Nashik | नाशिक महापालिकेचे आयुक्त पुलकुंडवार करणार खराब रस्त्यांची पाहणी, ठेकेदार आणि अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले…
नाशिक महापालिकेचे आयुक्त पुलकुंडवार स्वतः रस्त्यांची पाहणी करणार असल्याने अधिकारी आणि ठेकेदारांमध्ये चिंतेचे वातावरण बघायला मिळते आहे. नाशिकच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. यामुळे वाहनचालकांना रस्त्याने वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागते आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघाच्या घटनांमध्येही वाढ झालीयं.
नाशिक : नाशिक (Nashik) शहरामध्ये रस्त्यांचे तीन तेरा वाजले आहेत. पावसामध्ये रस्त्यांची पूर्णपणे चाळण झालीयं. विशेष म्हणजे तीन वर्षांपूर्वीच करोडो रूपये खर्च करून अनेक रस्त्यांची दुरवस्था बघायला मिळते आहे. शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांवरून महापालिका (Municipality) आयुक्त पुलकुंडवार यांनी अधिकाऱ्यांना दोनच दिवसांपूर्वी धारेवर धरले होते. नागरिकांकडून खराब रस्त्यांमुळे गेल्या काही दिवसांपासून महापालिका प्रशासनावर रोष व्यक्त केला जातोयं. रस्त्यावर (Road) पडलेल्या खड्ड्यामुळे अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झालीयं. आता यासर्व प्रकरणी स्वत: महापालिकेच्या आयुक्तांनी लक्ष घालून रस्त्यांनी पाहणी करणार आहेत.
नाशिक महापालिकेचे आयुक्त पुलकुंडवार स्वतः करणार रस्त्यांची पाहणी
नाशिक महापालिकेचे आयुक्त पुलकुंडवार स्वतः रस्त्यांची पाहणी करणार असल्याने अधिकारी आणि ठेकेदारांमध्ये चिंतेचे वातावरण बघायला मिळते आहे. नाशिकच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. यामुळे वाहनचालकांना रस्त्याने वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागते आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघाच्या घटनांमध्येही वाढ झालीयं. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे महापालिका प्रशासनाच्याविरोधातील नागरिकांना रोष वाढत होता. आता यावर महापालिका आयुक्तांनी लक्ष दिले आहे.
आयुक्तांच्या पाहणीनंतर अनेकांचे बाजार उठण्याची दाट शक्यता
शहरात तीन वर्षांपूर्वी तयार झालेल्या रस्त्यांची अक्षरशः चाळणी झाली आहे. मनपाचे 600 कोटी पाण्यात गेल्याने आयुक्तांच्या भूमिकेकडे शहरवायीसांचे लक्ष लागले आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर आता आयुक्त नेमकी काय कारवाई करतील हे बघण्यासारछे ठरणार आहे. आयुक्तांनी यापूर्वीच काही ठेकेदारांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. आयुक्त आता स्वत: चाळण झालेल्या रस्त्यांची पाहणी करणार म्हटल्यावर अनेकांचे बाजार उठण्याची दाट शक्यता आहे.