भारती पवार यांना कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा घेराव; कांदा उत्पादकांनी केला हा आरोप

जागतिक पातळीवर मागणी नाही. लाल कांदा हा लवकर खराब होतो. शेतकरी संघटनेनं निवेदन द्यावं की, नाफेड काही कामाचं नाही. आम्ही नाफेडची खरेदी बंद करू, असंही भारती पवार यांनी सांगितलं.

भारती पवार यांना कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा घेराव; कांदा उत्पादकांनी केला हा आरोप
Follow us
| Updated on: Mar 05, 2023 | 3:46 PM

नाशिक : केंद्रीय मंत्री भारती पवार यांना कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी घेराव घातला. नाशिकमधील निफाड तालुक्यातील शिरसगावमध्ये हा प्रकार घडला. भारती पवार म्हणाल्या, मी नाफेडची खरेदी करण्यासाठी आग्रह केला. तुम्ही विरोध करत आहात. आजपर्यंत सरकार लाल कांदा खरेदी करत नव्हतं. आता तो आम्ही खरेदी करत आहोत. केंद्र सरकारनं पहिल्यांदा लाल कांदा खरेदी करण्याचा हा निर्णय घेतल्याचं भारती पवार म्हणाल्या. जागतिक पातळीवर जे भाव असतील त्या भावाने खरेदी करा. असं शेतकरी म्हणाले. त्यावर भारती पवार म्हणाल्या, जागतिक पातळीवर मागणी नाही. लाल कांदा हा लवकर खराब होतो. शेतकरी संघटनेनं निवेदन द्यावं की, नाफेड काही कामाचं नाही. आम्ही नाफेडची खरेदी बंद करू, असंही भारती पवार यांनी सांगितलं.

निफाड तालुक्यातील शिरसगाव येथे शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्रीय कुटुंब कल्याण व आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांना घेराव घातला. शेतकऱ्यांचा कांदा घेऊन नाफेड हा समुद्रात बुडवावा, असे वक्तव्य या संघटनेच्या वतीने करण्यात आले. या केलेल्या वक्तव्याचा मंत्री भारती पवार यांनी निषेध केला. आज त्या लासलगाव येथील नाफेड कांदा खरेदी केंद्रावर कांदा खरेदीची पाहणीसाठी आल्या होत्या. पत्रकारांनी विचारलेला प्रश्नांना उत्तर देताना त्या बोलत होत्या.

संघटनेने चुकीचे स्टेटमेंट करू नये

शेतकरी शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्ते यांनी मंत्री भारती पवार यांना घेराव घातला. शेतकऱ्याचा कांदा घेऊन मार्केटने हा समुद्रात बुडवावा असे वक्तव्य संघटनेनं केलं. याबाबत भारती पवार यांना विचारल्या असतात त्या म्हणाल्या की, शेतकरी संघटनेचे काम अतिशय चांगलं चालू आहे. शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या हेतूने ते काम करतात. परंतु आज ज्या पद्धतीने त्यांचे स्टेटमेंट आलं की कांदा त्यांनी शेतकऱ्यांचा कांदा घेऊन समुद्रात बुडवा. असं त्यांचं स्टेटमेंट आले मी याचा निषेध करते. माझी इच्छा आहे की, माझ्या देशातला शेतकरी राबराब राबतो कष्ट करतो. हे समुद्रात फेकण्यासाठी नाही. अशा पद्धतीचे स्टेटमेंट करून जर शेतकऱ्यांचा अपमान होणार असेल तर मी याचा निषेध करते. उगीच चुकीचे आरोप करून नाफेडसारख्या यंत्रणेला शेतकऱ्यांच्या मदतीपासून वंचित करू नका, असे भारती पवार यांनी सांगितलं.

नाफेडने शेतकऱ्यांचा इतका कांदा खरेदी केला

नाफेड व्यापारांचा कांदा मोठ्या प्रमाणात खरेदी करत असल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. याबाबत मंत्री भारती पवार यांना विचारला असता त्या म्हणाल्या की, माझा मतदारसंघ मुळात कांद्याचा निर्माता आहे. जास्त प्रोडक्शन कांद्याचे माझ्या जिल्ह्यात होतं. कांदा एक्सपोर्ट चांगला कॉलिटीचा आपल्या जिल्ह्यात नव्हता. यावर सातत्याने केंद्र सरकारच्या माध्यमातून जी जी मदत शक्य आहे तेथे करण्यासाठी मी काम करत आहे. भुजबळ साहेबांनी असा आरोप केला की, नाफेड व्यापाऱ्यांकडून कांदा खरेदी करतात. या गोष्टीला भारती पवार यांनी आक्षेप घेतला. भुजबळ साहेबांना विनंती करते की, साहेब आपण एकदा यावं. नाफेडच्या अधिकाऱ्यांसोबत आपण चर्चा करावी. नाफेडने फार्मा प्रोडूसर कंपनीच्या माध्यमातूनही खरेदी सुरू केली आहे. कदाचित साहेबांना असं वाटलं असेल की कंपनी नावामुळे हे फक्त व्यापारीच आहेत का, असा त्यांचा अर्थ होऊ शकतो. आकडा बघीतला तर जवळपास 2400 मेट्रिक टन कांद्याची खरेदी झालेली आहे. आपल्या जिल्ह्यातनं जवळपास 677 शेतकऱ्यांना नाफेडच्या माध्यमातून खरेदी केली. त्याचे रेकॉर्ड नाफेडकडे आहे. व्यापाऱ्यांनी खरेदी केला असा एकाही व्यापाऱ्याचा रेकॉर्ड नाहीय. मला वाटतं ही दिशाभूल चुकीची करू नये, असंही भारती पवार म्हणाल्या.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.