नाशिक जिल्हा ऑक्सिजन निर्मितीत स्वंयपूर्ण होणार, छगन भुजबळ यांनी आराखडाचं सांगितला

नाशिक जिल्ह्यातील 55 आॉक्सिजन प्लांटमधून ऑक्सिजन निर्मिती करण्यात येईल, असं भुजबळ म्हणाले. Chhagan Bhujbal Nashik oxygen

नाशिक जिल्हा ऑक्सिजन निर्मितीत स्वंयपूर्ण होणार, छगन भुजबळ यांनी आराखडाचं सांगितला
ऑक्सिजन प्लांट उद्घाटन
Follow us
| Updated on: May 30, 2021 | 6:15 PM

नाशिक: अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक जिल्ह्यात सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये एकूण 55 ठिकाणी ऑक्सिजन जनरेशन प्लांटच्या माध्यमातून ऑक्सिजन निर्मिती करण्यात येईल, असं सांगितलं. या सर्व प्लांटच्या माध्यमातून 50 मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती होणार आहे. नाशिक जिल्हा ऑक्सिजन निर्मितीत स्वयंपूर्ण होणार असल्याचे प्रतिपादन छगन भुजबळ यांनी केले. (Chhagan Bhujbal said Nashik district will produce sufficient oxygen from 55 plant)

नाशिकमध्ये 55 ठिकाणी होणार ऑक्सिजन प्लांटं

पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्ह्यात 55 ठिकाणी होणाऱ्या ऑक्सिजन जनरेशन प्लांट बद्दल माहिती दिली. नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 6, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 2, जिल्ह्यातील विविध नगरपालिका क्षेत्रात 9, जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय येवला, मनमाड, कळवण, चांदवड, ग्रामीण रुग्णालय पिंपळगांव बसवंत, इगतपुरी, सिन्नर, अभोणा, वणी, दिंडोरी, बाऱ्हे, घोटी, गिरणारे, हरसूल, निफाड, नगरसूल, लासलगांव, देवळा, उमराणे, सटाणा, नामपूर, मालेगांव सामान्य रुग्णालय आणि महिला रुग्णालय या 24 ठिकाणी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून ऑक्सिजन जनरेशन प्लांट निर्माण होणार आहेत.

केंद्र सरकारच्या निधीतून नांदगाव, दाभाडी, पेठ सुरगाणा या 4 ठिकाणी तर सिक्युरीटी प्रेसच्या सीएसआर फंडातून दोडी व त्र्यंबकेश्वर, गिरणारे, डांगसौंदाणे तसेच नाशिक ग्रामीणसाठी 5 असे एकूण 55 ऑक्सिजन जनरेशन प्लांट निर्माण होणार आहेत, अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली.

येवला उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी

छगन भुजबळ यांनी येवला उपजिल्हा रुग्णालयाची व कोविड सेंटरची पाहणी केली. भुजबळ यांच्या हस्ते आज येवला येथील ऑक्सिजन जनरेशन प्लांट व रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी येवला नगरपालिकेचे नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, पंचायत समिती सदस्य मोहन शेलार, नगरपालिका गटनेते प्रवीण बनकर, प्रांताधिकारी सोपान कासार, तहसीलदार प्रमोद हिले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत खैरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलजा कृपास्वामी, तालुका पोलीस निरीक्षक अनिल भवारी, येवला शहर पोलीस निरीक्षक कोळी, अंदरसुल बाजार समितीचे सभापती मकरंद सोनवणे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गुंड यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित बातम्या:

पेट्रोलने सेंच्युरी मारली, गॅसचे दर वाढले; काँग्रेसच्या काळात महागाईवर आंदोलन करणारे कुठं लपले?: बाळासाहेब थोरात

म्युकरमायकोसिस आणि लहान मुलांवरील उपचारांच्या नवीन आव्हानांसाठी प्रशासन सज्ज, भुजबळांचा दावा

(Chhagan Bhujbal said Nashik district will produce sufficient oxygen from 55 plant)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.