Amit Shah : योग दिनानिमित्त अमित शहा त्र्यंबकेश्वरला येणार, नाशिक दौरा खास असल्याची चर्चा

निवडणुकीचा हंगाम जवळ आला आहे. त्यामुळे अनेक कार्यक्रमांची उद्घाटने होत आहेत. अमित शहा यांच्या दौऱ्याचे नियोजन असल्याने केंद्रीय सुरक्षा दल आणि स्थानिक सरकारी विभागांशी संबंधित पथकाने गुरुपीठाच्या ठिकाणी भेट देऊन संबंधित ठिकाणांचा आढावा घेतला.

Amit Shah : योग दिनानिमित्त अमित शहा त्र्यंबकेश्वरला येणार, नाशिक दौरा खास असल्याची चर्चा
Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: Jun 17, 2022 | 3:21 PM

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या महाराष्ट्र दौऱ्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah)यांचा महाराष्ट्र दौरा सुरू होत आहे. पंतप्रधानांनी पुणे आणि मुंबईत भेट दिली. तर गृहमंत्री अमित शहा नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. गृहमंत्र्यांच्या नाशिक (Nashik) दौऱ्यापूर्वी केंद्रीय सुरक्षा दलाकडून संबंधित घटनास्थळांचा सुरक्षेच्या कारणास्तव आढावा घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमित शाह तीर्थक्षेत्र त्र्यंबकेश्वरला भेट देणार आहेत. गृहमंत्री अमित शहा यांचा हा दौरा पुढील आठवड्यात होणार आहे. पंतप्रधान मोदींनंतर आता अमित शाह यांच्या नाशिक दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

योग दिनानिमित्त अमित शहा त्र्यंबकेश्वरला येत आहेत

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गच्या सदस्यांनी एप्रिलमध्ये दिल्लीला जाऊन गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. सेवामार्गच्या वतीने गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली देश-विदेशातील सुमारे 10 हजार केंद्रांच्या माध्यमातून अध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रसेवेचे कार्य पूर्ण निष्ठेने व सक्षमतेने केले जात आहे. या सदस्यांनी गृहमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्या कामांची माहिती दिली आणि समर्थ गुरुपीठात येण्याची विनंती केली. अमित शहा यांनी सेवामार्गचे हे निमंत्रण स्वीकारले. आता तेच आश्वासन पूर्ण करण्यासाठी अमित शहा आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या दिवशी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर शहरातील समर्थ गुरुपीठाला भेट देणार आहेत.

अनेक कार्यक्रमांची उद्घाटने अमित शहा यांच्या हस्ते होतील

निवडणुकीचा हंगाम जवळ आला आहे. त्यामुळे अनेक कार्यक्रमांची उद्घाटने होत आहेत. अमित शहा यांच्या दौऱ्याचे नियोजन असल्याने केंद्रीय सुरक्षा दल आणि स्थानिक सरकारी विभागांशी संबंधित पथकाने गुरुपीठाच्या ठिकाणी भेट देऊन संबंधित ठिकाणांचा आढावा घेतला. जागतिक योग दिन आणि सद्गुरू मोरेदादा रुग्णालयाच्या पायाभरणी कार्यक्रमाला अमित शहा उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासोबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे अन्य नेतेही उपस्थित राहणार आहेत. याशिवाय राज्यातील अनेक मंत्री आणि अधिकारीही उपस्थित राहणार आहेत.

हे सुद्धा वाचा

नाशिक दौरा खास असल्याचे बोलले जात आहे

केंद्रीय गृहमंत्री सातत्याने महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असतात. मात्र हा नाशिक दौरा खास असल्याचे बोलले जात आहे. खरे तर महाराष्ट्रातील महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. जागतिक योग दिनानिमित्त अमित शहा यांचे नाशिकमध्ये आगमन होणार आहे. यानिमित्त ते त्र्यंबकेश्वर येथील अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्ग येथील गुरुपीठात येणार आहेत.

त्यावेळी अनेक कार्यक्रमांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती समजली आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.