Nashik | सिन्नर तालुक्यातील डुबेरेत बंधारा फुटल्याने पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांनी केली मोठी मागणी
सिन्नर तालुक्यातील डुबेर परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे गावालगत असलेल्या कोल्हापूर टाईप बंधाऱ्याचा भराव फुटल्याने शेतात पाणी घुसले आहे. यामुळे मातीसह सोयाबीनचे उभे पिक वाहून गेल्याची घटना घडली आहे.
सिन्नर : सिन्नर (Sinnar) तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने डुबेरेत बंधारा फुटल्याने मोठे नुकसान झाले आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून राज्यात सर्वच ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावलीयं. यामुळे अनेक नद्यांना पूर आल्याने पुराचे पाणी (Water) थेट शेतात शिरल्याने बळीराजाचे मोठे नुकसान झाले आहे. नाशिकच्या सिन्नर तालुक्यामध्ये तर बंधारा फुटल्याने शेतांचे मोठे नुकसान (Damage) झाले असून फक्त शेतातील पिकेच नाही तर शेतामधील मातीही बंधारा फुटल्याने वाहून गेलीयं. बंधारा फुटल्याने झालेल्या नुकसानाची पाहणी करून पंचनामे करत लवकर भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
बंधाऱ्याचा भराव फुटल्याने शेतांचे मोठे नुकसान
सिन्नर तालुक्यातील डुबेर परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे गावालगत असलेल्या कोल्हापूर टाईप बंधाऱ्याचा भराव फुटल्याने शेतात पाणी घुसले आहे. यामुळे मातीसह सोयाबीनचे उभे पिक वाहून गेल्याची घटना घडली आहे. यात शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटक बसल्याचे शेतकरी राजा चिंतेत पडलायं. तातडीने पंचनामे करून मोठी नुकसान भरपाई देण्याची मागणी आता शेतकरी करू लागले आहेत.
बंधारा फुटल्याने पिकांसोबतच शेतातील मातीही वाहून गेली
सिन्नर तालुक्यातील डुबेरे येथे बंधारा फुटल्याने शेतांचे मोठे नुकसान झाले आहे. अचानकच बंधारा फुटल्याने सोयाबीनचे अख्ये पिक वाहून गेले आहे. इतकेच नव्हेतर पिकांसोबत शेतातील मातीही वाहून गेल्याने शेतकऱ्यांसमोर मोठी चिंता आहे. नवे पिक जर शेतात घ्यायचे म्हटले तरीही शेतातील माती वाहून गेल्याने घेऊ शकत नाहीय. यामुळे लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.