शेतकरी बांधवांना खरिपासाठी तातडीनं कर्ज पुरवठा करणार: छगन भुजबळ
छगन भुजबळ यांनी खरिप हंगामासाठी शेतकऱ्यांना तातडीनं कर्ज देण्याचे आदेश दिले आहेत. Chhagan Bhujbal crop loan
नाशिक: अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी कोरोना महामारीचा विचार करता शेतकऱ्यांना शेती कामांमध्ये कोणतीही अडचण येऊ नये याकरीता शासनामार्फत आवश्यक सर्व प्रयत्न करण्यात येत आहेत, अशी माहिती दिली. जे शेतकरी कर्जाचे हप्ते व कर्जाची नियमितपणे परतफेड करत असतील, अशा शेतकऱ्यांना बँकांद्वारे खरीप हंगामासाठी तातडीने कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल असेही ते म्हणाले. (Chhagan Bhujbal said banks and administration lend crop loan to farmers before Kharip Season)
नाशिकमध्ये आढावा बैठक
आज जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात पीक कर्जाबाबत झालेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री श्री. भुजबळ बोलत होते. या बैठकीस जिल्हाधिकारी सूरज मांढरे, सहकारी संस्थेच्या विभागीय सहनिबंधक ज्योती लाटकर, जिल्हा उपनिबंधक सतिश खरे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य प्रशासक मोहमद आरीफ, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अर्धेंद्रु शेखर यांच्यासह सहकारी बँकेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
कर्जमाफीसाठी मिळालेला निधी कर्जमाफीसाठी वापरा
छगन भुजबळ म्हणाले की, शेतकरी कर्जमाफीसाठी प्राप्त झालेला निधी कर्जमाफीसाठीच वापरण्यात यावा. शेतकऱ्यांनी सहकारी संस्थामार्फत घेतलेल्या कर्जाच्या रकमेची वसुली करण्यासाठी त्यांच्या जमीनींचे लिलाव करण्यासाठी सध्याचे वातावरण अनुकूल नाही. ज्या शेतकऱ्यांनी कर्जाची वेळेत परतफेड केली असून त्यांना नव्याने कर्ज घ्यायचे आहे, अशा शेतकऱ्यांना नवीन कर्ज घेण्यासाठी बँकाकडून आवश्यक असणारी कागदपत्रे व प्रमाणपत्रे वेळेत उपलब्ध करून देण्यात यावीत. त्याप्रमाणे शेतकऱ्यांना वेळेत व सुरळीतपणे कर्ज पुरवठा होण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
नाशिकमध्ये 2700 कोटीच्या वाटपाचं उद्दिष्ठ
2021-22 या वर्षात 2700 कोटी रुपयांचे कर्ज वाटपाच्या उद्दीष्टापैकी दोन महिन्यात 445 कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. मागील वर्षी प्रमाणे या वर्षी देखील जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर कर्ज वितरण करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी बैठकीत दिली.
इफकोकडून शेतकऱ्यांना खरिप हंगामापूर्वी गिफ्ट, नॅनो युरिया लाँच, पैसेही वाचणारhttps://t.co/aoUPMWlbx6#IFFCONanoUrea | #IFFCO| #IFFCONano | #fertilizer
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 31, 2021
संबंधित बातम्या:
नाशिक जिल्हा ऑक्सिजन निर्मितीत स्वंयपूर्ण होणार, छगन भुजबळ यांनी आराखडाचं सांगितला
(Chhagan Bhujbal said banks and administration lend crop loan to farmers before Kharip Season)