Nashik | स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू असताना देखील ग्रामीण भागातील नागरिक अद्याप मूलभूत सुविधांपासून वंचितच…
नाशिकच्या आदिवासी भागामध्ये सोईसुविधा अजिबात नाहीयंत. तेथे रस्ते तर सोडाच पण पूल नसल्याने नागरिकांना अत्यंत धोकादायक पध्दतीने दररोजच नदीच्या पाण्यातून प्रवास करावा लागतो. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तर नदीला पूर आल्यावर आपला जीव धोक्यात घालून ग्रामस्थांना ये जा करावी लागते.
नाशिक : संपूर्ण देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जातोयं. मात्र, आजही नाशिकच्या (Nashik) आदिवासी भागामध्ये मुलभूत सुविधा नागरिकांपर्यंत पोहचलेल्या नाहीयंत, ही वस्तुस्थिती आहे. नाशिकच्या आदिवासी भागामध्ये एक विधारक चित्र आहे, ज्याची कल्पना आपण कोणीही नक्कीच केली नसणार. आजही आदिवासी भागांमध्ये रस्ते, नाले आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था (Arrangement) नाहीयं. इतकेच नाही तर नाशिकच्या आदिवासी भागांमध्ये शाळा नसल्याने अनेक मुले ही शिक्षणापासून वंचित आहेत. पूल नसल्याने नागरिकांना आपला जीव धोक्यात घालून नदींमधूनच (River) प्रवास करावा लागतोयं.
पूल नसल्याने नदीपात्रातून करावा लागतो धोकादायक पध्दतीने प्रवास
नाशिकच्या आदिवासी भागामध्ये सोईसुविधा अजिबात नाहीयंत. तेथे रस्ते तर सोडाच पण पूल नसल्याने नागरिकांना अत्यंत धोकादायक पध्दतीने दररोजच नदीच्या पाण्यातून प्रवास करावा लागतो. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तर नदीला पूर आल्यावर आपला जीव धोक्यात घालून ग्रामस्थांना ये जा करावी लागते. यामध्ये लहान मुले ते वयस्कर सर्वांनाच धोकादायक पध्दतीने प्रवास करावा लागतोयं.
शासन आणि प्रशासनाचे ग्रामस्थांच्या मागणीकडे दुर्लक्ष
पेठ सुरगाणा कहाडोळंपाडा येथील नागरिकांचा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव तरी परवड सुरूच आहे. पार नदीवर पुल बांधण्याची गेल्या अनेक दिवसांपासून नागरिक सातत्याने मागणी करत आहेत. मात्र, नागरिकांच्या या मागणीकडे शासन आणि प्रशासन सर्रासपणे दुर्लक्ष करताना दिसते आहे. नाशिकच्या अनेक ग्रामीन भागामध्ये रस्ते नसल्याने नागरिकांना एखाद्या व्यक्तीला अर्जंटमध्ये दवाखान्यात न्यायचे असेल तर कपड्यांची झोळी करून घेऊन जावे लागते.