Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केंद्राचा सावळागोंधळ, PM केअर फंडातून नाशिकला 60 व्हेंटिलेटर, पण कनेक्टरच नसल्यानं बंद

सगळीकडेच व्हेंटिलेटर बेडचा प्रचंड तुटवडा आहे. अनेक रुग्णांना व्हेंटिलेटर बेड न मिळाल्याने आपला जीवही गमवावा लागलाय. त्यातच केंद्र सरकारने नाशिक महापालिकेला दिलेल्या 60 व्हेंटिलेटरची दुरावस्था झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

केंद्राचा सावळागोंधळ, PM केअर फंडातून नाशिकला 60 व्हेंटिलेटर, पण कनेक्टरच नसल्यानं बंद
सांकेतिक फोटो
Follow us
| Updated on: May 07, 2021 | 4:03 AM

नाशिक : सगळीकडेच व्हेंटिलेटर बेडचा प्रचंड तुटवडा आहे. अनेक रुग्णांना व्हेंटिलेटर बेड न मिळाल्याने आपला जीवही गमवावा लागलाय. त्यातच केंद्र सरकारने नाशिक महापालिकेला दिलेल्या 60 व्हेंटिलेटरची दुरावस्था झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. नाशिकच्या बिटको आणि झाकीर हुसेन या महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये केंद्राने पीएम केअर फंडातून हे व्हेंटिलेटर दिले. मात्र, केंद्राच्या पातळीवरील सावळ्या गोंधळाने हे व्हेंटिलेटर तब्बल 10 दिवस होऊनही रुग्णांच्या उपयोगासाठी आलेले नाहीत (Centre send 60 ventilators through PM Care fund but still not in use in Nashik).

केंद्र सरकारने नाशिकसाठी व्हेंटिलेटर तर पाठवले, मात्र व्हेंटिलेटर जोडण्यासाठी लागणारे आवश्यक सुटे पार्ट्स (कनेक्टर) सोबत पाठवण्यातच आले नाही. हे सुटे पार्ट मिळालेच नसल्याने पाठवलेले 60 व्हेंटिलेटर्स अक्षरशः धूळ खात पडून आहेत. विशेष म्हणजे शहरात एकीकडे एका एका व्हेंटिलेटरसाठी रुग्ण तडफडत आहेत. असं असताना तब्बल 60 व्हेंटिलेटर फक्त प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आणि निष्काळजीपणामुळे पडून असल्याचं बघायला मिळत आहे. या घटनेतून एकूणच केंद्रातील प्रशासनाचा अर्धवट कारभाराचा पर्दाफाश झालाय.

व्हेंटिलेटरची गरज असताना केलेल्या हलगर्जीपणाबद्दल नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया

व्हेंटिलेर्सची ही दुरुवस्था आणि प्रशासनाची अनास्था पाहून नागरिकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. आम्ही आमच्या घरातील सदस्यांना गमावत असताना सरकार व्हेंटिलेटरही उपलब्ध करुन देत नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत. तसेच सरकारने आवश्यक वैद्यकीय सोयीसुविधा आणि औषधं तात्काळ उपलब्ध करुन द्यावेत अशीही मागणी होत आहे.

नाशिकमधील कोरोनाची स्थिती काय?

नाशिकमध्ये आज (6 मे 2021) रोजी कोरोना रुग्णांच्या संख्येत झालेली वाढ 4 हजार 160 इतकी आहे. तसेच पूर्ण बरे झालेले रुग्णांची संख्या 3 हजार 782 इतकी आहे. यात नाशिक मनपा हद्दीत 2487 रुग्ण, नाशिक ग्रामीण भागात 1612 रुग्ण, मालेगाव मनपा हद्दीत 18 आणि जिल्ह्याच्या बाहेरील 43 रुग्णांचा समावेश आहे.

नाशिक जिल्ह्यातील एकूण करोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडा 3 हजार 741 पर्यंत पोहचलाय. आज दिवसभरात एकूण 49 कोरोना रुग्णांचे मृत्यू झालेत. यात नाशिक मनपा हद्दीतील 20, मालेगाव मनपा हद्दीतील 06 आणि नाशिक ग्रामीणमधील 23 कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा समावेश आहे.

नाशिकमधील प्रकाराचा काँग्रेसकडूनही निषेध

नाशिकमधील प्रकारावरुन काँग्रेसनेही मोदी सरकारवर टीका केलीय. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले, “मोदी सरकारने पीएम केअर फंडातून (PM Care Funds) 10 दिवसांपूर्वी नाशिक महापालिकेला 60 व्हेंटिलेटर्स पाठवलेत. परंतू ते कनेक्टरशिवाय पाठविल्याने वापरलेच गेले नाहीत. व्हेंटिलेटरची तीव्र निकड असताना असा हलगर्जीपणा अपेक्षित आहे का? मोदी सरकारच्या योजना कौशल्य व व्यवस्थापनाचे कौतुक करावे तेवढे कमी!”

दरम्यान, पीएम रिलिफ फंड ऐवजी पीएम केअर फंड सुरु केल्यापासूनच विरोधकांकडून त्यावर टीका होत आहे.

हेही वाचा :

वडिलांच्या वर्षश्राद्धाचा खर्च टाळला, नागपूरच्या तरुणाकडून कोरोनाग्रस्तांना ‘ॲाक्सिजन ह्युमिडीफायर’ यंत्र भेट

पीएम केअर फंडातील 80 टक्के व्हेंटिलेटर जळगावात धूळखात, खासदार उन्मेश पाटील यांचा गंभीर आरोप

पुण्यात व्हेंटिलेटर नसल्याचा आरोप गिरीश बापटांनी फेटाळला, लॉकडाऊन एकमेव उपाय नसल्याचाही दावा

व्हिडीओ पाहा :

Centre send 60 ventilators through PM Care fund but still not in use in Nashik

पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल
पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल.
दादा-पवार 15 दिवसात चारदा भेटले, काका पुतण्याच मनोमिलन होणार?घडतंय काय
दादा-पवार 15 दिवसात चारदा भेटले, काका पुतण्याच मनोमिलन होणार?घडतंय काय.
साहेब तुम्ही एक पाऊल पुढे टाका अन्... ठाकरे सेनेच्या त्या बॅनरची चर्चा
साहेब तुम्ही एक पाऊल पुढे टाका अन्... ठाकरे सेनेच्या त्या बॅनरची चर्चा.
मनसेच्या संदीप देशपांडेंचं शेलारांसह आदित्य ठाकरेंना पत्र, कारण काय?
मनसेच्या संदीप देशपांडेंचं शेलारांसह आदित्य ठाकरेंना पत्र, कारण काय?.
राज यांचा जन्म सेनेच्या गर्भातून, ठाकरेंच्या युतीवर सामनानं काय म्हटल?
राज यांचा जन्म सेनेच्या गर्भातून, ठाकरेंच्या युतीवर सामनानं काय म्हटल?.
VIDEO :दौऱ्यात व्यस्त, भर उन्हात रस्त्यावर गाडी थांबवून बाप-लेकीची भेट
VIDEO :दौऱ्यात व्यस्त, भर उन्हात रस्त्यावर गाडी थांबवून बाप-लेकीची भेट.
ठाकरे बंधूच्या युतीवर दमानियाम्हणाल्या, 'दोन हरलेली माणसं एकत्र....'
ठाकरे बंधूच्या युतीवर दमानियाम्हणाल्या, 'दोन हरलेली माणसं एकत्र....'.
काहींच्या पोटातून मळमळ बाहेर पडतेय; संजय राऊतांचा शिंदेंसेनेला टोला
काहींच्या पोटातून मळमळ बाहेर पडतेय; संजय राऊतांचा शिंदेंसेनेला टोला.
भाजप आमदाराला पोलिसाने फोनवर घातल्या शिव्या, ऑडिओ व्हायरल अन्...
भाजप आमदाराला पोलिसाने फोनवर घातल्या शिव्या, ऑडिओ व्हायरल अन्....
ठाकरे बंधूंची युती? दोन्ही पक्षात मनोमिलनाचं वारं
ठाकरे बंधूंची युती? दोन्ही पक्षात मनोमिलनाचं वारं.