आधी जोशीबुवा भविष्य पाहायचे, आता पाटीलबुवा पाहतात, भुजबळांचा चंद्रकांत पाटलांना टोला

चंद्रकांत पाटील यांनी भविष्य सांगणे सुरु केले आहे. त्यांना विचार, मी त्यांना विचारले होते जोशी बुवा भविष्य पहायचे, पाटीलबुवा कधीपासून भविष्य सांगायला लागले? अशी कोपरखिळी त्यांनी चंद्रकांत पाटलांना मारली आहे.

आधी जोशीबुवा भविष्य पाहायचे, आता पाटीलबुवा पाहतात, भुजबळांचा चंद्रकांत पाटलांना टोला
चंद्रकांत पाटील यांनी भविष्य सांगणे सुरु केले आहे. त्यांना विचार, मी त्यांना विचारले होते जोशी बुवा भविष्य पहायचे, पाटीलबुवा कधीपासून भविष्य सांगायला लागले? अशी कोपरखिळी त्यांनी चंद्रकांत पाटलांना मारली आहे.
Follow us
| Updated on: Feb 18, 2022 | 3:15 PM

नाशिक : पालकमंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) आज येवला येथे विविध विकास कामाच्या दौरा प्रसंगी आले होते. यावेळी पत्रकारांनी भुजबळांना विचारले की पाच राज्यात निवडणुका (Five State Elections 2022) सुरू असून भाजपला यश मिळेल असा दावा भाजप करत आहे.यावरून त्यांनी भाजप आणि चंद्रकांत पाटलाना (Chandrakant Patil) टोला लगावला आहे. चंद्रकांत पाटील यांनी भविष्य सांगणे सुरु केले आहे. त्यांना विचार, मी त्यांना विचारले होते जोशी बुवा भविष्य पहायचे, पाटीलबुवा कधीपासून भविष्य सांगायला लागले? अशी कोपरखिळी त्यांनी चंद्रकांत पाटलांना मारली आहे. तसेच मी काय भविष्यकार आहे का? मी तर भाजीवाला आहे. मात्र विरोधी पक्षामागे केंद्रीय यंत्रणेचा वापर करणाऱ्या भाजपाला थांबवण्यासाठी लोकशाही मानणार्‍या लोकांनी लोकशाही विचार केला पाहिजे अशी टीका भुजबळांनी केली आहे.

कोर्लई गावात तर पडकी घरं

उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावावर बंगले आहेत असा दावा सोमय्यांनी केल्यानंतर ते पहाण्यासाठी किरीट सोमय्या हे करलेई गावात दाखल झाले. याबद्दल विचारले असता भुजबळ म्हणाले, त्या गावातील घरं माध्यमांमधून दाखवत आहेत. मात्र तेथे तर पडकी घरं, भिंती दिसत आहेत. तसेच भुजबळ फार्महाऊसवर पाहणी केल्या प्रकरणी किरीट सोमय्या यांना नोटीस देण्यात आलेली आहे अशीही माहिती समोर आली आहे. याबद्दल भुजबळांना विचारले असता भुजबळ म्हणाले की, सांताक्रूझ येथील बंगला असून या ठिकाणी किरीट सोमय्या काही लोकांना घेऊन गेले होते. मात्र पोलिसांनी गर्दीमुळे त्यांची तब्येत बिघडू नये. याकरता पोलिसांनी नोटीस बजावली होती.

सोमय्यांच्या जाण्याने मोठा तणाव

भाजपचे नेते किरीट सोमय्या आपल्या लवाजम्यासह आज कोर्लईत पोहोचले. यावेळी भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते. बाईकवर बसून शेकडो कार्यकर्ते सोमय्यांसोबत आले होते.सोमय्या यांच्यासोबत भाजपचे कार्यकर्ते असल्याने शिवसैनिकांनीही कोर्लईच्या ग्रामपंचायतीसमोर तुफान गर्दी केली. यात महिला रणरागिणीचा सर्वाधिक समावेश होता. शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आल्याने कोर्लईत प्रचंड तणाव निर्माण झाला होता. सोमय्या येताच शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. यावेळी सोमय्या यांचा ताफाही अडवण्याचा प्रयत्न झाला. तसेच सोमय्या हे ग्रामपंचायतीच्या कार्यालयात जाताच शिवसैनिकांनीही ग्रामपंचायत कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, सोमय्यांसोबत असलेल्या सुरक्षा रक्षकांनी शिवसैनिकांना हुसकावून लावले.

VIDEO: सोमय्या कोर्लईत येताच तणाव, शिवसेना-भाजप कार्यकर्ते आमने-सामने, गोमूत्र आणि दूध शिंपडून शुद्धीकरण

HSC, SSC Exams | दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकला, औरंगाबादच्या विद्यार्थ्याची खंडपीठात याचिका, सुनावणी कधी?

Dombivli Murder | अतिप्रसंगाला विरोध केल्याने विवाहितेची हत्या, सोफा सेट मर्डर केस सॉल्व्ह, केवळ चपलांवरुन आरोपी जाळ्यात

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.