Chhagan Bhujbal: भाजपने ओबीसी आरक्षणाचा देशभर खून केला, छगन भुजबळांची टीका; मध्यप्रदेशचं दिलं उदाहरण

Chhagan Bhujbal: ओबीसी आरक्षणाचा राज्यात नव्हे तर देशात बीजेपी सरकारने खून केला आहे.

Chhagan Bhujbal: भाजपने ओबीसी आरक्षणाचा देशभर खून केला, छगन भुजबळांची टीका; मध्यप्रदेशचं दिलं उदाहरण
भाजपने ओबीसी आरक्षणाचा देशभर खून केला, छगन भुजबळांची टीका; मध्यप्रदेशचं दिलं उदाहरणImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 08, 2022 | 7:38 PM

नाशिक: ओबीसी आरक्षणाच्या (obc reservation) मुद्द्यावरून आघाडी सरकारला घेरणाऱ्या भाजपवर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांनी जोरदार टीका केली. भाजपने केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर ओबीसी आरक्षणाचा खून पाडला आहे. केंद्र सरकारमुळे केवळ महाराष्ट्रच नव्हे तर मध्यप्रदेशसह सर्वच राज्य ओबीसी आरक्षणाच्या मुद्दयावरून अडचणीत आले आहेत, अशा शब्दात छगन भुजबळ यांनी भाजपवर हल्ला चढवला. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारने ओबीसी आरक्षणाचा मुडदा पाडल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी केला होता. फडणवीस यांच्या या टीकेला उत्तर देताना भुजबळानी त्यांना आरसाच दाखवला. तसेच ओबीसी आरक्षणातील तांत्रिक गोष्टीकडेही त्यांनी लक्ष वेधले. तुम्ही माजी मुख्यमंत्री आहात. पण आम्ही प्रामाणिकपणे काम करत आहोत. आम्हाला सांगा काय करायचे ते सूचवा, असं सांगत भुजबळांनी फडणवीसांच्या कोर्टात ओबीसी आरक्षणाचा चेंडूही टोलविला.

छगन भुजबळ मीडियाशी बोलत होते. ओबीसी आरक्षणाचा राज्यात नव्हे तर देशात बीजेपी सरकारने खून केला आहे. 2010 मध्ये कृष्णमूर्ती अहवालानंतर जनगणना करा असे आम्ही सांगितले होते. 2016 मध्ये जनगणना संपल्यापासून हा रिपोर्ट त्यांच्याकडे आहे. देशात आणि राज्यात भाजप सरकार होते, फडणवीसांनी तेव्हा काही केले नाही. दोन वर्ष आम्ही आणि तुम्ही सगळेजण मुखपट्टी लावून घरी बसलो होतो. त्यामुळे आरक्षणावर काम करता आलं नाही, असं भुजबळ म्हणाले.

हे सुद्धा वाचा

प्रत्येक गोष्टीत राजकारण नको

तुमच्यामुळे महाराष्ट्रच नाही तर मध्यप्रदेशसह सर्व राज्य अडचणीत आली. ट्रिपल टेस्ट पूर्ण होत नाही हे पाहून त्यांनी डेटा मागितला. आमचे काम रात्रंदिवस सुरू आहे. प्रत्येक कायदा करत असताना फडणवीसांचं सहकार्य मागितले. आम्ही त्यांच्या घरी गेलो. तुम्ही माजी मुख्यमंत्री आहात. पण आम्ही प्रामाणिकपणे काम करत आहोत. आम्हाला सांगा काय करायचे? सूचवा. प्रत्येक गोष्टीत राजकारण करू नका. आमचं पुढचे पाऊल म्हणजे मंगळवारी मध्यप्रदेशच्या निर्णयानंतर बघू, असंही त्यांनी सांगितलं.

मी बोलतोय त्याला कागदपत्रांचा आधार

आरक्षण देण्याचा प्रयत्न आम्ही या निवडणुकीत करू. ओबीसी डेटा बाठिया कमिशनकडून आम्ही घेऊ. तुम्ही सुद्धा तिथे जाऊन कसे करायचे ते सांगा. मी बोलतोय त्याला कागदपत्रांचा आधार आहे, असं भुजबळ म्हणाले.

फक्त दंगे घडवू नका

यावेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरही भाष्य केलं. निवडणुका आल्या म्हणजे दौरे होणारच. प्रत्येत पक्ष आपला अजेंडा राबवणार. कोणी भोंगा वाजवणार तर कोणी इतर काही करणार. एवढेच आहे की समाजामध्ये दंगे घडवू नका. तुम्ही येणार तेव्हा भोंगा, माईक असणारच आहे. फक्त त्यातून महागाईवरही वाचा फोडा. अयोध्येत शिवसेनाही त्यांच्या पद्धतीने होर्डिंग लावणारच, असंही ते म्हणाले.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.