Santosh Deshmukh Case : कृष्णा आंधळे नाशकात? किती दिवस ससेमीरा चुकवणार, पोलीस यंत्रणा सतर्क, सीसीटीव्ही तपासले, काय आले समोर?
Krushna Aandhale Beed : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अजूनही पोलिसांना सापडलेला नाही. कृष्णा हा नाशिकमध्ये असल्याची चर्चा होत असताना, पोलिसांनी त्याबाबत मोठा खुलासा केला आहे.
केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. जनरेटा वाढल्यानंतर आरोपी वाल्मीक कराड हा शरण आला. तर इतर आरोपींना पुण्यातूनच अटक करण्यात आली. पण कृष्णा अद्यापही फरार आहे. पोलिसांना त्याचा ठावठिकाणा अजून मिळालेला नाही. या आरोपींचे सर्व माहिती माध्यमांमुळे सर्वत्र पसरली आहे. तर कृष्णा हा नाशिकमध्ये असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली. तो नाशिकमध्ये फिरत असल्याचा दावा करणारे व्हिडिओ आणि छायाचित्र व्हायरल झाल्यानंतर पोलिस यंत्रणा अलर्ट झाली. पोलिसांनी अनेक ठिकाणी चौकशी आणि तपास केला. काय आढळले या तपासात?
कृष्णा आंधळे नाशिकमध्ये?
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपी कृष्णा आंधळे नाशिक मध्ये असल्याची चर्चा होत आहे. सोशल मीडियावर याविषयीचे फोटो व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. नाशिक शहरातील नाशिक रोड येथील मुक्तिधाम मंदिर परिसरात फिरत असल्याचे म्हटले जात होते. कृष्णा आंधळे हा शहरात असल्याच्या चर्चेनंतर नाशिक पोलीस ॲक्शन मोडवर आले आहेत.
पोलिसांचा दावा काय?
कृष्णा आंधळे हा नाशिक रोड येथील मुक्तिधाम मंदिर परिसरात फिरत असल्याचे म्हटले जात होते. पोलिसांनी या परिसराची कसून चौकशी केली. मुक्तिधाम मंदिर परिसरात उपनगर पोलिसांनी पाहणी केली. मंदिर परिसरात असलेल्या सीसीटीव्हीची तसेच लॉजिंग रेकॉर्डची पोलिसांनी पडताळणी केली. संतोष देशमुख हत्येतील आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे. उपनगर पोलिसांनी रात्री सर्च ऑपरेशन करून त्याची माहिती घेतली. सोशल मीडियावरील व्हायरल फोटो कृष्णा आंधळेचे नसल्याचे पोलिसांनी तपासाअंती स्पष्ट केले आहे.
कृष्णाने दिले पोलिसांना आव्हान
9 डिसेंबर रोजी केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून खून करण्यात आला. तेव्हापासून सर्व आरोपी फरार होते. वाल्मीक कराड पुण्यात शरण येताच इतर आरोपींना सुद्धा पुण्यातूनच अटक करण्यात आली हे विशेष. पण कृष्णा आंधळे नंतर अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. या घटनेतील घडामोडी पाहता तो सातत्याने ठिकाणं बदलत असल्याचे समोर येत आहे. तो साध्या चहा-बिस्किटावर दिवस काढत असल्याचा दावा करण्यात येतो. त्यामुळे तो लवकर पोलिसांच्या हाती लागणार नाही, अशी पण चर्चा होत आहे. त्याने पोलीस यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभं केलं आहे.