आता त्यांना ‘तुमचा भुजबळ करू’ असं म्हणता येणार नाही; छगन भुजबळ यांचा भाजपला टोला

महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून निर्दोष मुक्त झाल्यानंतर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ पहिल्यांदाच नाशिकमध्ये आले. नाशिकमध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर नाव न घेता तोफ डागली. (chhagan bhujbal taunt bjp over relief in maharashtra sadan case)

आता त्यांना 'तुमचा भुजबळ करू' असं म्हणता येणार नाही; छगन भुजबळ यांचा भाजपला टोला
chhagan bhujbal
Follow us
| Updated on: Sep 10, 2021 | 7:36 PM

नाशिक: महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून निर्दोष मुक्त झाल्यानंतर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ पहिल्यांदाच नाशिकमध्ये आले. नाशिकमध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर नाव न घेता तोफ डागली. सरळ वागता की तुमचा भुजबळ करू, असा वाकप्रचार त्यांनी सुरू केला होता. आता मी निर्दोष सुटलो. त्यांना हा वाकप्रचार वापरता येणार नाही. त्यांना दुसरं काही तरी शोधावं लागेल, असा खोचक टोला छगन भुजबळ यांनी लगावला. (chhagan bhujbal taunt bjp over relief in maharashtra sadan case)

छगन भुजबळ आज सायंकाळी नाशिकमध्ये दाखल झाले. यावेळी ढोल ताशे वाजवत आणि फटाके फोडून भुजबळांचं जंगी स्वागत करण्यात आलं. भुजबळांच्या स्वागतासाठी नाशिकमध्ये प्रचंड गर्दी जमली होती. यावेळी कार्यकर्त्यांनी पेढे भरवत, ढोलाच्या तालावर ठेकाही धरला. महिलांनी भुजबळांचं औक्षण केलं तर कार्यकर्त्यांनी त्यांना भला मोठा हार घातला. त्यानंतर भुजबळांनी पत्रकार परिषद घेऊन मीडियाशी गप्पा मारता मारता आपल्या खास शैलीत भाजपवर आसूडही ओढले.

राजकारणात शब्दाने शब्दाला उत्तर दिलं जातं आणि विचाराने विचाराला. परंतु, हल्लीच्या काळाज अडचणीत टाकण्याचा प्रकार सुरू झाला आहे. आता तर अधिकच अडचणीत टाकलं. त्यातूनच बाहेर वाकप्रचार सुरू झाला तुम्ही सरळ वागता की तुमचा भुजबळ करू. आता त्यांना तो वाकप्रचार वापरता येणार नाही. दुसरं काही तरी शोधावं लागेल, असा चिमटा त्यांनी काढला.

सदासर्वकाळ मूर्ख बनवू शकत नाही

आम्ही जास्त बोलत असल्याने कदाचित लोकं दुखावत असतील. पण आम्ही राजकारणामध्ये विचाराची लढाई लढतो. त्यामुळे आम्ही सत्य मांडतो. पण माणसं दुखावली जातात. हल्ली अलिकडे हे जास्तच व्हायला लागलं. लोक पटदिशी दुखावतात आणि हातात असलेल्या सत्तेचा ताबडतोब गैरवापर करायला सुरुवात करतात. राजकारणात सहनशक्ती हवी. राजकारणात आम्हाला जसे हार पडतात तसे प्रहार झेलण्याची शक्तीही असायला हवी. प्रहार झेलण्याची शक्ती आता कमी होत चाललीय. त्यामुळे वेगवेगळ्या मार्गाने छळवणुकीचे प्रकार वाढले आहेत. लोकांना सगळं समजतं. यांच्यामागे पोलीस लावले, ईडी लावली… हे अमकं केलं तमकं केलं… पण निवडणुका येतात. सदा सर्वकाळ तुम्ही लोकांना मूर्ख बनवू शकत नाही. अनेक सरकारे पाहिली. काँग्रेसची, वाजपेयींचीही पाहिली. आता केंद्रात जे चाललंय ते अवर्णनीयच आहे, असा चिमटाही त्यांनी काढला.

असा मोर्चा नाशिकमध्ये झाला नाही

आम्ही तुरुंगात असताना नाशिकमध्ये पाय ठेवायला जागा नव्हती एवढा मोर्चा नाशिककरांनी पाहिला. या मोर्चाला 12 ते 15 लाख लोक उपस्थित होते असा पोलिसांचा रिपोर्ट आहे. अनेक वयोवृद्ध आणि माताही या मोर्चात सहभागी झाल्या. केवळ भुजबळांना सोडावं या मागणीसाठी ते रस्त्यावर उतरले होते. अर्थात कायदेशीर मार्गानच जावं लागतं. त्याला पर्याय नसतो. पण माझी सुटका व्हावी म्हणून महाराष्ट्रभरातून कार्यकर्ते आले होते. अनेक कार्यकर्त्यांनी मोर्चासाठी मेहनत घेतली होती. त्यामुळे आत्मबळ वाढलं होतं. भुजबळांवर आरोप निराधार आहेत. ते निष्कलंक आहेत. आज ना उद्या ते बाहेर येतील असं वाटल्यानेच जनता रस्त्यावर उतरली, असं त्यांनी सांगितलं.

कार्यकर्त्यांची भावना कळत होती

जनतेचे आशीर्वाद, तुमच्या सर्वांचं प्रेम आणि तुमच्या सर्वांचं सहकार्य यामुळे शुभ दिनी शुभ निर्णय आले. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहेत. आनंद होणं साहजिकच आहे. चार पाचवर्ष सातत्याने जे आमच्यावर आरोप लावले जात होते. कार्यकर्ते आम्हाला काही म्हणत नव्हते. पण त्यांच्या मनातलं दु:ख कळत होतं. कार्यकर्त्यांचं मन कसं जळत असेल हे कळत होतं. आम्ही तुरुंगात असताना आम्हाला ते अधिक जाणवत होतं. आम्हाला जी अटक झाली त्यामुळे कार्यकर्त्यांना तोंड द्यावं लागेल. त्यांना खाली पाहावं लागेल ही दु:खाची भावना सातत्याने मनात होती, असं सांगताना ते भावूक झाले होते. (chhagan bhujbal taunt bjp over relief in maharashtra sadan case)

संबंधित बातम्या:

देशभरात मंदिरे सुरू, महाराष्ट्रात बंद, गणरायाने सरकारला सुबुद्धी द्यावी; फडणवीसांचं गणरायाला साकडं

‘राज्यात भाजपचे सरकार यावे ही गणरायाची इच्छा, बाप्पा ती लवकरच पूर्ण करतील’; गिरीश महाजनांना विश्वास

केंद्र आणि राज्य सरकारच्या भांडणात आमचा बळी जातोय; ईडीच्या कारवाईवरून सरनाईक यांचा घरचा आहेर

(chhagan bhujbal taunt bjp over relief in maharashtra sadan case)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.