नाशिक – देशात, महाराष्ट्रात भाजपचे संबंधी लोक आणि अधिकारी यांनी महापुरुषांचा अपमान करण्याची सुपारी घेतलीय. हे मोठं षडयंत्र आहे, अशी टीका भास्कर जाधव यांनी केली. 40 आमदार फोडून भाजपच्या हाताला काहीच लागलं नाही. भाजपला चारीमुंड्या धूळ चारायची असं स्वाभिमानी जनता ठरवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. भाजप दंगल घडवू पाहत आहे. विविध वक्तव्यांमुळे महाराष्ट्रात अस्वस्थता निर्माण झालीय.
हिवाळी अधिवेशनात अतिवृष्टी मदत, कारखाने इतरत्र हलवले असे महत्त्वाचे विषय आहेत. आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना उघडपणे आव्हान केलं आहे. नोकर भरती, पोलीस भरती, कर्नाटक सीमा वाद याचा जाब विचारणार आहे, असंही जाधव यांनी सांगितलं.
नारायण राणे यांच्या बद्दल काहीच बोलणार नाही. कुडाळमध्ये खूप काही बोललो आहे. चार-पाच वर्षात राणे यांना कोणी सभेला का बोलावलं नाही. त्यांच्या बोलण्याला किंमत नाही. उद्धव ठाकरे आणि शिवसेना लक्ष देत नाहीत. पोलीस बदल्यांचा सपाटा, मंत्रालयात अनागोंदी कारभार सुरू असल्याचंही ते म्हणाले.
भास्कर जाधव यांनी सांगितलं की, महाराष्ट्र कुठे जाणार, याची चिंता सतावतेय. खोके सरकारचा कारभार असाच सुरू आहे. प्रशासनाचा खेळखंडोबा सुरू आहे. तुकाराम मुंढे यांना फार महत्त्व देण्याचे काम नाही. तेच कायम का वादात येतात, असा सवालही जाधव यांनी केला.
राज ठाकरे यांचा दौरा रद्द होणार नाही ना ? यावर भास्कर जाधव म्हणाले, यांचा दौरा येतो आणि रद्द होत असतो. स्वायत्त संस्थांचा वापर राजकारणासाठी होत आहे. या सगळ्या संस्था कुणाच्या तरी दावणीला बांधल्यासारखे काम करत आहे, असंही त्यांनी सांगितलं.