोणताही निर्णय घेताना उद्धव ठाकरे, शरद पवार, सोनिया गांधी एकत्र बसून घेतील, असं

पुण्यात अजित पवार काय म्हणाले?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपालांनी विधानपरिषेदच्या 12 जागांबाबत आता अंत पाहू नये. विधानसभेत बहुमत सिद्ध केलेल्या सरकारच्या कॅबिनेटनं सर्व नियम पाळून 12 आमदारांच्या नियुक्तीची शिफारस केली आहे. राज्यपालांनी आता अंत पाहू नये. राज्यपाल घटनात्मक पदावर बसले आहेत, आता त्यांना भेटून त्याबद्दल विचारावं लागले, असं अजित पवार म्हणाले. पुण्यात ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील उपस्थित होते.

12 सदस्यांमध्ये कोणाची नावं?

काँग्रेस

1) सचिन सावंत – सहकार आणि समाजसेवा 2) रजनी पाटील – सहकार आणि समाजसेवा 3) मुजफ्फर हुसैन – समाजसेवा 4) अनिरुद्ध वनकर – कला

राष्ट्रवादी काँग्रेस

1) एकनाथ खडसे – सहकार आणि समाजसेवा 2) राजू शेट्टी – सहकार आणि समाजसेवा 3) यशपाल भिंगे – साहित्य 4) आनंद शिंदे – कला

शिवसेना

1) उर्मिला मातोंडकर – कला 2) नितीन बानगुडे पाटील 3) विजय करंजकर 4) चंद्रकांत रघुवंशी

संबंधित बातम्या:

राज्यपालांनी अंत पाहू नये; आमदारांच्या रखडलेल्या नियुक्त्यांवरून अजित पवार संतापले

नामांतराशिवाय राज्यात इतरही प्रश्न आहेत, अजित पवारांनी ठणकावलं

(Ajit Pawar said Governor Koshyari will not forced us to go court on MLC twelve members appointment)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.