VIDEO: कुणाला धमकी देत नाही, विनंती नक्की करतात, भुजबळांचं कांदे वादावर वक्तव्य

शिवसेना आमदारा सुहास कांदे यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या भ्रष्टाचाराविरोधीतील पुरावे मुख्यमंत्र्यांना दिल्याचं सांगितलं. (Chhagan Bhujbal)

VIDEO: कुणाला धमकी देत नाही, विनंती नक्की करतात, भुजबळांचं कांदे वादावर वक्तव्य
Chhagan Bhujbal
Follow us
| Updated on: Sep 30, 2021 | 6:08 PM

नाशिक: शिवसेना आमदारा सुहास कांदे यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या भ्रष्टाचाराविरोधीतील पुरावे मुख्यमंत्र्यांना दिल्याचं सांगितलं. तसेच भुजबळांचं पालकमंत्रीपद काढून घेण्याची मागणीही केली. त्यावर भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझ्याकडून वादाला पूर्णविराम देत असल्याचं छगन भुजबळ यांनी सांगत वादावर पडदा पाडण्याचं काम केलं आहे. तसेच भुजबळ कुणाला धमकी देत नाही, विनंती नक्की करतात, असं विधानही त्यांनी केलं आहे.

आमदार सुहास कांदे यांनी पत्रकार परिषद घेऊन भुजबळांवर टीकास्त्र सोडलं होतं. त्यानंतर छगन भुजबळ यांनीही तातडीने पत्रकार परिषद घेऊन आपल्यावरील आरोपांना उत्तर देतानाच वादावर पडदा टाकण्याचंही काम केलं. या वर्षी फक्त नियोजन निधीअंतर्गत केवळ 10 टक्केच रक्कम आली आहे. तसेच हा निधी फक्त कोरोनासाठी वापरण्याचे आदेश आहेत. बाकी पैसे आले की अडचणी दूर करू. माझ्याकडे निधी मागण्यासाठी कोणीही आलं तरी, जिल्हाधिकारी यांनी उचित कारवाई करावी असा रिमार्क असतो, असं भुजबळ म्हणाले.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आपलं कोर्ट

आमदार निधी हा आमदाराचा असतो. डीपीडिसीचा निधी हा प्रशासनाचा अधिकार आहे. कमी पैसे मिळाले असं त्यांचं म्हणणं असेल तर निधी आल्यावर उचित कारवाई केली जाईल. लोकप्रतिनिधींची अडचण आम्ही दूर करू. भ्रष्टाचार झाला असेल तर चौकशी करू. मविआचे आमदार म्हणून कोर्टात जाण उचित नाही. आपले न्यायाधीश मुख्यमंत्री आहेत. काही तक्रार असेल तर त्यांना सांगू. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आपलं कोर्ट आहे. त्यामुळे एकमेकांवर आरोप करणं योग्य नाही. मला काही सांगायचं नसेल मुख्यमंत्र्यांना सांगावं, असा सल्लाही त्यांनी कांदे यांना दिला.

भुजबळ धमकी देत नाही, विनंती करतात

त्यांनी एका व्यापाऱ्याला श्रीलंकेतून फोन आल्याचं म्हटलं आहे. धमकी देण्याचा इतिहास त्यांचाच आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. पण हे प्रकरण घडलं असं ते म्हणतात तेव्हा 2015 साली बीजेपीचे सरकार होते. त्यांनी तक्रार केली असणार. त्यावर चौकशी झाली असेल. त्या चौकशीत काही सापडलं नाही म्हणून काही झालं नाही. आताच्या प्रकरणावर अक्षय निकाळजेंनीच सर्व स्पष्ट केलं आहे. भुजबळ कोणाला धमकी देत नाही. विनंती नक्की करतात. कदाचित येणाऱ्या निवडणूक एकत्र लढण्याचा निर्णय होईल. तेव्हा आम्हाला एकत्र लढावं लागेल. या प्रकरणाला माझ्याकडून मी पूर्णविराम देऊ इच्छितो, असं ते म्हणाले.

संबंधित बातम्या:

भाजीपाला विकणारे भुजबळ 25 वर्षात 25 हजार कोटींचे मालक कसे?, पालकमंत्रीपद काढून घ्या; कांदेंचा घणाघात

‘शेतकरी हंबरडा फोडतोय, मुख्यमंत्री साहेब बळीराजाला चिंतामुक्त कधी करणार ?’ सदाभाऊ खोत यांचा सवाल

VIDEO: जलयुक्त शिवारमुळे महापूर आला असं म्हणणं हस्यास्पद; चंद्रकांत पाटील यांचा दावा

(Chhagan Bhujbal reply to suhas kande’s allegations)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.