कृषी मंत्र्यांची पाठ वळताच शेतकऱ्यांनीही दिल्या घोषणा 50 खोके…; नुकसान दौऱ्यावरी शेतकरी संतप्त
नुकसान दौरा करुन परतत असतानाच शेतकऱ्यांकडे पाठ वळताच शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त करत 50 खोके एकदम ओकेच्या घोषणाही सुरू केल्या. त्यामुळे अब्दुल सत्तार यांचा हा दौरा प्रचंड चर्चेत राहिला आहे.
निफाड : अवकाळी आणि गारपीट झाल्याममुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. अवकाळी पाऊस झाल्यामुळे शेतकरी आता आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यातच शासकीय कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना चालू करावी म्हणून बेमुदत आंदोलन पुकारले होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करणार कोण असा सवाल उपस्थित केला जात असतानाच आज सायंकाळी नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्याचा नुकसान दौरा कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केला होता.
अब्दुल सत्तार नुकसानीचे पाहणी करण्यासाठी निफाड तालुक्यात आले खरे मात्र शेतकऱ्यांनी कृषी मंत्र्यांच्याच दौऱ्यावर संतप्त सवाल उपस्थित केल्याने अब्दुल सत्तार यांचा दौरा आज चर्चेत राहिला आहे.
नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामध्ये प्रचंड नुकसान झाले आहे. ऐन रब्बी हंगामात अवकाली पावसाने दणका दिल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे.
अवकाळी आणि गारपीटाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसलेला असतानाच कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी मात्र नुकसानीचा दौरा करण्यासाठी संध्याकाळची वेळ का निवडली असा संतप्त सवाल नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केला आहे.
शेतीचे प्रचंड नुकसान झालेले असतानाच अब्दुल सत्तार यांनी रात्रीच्या अंधारात नेमकं काय पाहिलं असा सवाल त्यांनी केला आहे. कृषीमंत्र्यांनीच गांभीर्याने हा दौरा केला नसल्यामुळे शेतकऱ्यांनी आपला रागही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज नाशिकमध्ये अवकाळी नुकसानीचा दौरा केला खरा मात्र रात्रीच्या अंधारात सत्तारांनी नेमकं काय पाहिलं असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केल्यामुळे सत्तारांचा हा दौरा प्रचंड चर्चेत राहिला आहे.
अब्दुल सत्तार यांनी रात्रीचा नुकसान दौरा काढल्यामुळे शेतकऱ्यांनी संतप्त सवाल उपस्थित करून म्हणाले की, एक तर कृषीमंत्र्यांनी रात्रीचा दौरा का काढला आणि रात्रीच्या अंधारात त्यांनी काय पाहिले असा सवाल शेतकऱ्यांनी त्यांना केला आहे.
तर नुकसान दौरा करुन परतत असतानाच शेतकऱ्यांकडे पाठ वळताच शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त करत 50 खोके एकदम ओकेच्या घोषणाही सुरू केल्या. त्यामुळे अब्दुल सत्तार यांचा हा दौरा प्रचंड चर्चेत राहिला आहे.