हेमंत गोडसेंसाठी मोदींच्या सभा, छगन भुजबळांचं संबोधन; म्हणाले, सर्फरोशी की तमन्ना…
Chhagan Bhujbal on Loksabha Election 2024 in Narendra Modi Nashik Sabha : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाशिकमध्ये सभा झाली. या सभेत छगन भुजबळ यांनी संबोधित केलं. तेव्हा त्यांनी लोकसभा निवडणुकीवर भाष्य केलं. तसंच नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं. वाचा सविस्तर...
नाशिकचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे आणि दिंडोरीच्या उमेदवार भारती पवार यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा झाली. या सभेत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी भाषण केलं. छगन भुजबळ देखील या जागेवरून लढण्यासाठी इच्छूक होते. त्यामुळे या जाहीर सभेत भुजबळ काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. रोज नविन गोष्टी येतील. तुम्हाला नाराज करण्याचा प्रयत्न होईल. ही लढाई जिंकायची आहे. सर्फरोशी की तमन्ना आज हमारे दिल में है…, असं छगन भुजबळ म्हणाले.
मोदींच्या कामाचं कौतुक
दिंडोरी मतदारसंघातच्या महायुतीचे उमेदवार भारती ताई पवार आणि हेमंतराव गोडसे यांच्या प्रचार सभेसाठी आपण जमलो आहोत. या देशाचे कणखर नेतृत्व आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नाशिकमध्ये आले आहेत. मोदी साहेबांनी केवळ भारताला नाही तर जगाला चकित केलं आहे. भारताची प्रतिमा वाढविण्यासाठी जे निर्णय घेतले. ते यशस्वी झालेत. नागपूरपासून मुंबईपर्यंत समृद्धी महामार्गावरून जात आहोत. मोदी सरकारच्या काळात अर्थिक विकास होतोय, हे विसरता कामा नये, असं छगन भुजबळ म्हणाले.
देवेंद्रजी माझ्या मतदार संघात दोन योजना आणल्या. येवल्यात प्रत्येक घरात पाणी येणार आहे. लोकांना लहान वाटत असेल. पण महिलांना पाण्यासाठी खूप लांब जाव लागतं. देश स्वच्छ असला पाहिजे. प्रत्येक घराला शौचालय देण्याचं काम केलं आहे. बाराबलुतेदार यांना कर्ज देण्याच काम मोदी यांनी केलं आहे, असं भुजबळांनी म्हटलं आहे.
मोदींचं काम सांगायला…- भुजबळ
ओबीसीसाठी घरकुल योजना आहे. ज्या खात्याचा मी मंत्री आहे. 80 कोटी गरिबांना घरात आज अन्नधान्य दिलं जात आहे. शेतक-यांसाठी पण काम सुरु झालं आहे. नाशिक यंत्रभुमी आहे, तशीच कृषीभुमी आहे. मुंबईचा अर्धा भाजीपाला नाशिकमधून जात आहे. मराठवाड्याला पाणी द्या यासाठी काम कराव लागेल. पाणी नसेल तर शेतकरी काय करणार? बेटी पढाओ बेटी बचाओ बाबत काम केलं. मोदींचं काम सांगायला दिवस पुरणार नाही, असं छगन भुजबळ यांनी या भाषणात म्हटलं आहे.