आजूबाजूच्या बांडगुळामध्ये हिरवा रावण लपलाय; लव्ह जिहादविषयी हिंदू हुंकारमध्ये सगळच धक्कादायक सांगितलं..
जमात-ए-इस्लाम ही संघटना यामागे काम करत असून उद्यापासून या जिल्ह्यात बांगलादेशी हटाव मोहीम हाती घेतली जाणार असल्याचा इशाराच त्यांनी दिला आहे.
नाशिक : गुढीपाडव्यानिमित्त झालेल्या हिंदू हुंकार सभेत आज लव्ह जिहादवरून आज जोरदार हल्लाबोल करण्यात आला. यावेळी हिंदु हुंकार सभेत हिरवा रावण म्हणत लव्ह जिहादवरून टीका करण्यात आली. नाशिकच्या त्र्यंबक रोडवरील ईदगाह मैदानावर हिंदू हुंकार सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सुरेश चव्हाणके यांनी मार्गदर्शन केले. या सभेत साधू-संत आणि शेकडोंच्या संख्येने नागरिक सहभागी कार्यक्रमात सहभागी झाले होते. तसेच महामंडलेश्वर शांतिगिरिजी महाराज, भक्तीचरणदास महाराज, गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्यासह साधू महंतही यावेळी उपस्थित होते.
हिंदू हुंकार सभेत बोलताना सुरेश चव्हाणके यांनी सांगितले की, नाशिकमध्ये एका वर्षात 500 पेक्षा जास्त मुली लव्ह जिहादच्या बळी झाल्या असून हा आकडा सरकारी असल्यामुळे एवढाच असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
लव्ह जिहादवर बोलताना त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रामध्ये एक नंबरचा लव्ह जिहाद हा बीडमध्ये होतो तर दोन नंबरचा नाशिकमध्ये होतो अशी गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.
ज्या प्रमाणे लव्ह जिहाद हा राज्यासाठी धोकादायक आहे. हा धोकादायक आहे कारण-आजूबाजूच्या बांडगुळामध्ये हिरवा रावण लपला आहे त्यामुळे खरा धोका असल्याचेही त्यांनी सांगितले.
सुरेश चव्हाणके यांनी सांगितले की, माझ्यावर 1825 एफआयआर असून भगवा झेंडा हातात घेऊन मिनी पाकिस्तानमध्ये घुसल्यामुळे माझ्यावर गुन्हे दाखल झाला असल्याचेही माहिती त्यांनी दिली.
लव्ह जिहादवरून बोलताना त्यांनी सांगितले की, तुमच्या बहिणीकडे कुणी वाकड्या नजरेने बघितलं तर शांत बसणार आहात का ? असा सवालही त्यांनी हिंदू हुंकार सभेत केला.
यावेळी त्यांनी पोलिसांवरही सडकून टीका केली. हे पोलिसदेखील जिहादवाल्यांचे व्हिक्टिम असल्याचा टोलाही त्यांनी पोलीस खात्याला लगावला आहे.
नाशिकमधील घटनेचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, नाशिकच्या नाशिकरोड येथे सोमाणी गार्डनजवळ छोटं थडगे होतं, तिथे आता मोठी मस्जिद होत आहे.
तर दुसरीकडे विहितगाव येथे हिंदू लोकांची संख्या पन्नास टक्केने कमी होत असून विहितगाव आता ईदगाव होत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी त्यांनी बांग्लादेशी हटाव मोहीम हातात घेत असल्याचे सांगत सिन्नरच्या एमआयडीसीत बांगलादेशी घुसखोर असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.
जमात-ए-इस्लाम ही संघटना यामागे काम करत असून उद्यापासून या जिल्ह्यात बांगलादेशी हटाव मोहीम हाती घेतली जाणार असल्याचा इशाराच त्यांनी दिला आहे.