अमित ठाकरे नाशिकमध्ये दाखल; पदाधिकाऱ्यांशी वन-टू-वन चर्चा करणार

नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. नाशिक पालिका ताब्यात घेण्यासाठी मनसेने थेट अमित ठाकरे यांनाच मैदानात उतरवले आहे. (Amit Thackeray reached at Nashik Over Nashik Municipal Carporation Election)

अमित ठाकरे नाशिकमध्ये दाखल; पदाधिकाऱ्यांशी वन-टू-वन चर्चा करणार
मनसे नेते अमित ठाकरे
Follow us
| Updated on: Jul 28, 2021 | 12:37 PM

नाशिक: नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. नाशिक पालिका ताब्यात घेण्यासाठी मनसेने थेट अमित ठाकरे यांनाच मैदानात उतरवले आहे. मनसे नेते अमित ठाकरे आज नाशिकमध्ये दाखल झाले असून ते पदाधिकाऱ्यांशी वन-टू-वन चर्चा करणार आहेत. त्यामुळे अमित यांच्या या दौऱ्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. (Amit Thackeray reached at Nashik Over Nashik Municipal Carporation Election)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे नुकतेच नाशिक दौऱ्यावर आले होते. त्यावेळी अमित ठाकरे आणि मनसे सरचिटणीस संदीप देशपांडेही सोबत होते. कालच राज ठाकरे यांनी अमित ठाकरेंसह काही नेत्यांना बॅगा भरून कृष्णकुंजवर येण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे राज ठाकरे या नेत्यांना घेऊन पुणे दौऱ्यावर जाणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र, प्रत्यक्षात राज यांनी सर्वांना कामं वाटून दिल्याचं दिसून आलं आहे. राज ठाकरे स्वत: पुण्यात तळ ठोकून आहेत. तर अमित ठाकरे, संदीप देशपांडे आणि अमेय खोपकर आज नाशिकमध्ये दाखल झाले आहेत.

मतदारसंघांचा आढावा घेणार

अमित ठाकरे हे दोन दिवसाच्या नाशिक दौऱ्यावर आले आहेत. अमित ठाकरे नाशिकमध्ये येताच मनसे कार्यकर्त्यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं आहे. या दोन दिवसात ते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. विशेष म्हणजे ते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी वन टू वन संवाद साधणार आहेत. राजगड या मनसेच्या कार्यालयात या मुलाखती होणार आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मुलाखती होणार असून त्यात मतदारसंघांचा आढावा घेण्यात येणार आहे. तसेच संभाव्य उमेदवारही हेरण्यात येणार आहेत.

अमित यांच्यावर नाशिकची जबाबदारी?

राज ठाकरे शिवसेनेत असताना त्यांच्यावर नाशिकची जबाबदारी देण्यात आली होती. शिवसेनेत असताना त्यांनी संपूर्ण नाशिक पिंजून काढलं होतं. त्यांनी नाशिकमध्ये शिवसेनेची चांगली बांधणी केली होती. मात्र, मनसेच्या स्थापनेनंतर राज यांना नाशिककडे फारसं लक्ष देता आलं नव्हतं. स्थानिक नेत्यांकडे त्यांनी नाशिकची जबाबदारी दिली होती. मनसेला नाशिकमध्ये सत्ताही मिळाली होती. मात्र, मधल्या काळात नाशिक मनसेत प्रचंड पडझड झाली. अनेक नेते पुन्हा स्वगृही म्हणजे शिवसेनेत गेले. त्यामुळे नाशिकमध्ये मनसेची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे यांच्याकडे नाशिकची जबाबदारी देऊन नाशिकचा गड राखण्याचं मनसेत घटत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

नाशिक मनपामध्ये पक्षीय बलाबल

भाजप – 65 शिवसेना – 35 राष्ट्रवादी – 6 काँग्रेस – 6 मनसे – 6 रिपाइं – 1 (Amit Thackeray reached at Nashik Over Nashik Municipal Carporation Election)

संबंधित बातम्या:

भाजप-राज ठाकरेंमध्ये नेमकं काय चाललंय? युती होणार की नाही? मुंबईपुरतीच होणार की पुणे, नाशकातही?; वाचा सविस्तर

राज ठाकरेंचा मलाही फोन, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात आम्ही भेटणार : सुधीर मुनगंटीवार

मुंबईतील भाजपच्या सर्व नगरसेवकांचे एक महिन्यांचे वेतन पूरग्रस्तांना; भाजपची घोषणा

(Amit Thackeray reached at Nashik Over Nashik Municipal Carporation Election)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.