Chhagan Bhujbal : भक्तीचे नव्हे, हे शक्तीचे राजकारण, भुजबळांचा आसूड; नाशिकमध्ये धारीवाल हॉस्पिटल-रिसर्च सेंटरचे उदघाटन
भुजबळ म्हणाले की, देशात द्वेषाचे वातावरण निर्माण केले जाते असून, हे भक्तीचे राजकारण नसून शक्तीचे राजकारण आहे. लोकांना दुःख देणारे आणि अशांतता निर्माण करणारे राजकारण सध्या देशभरात सुरू आहे. शांततेचा मार्ग अवलंबिला, तर त्यात सर्वांचे सुख आहे.
नाशिकः जगभरात धर्माच्या नावाखाली भांडणे आणि युद्ध सुरू आहे. देशात द्वेषाचे वातावरण निर्माण केले जाते असून, हे भक्तीचे राजकारण नसून शक्तीचे राजकारण आहे. त्यामुळे सगळीकडे द्वेष पसरत असून शांतता भंग होत आहे. भगवान महावीर यांनी जगाला शांतता आणि सत्याचा मार्ग अवलंबावा अशी शिकवण दिली. भगवान महावीरांचा अहिंसेचा संदेश जर जगाने स्वीकारला, तर जगभरात कुठेही भांडण होणार नाही. जागतिक शांततेसाठी त्यांचे विचार अतिशय उपयुक्त आहेत, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले. नाशिक (Nashik) शहरातील पंचवटी परिसरात महावीर जैन धर्मार्थ दवाखाना संचलित श्री. रसिकलाल एम. धारीवाल हॉस्पिटल व रिसर्च सेंटरचे (Dhariwal Hospital and Research Center) उदघाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला आचार्य श्री पुलकसागरजी महाराज, शोभाताई धारीवाल,जान्हवी धारीवाल, रमणलाल लुंकड, सोहनलाल भंडारी, माजी महापौर रंजना भानसी, नंदलाल पारख, डॉ. एन. पी. छाजेड, मदनलाल साखला, विलास शहा, राजेंद्र जैन, डॉ. प्रशांत छाजेड, रमेश फिरोदिया आदी मान्यवर उपस्थित होते.
नाशिकमध्ये चांगले हॉस्पिटल
भुजबळ म्हणाले की, स्व. हुकूमचंद बागमर यांनी नाशिक शहर आणि समाजासाठी मोठे योगदान दिले. चांगले काम करताना अनेक अडचणी येतात. मात्र, ते डगमगले नाहीत. सामाजिक कार्याचा आदर्श त्यांनी निर्माण केला. अतिशय चांगले हॉस्पिटल नाशिकमध्ये उभे राहिले आहे.रुग्णसेवेसाठी सारखी दुसरी कुठलीच सेवा नाही. मानवतेचा धर्म या ठिकाणी निभावला जाणार आहे. बॉर्डरवर लढणारा सैनिक जेवढा महत्वाचा आहे तेवढाच कोरोनात रुग्णांचा जीव वाचविणारा डॉक्टर महत्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.
द्वेषाच्या वातावरणाची निर्मिती
भुजबळ म्हणाले की, देशात द्वेषाचे वातावरण निर्माण केले जाते असून, हे भक्तीचे राजकारण नसून शक्तीचे राजकारण आहे. लोकांना दुःख देणारे आणि अशांतता निर्माण करणारे राजकारण सध्या देशभरात सुरू आहे. शांततेचा मार्ग अवलंबिला, तर त्यात सर्वांचे सुख आहे, असे सांगत पर्यावरणाचा ऱ्हास झाला तर आरोग्याच्या अनेक समस्या वाढणार आहे. त्यामुळे पर्यावरणाचा संतुलन राहण्यासाठी आपल्याला काम करावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. इतर बातम्याः