माणिकराव कोकाटेंच्या मुलीच्या विवाह सोहळ्यात कोरोना नियमांना हरताळ, कार्यक्रमाला अनेक मंत्र्यांची उपस्थिती

राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यात कोरोना नियमांना पायदळी तुडवण्यात आले. या विवाह सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ आदी नेते उपस्थित होते.

माणिकराव कोकाटेंच्या मुलीच्या विवाह सोहळ्यात कोरोना नियमांना हरताळ, कार्यक्रमाला अनेक मंत्र्यांची उपस्थिती
लग्न सोहळ्यात अशा प्रकारे कोरोना नियमांचे उल्लंघन करण्यात आले.
Follow us
| Updated on: Jul 01, 2021 | 8:55 PM

नाशिक : उत्परिवर्तीत डेल्टा प्लस कोरोना विषाणू तसेच कोरोनाची संभाव्य तिसरी लाट यामुळे राज्यात अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र, असे असले तरी काही राजकीय व्यक्तींकडूनच कोरोना नियमांचं उल्लंघन होत असल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यात कोरोना नियमांना पायदळी तुडवण्यात आले. या विवाह सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ आदी नेते उपस्थित होते. (Corona rule broken in marriage ceremony of Manikrao Kokates daughter Ajit Pawar Chhagan Bhujbal were present)

कोकाटेंच्या मुलीच्या लग्नात कोरोना नियमांचे उल्लंघन

नाशिक तालुक्यातील गंगावार्हे परिसरातील एका खासगी रिसॉर्टवर सिन्नरचे राष्ट्रवादी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या मुलीचा विवाह सोहळा आज (1 जुलै) पार पडला. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री छगन भुजबळ, क्रीड़ामंत्री सुनील केदार आणि राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी हजेरी लावली होती. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्ज़ा उडाला होता. यासोबतच आमदार कोकाटेंसह अनेकांच्या चेहऱ्यावर मास्कही नव्हते.

लग्नाला गेलो होतो तेव्हा 100 टक्के लोकांना मास्क

हा प्रकार समोर आल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार यांनी “मी लग्नाला गेलो होतो तेव्हा 100 टक्के लोकांना मास्क होते. बंधन पाळणं प्रत्येकाला आवश्यक असून गर्दी करून चालत नाही. काही बाबतीत नाईलाज असतो. मात्र एखादी चूक झाली तर मी चूकच म्हणतो,” अस त्यांनी स्पष्टीकरण दिलंय.

नियम मोडल्यामुळे गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल

दरम्यान, सोलापुरात संचारबंदी लागू असतानाही आपत्ती व्यवस्थापन कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापूर पोलिसांनी भांदवि कलम 188, 336, 269 नुसार गुन्हा दाखल केलाय. पडळकर यांच्यासह 10 ते 15 जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. गुन्हा दाखल झाल्यानंतर पडळकर यांनी संतप्त प्रतिक्रिया दिलीय. माझ्यावर गुन्हा दाखल करायचा असेल तर जरुर करा. पण मग हिंमत असेल तर पुण्यात हजारोंची गर्दी जमा करणाऱ्या अजित पवारांवरही गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केलीय.

इतर बातम्या :

“भाजपला मास्टरस्ट्रोक आवश्यक, यूपी निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र फोडणे गरजेचा”

एकीकडे गुप्त बैठकीची चर्चा, दुसरीकडे स्वबळाचा नारा देणाऱ्या नाना पटोलेंची मोठी प्रतिक्रिया

सरकार वाचवण्यासाठी हालचाली, संजय राऊत यांची गुप्त बैठक, कोण कोण उपस्थित?

(Corona rule broken in marriage ceremony of Manikrao Kokates daughter Ajit Pawar Chhagan Bhujbal were present)

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.