Malegaon : दुचाकी पार्किंगमुळे मालेगावातील रस्ते ‘हायजॅक’, वाहतूककोंडीमुळे नागरिक त्रस्त!
शहरातील प्रमुख मार्गांलगत थेट रस्त्याच्या अवती भोवती उभ्या राहणाऱ्या दुचाकींमुळे वाहतूककोंडीची समस्या निर्माण होते. शहरातील कॅम्परोड, सटाणा नाका, अपर जिल्हा सत्र न्यायालय परिसर, मोसमपुल, लोढा मार्केट, संगमेश्वर रोड, बसस्थानक, तहसील आदी मुख्य परिसरात येणाऱ्या-जाणाऱ्या ग्राहक तसेच नागरिकांना आपली वाहने लावण्यासाठी कुठेही पार्किंगची अधिकृत सुविधा नाही.
मालेगाव : मालेगाव (Malegaon) शहर अतिक्रमणमुक्त करण्यासाठी गेल्या पंधरा दिवसांपासून मनपाने विशेष मोहीम होती घेतली आहे. प्रशासनराजमध्ये शहर अतिक्रमणमुक्त होणार असल्याचे चिन्ह दिसू लागले आहेत. मात्र, शहरात वाहनतळांची भीषण समस्या असल्यामुळे सर्वच रस्त्यांलगत होणाऱ्या दुचाकी पार्किंगमुळे (Bike parking) रस्ते ‘हायजॅक’ केले जात आहेत. यामुळे रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहनास जागा मिळत नाहीयं आणि वाहतूककोंडीची समस्या निर्माण होते. मालेगाव शहरात अजुनही अधिकृत वाहनतळांची समस्या (Problem) भीषण आहे.
दुचाकी पार्किंगमुळे रस्त्यांनी चालणे देखील अवघड
शहरातील प्रमुख मार्गांलगत थेट रस्त्याच्या अवती भोवती उभ्या राहणाऱ्या दुचाकींमुळे वाहतूककोंडीची समस्या निर्माण होते. शहरातील कॅम्परोड, सटाणा नाका, अपर जिल्हा सत्र न्यायालय परिसर, मोसमपुल, लोढा मार्केट, संगमेश्वर रोड, बसस्थानक, तहसील आदी मुख्य परिसरात येणाऱ्या-जाणाऱ्या ग्राहक तसेच नागरिकांना आपली वाहने लावण्यासाठी कुठेही पार्किंगची अधिकृत सुविधा नाही. त्यामुळे मार्केटमध्ये येणारी ग्राहक तसेच न्यायालयात किंवा अपरजिल्हा सत्र न्यायालयात येणारे नागरिक आपली वाहने मुख्य रस्त्यालगत उभी करतात.
अतिक्रमणमुक्त शहराचा ध्यास घेतलेल्या प्रशासनाने
रस्त्यावर लावण्यात येणाऱ्या वाहनांमुळे वाहतूककोंडी तर होतोच शिवाय पायी चालणे देखील मुश्किल होत आहे. अतिक्रमणमुक्त शहराचा ध्यास घेतलेल्या प्रशासनाने आता शहरात वाहनतळाचा देखील प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी आता नागरिक करत आहेत. व्यापारी संकुलांत येणाऱ्या ग्राहकांना पार्किंगची सेवा पुरविणे हे संबंधित व्यापारी संकुलाची जबाबदारी असली पाहिजे. मात्र व्यावसायिक गाळ्यांभोवती अधिकृत पार्किंगची सोय नसल्यामुळे ग्राहक थेट रस्त्यावर वाहने उभी करुन निघून जातात.